Skip to main content

नारळाचे सान्दण

लेखक अम्रुताविश्वेश यांनी शुक्रवार, 03/12/2010 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ वाटी रवा ३/४ वाटी नारळाचे दूध २ - ३ चमचे किसलेला गूळ चिमूटभर वेलची पूड चिमूटभर केशर दूधामधे भिजवून चिमूटभर खाण्याचा सोडा कृती : एका भान्ड्यामधे नारळाचे दूध आणि गूळ एकत्र करून घ्या.गूळ दूधामधे पूर्ण विरघळून घ्या. मग त्यामधे रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण साधारण पणे अर्धा तास भिजवून ठेवा. अर्ध्या तासानी त्यामधे केशर , वेलची घालून मिश्रण एक्जीव करून घ्या.

मुशर्रफना व्हिसा नाकारुन केन्द्र सरकार ने योग्य केले आहे .

लेखक कोकणप्रेमी यांनी गुरुवार, 02/12/2010 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
मुशर्रफ सारख्या भारताविरुध्द नेहमीच गरळ ओकणारया माणसाला केन्द्र सरकार ने व्हिसा नाकारुन फार उत्तम काम केले. भारतात येउन आपल्याच राजकरण्यानना हा माणुस सल्ला देउन जातो व आपल्या नेत्यान्ची गोची करुन जातो असे मला नेहमी जाणवले. काही दिवन्सापुर्वि तर मुशर्रफने कबुलीसुध्दा दिली की कारगिलचा कर्ता करविता मीच होतो. अशा परीस्थीतित आपल्या सरकारने कधी नव्हे ते एक चान्गले काम कुथलाही घोळ न घालता केले. पाकिस्तान मधे वाटेल ते करुन परतण्यासाथी हा माणुस काहिहि करु शकतो. मिडीया वाल्यान्चि मात्र एक मोथी सन्धि गेली हे मात्र नक्की. आपल्या सरकारला अनेक धन्यवाद

मौनाचं वादळ

लेखक जयवी यांनी गुरुवार, 02/12/2010 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी खुपतंय, सलतंय आत कुठंतरी खोलवर दुखतंय आज उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज कुठतरी खोलवर दुखतंय आज पापण्यांची होते झालर ओली रडवेली होते देहाची बोली कबुली कशाची द्यावी आज कुठतरी खोलवर दुखतंय आज सयींचं व्याकुळ, आठव मोहळ उरात कल्लोळ, मौनाचं वादळ कोरडा श्रावण, भिजवे आज कुठतरी खोलवर दुखतंय आज जयश्री अंबासकर
काव्यरस

स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 02/12/2010 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा मजबूत कुटुंबव्यवस्था आणि विविध प्रकारचे नातेसंबंध यामुळे ओळखला जातो. तथाकथित पाश्चिमात्त्य संस्कृतीमुळे आधीच काही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होत आहे. त्यात वेगवेगळे कायदे करून सरकार किंवा न्यायालय आणखी ते नातेसंबंध बिघडविण्यात हातभार लावत आहे. ***भाग १ : मुलगा आणि मुलगी या नात्यातल्या "मुलगी" कडून असणारे कायदे: *** पारंपारीक प्रथेनुसार वडील आपल्या मुलाला शिक्षण देवून मोठे करतात आणि मोठेपणी मुलगा त्यांना सांभाळतो. मुलगा मुलगी समानता यामुळे मुलीलाही मुलाच्याच तोडीचे शिक्षण आज पालक देतात.

प्रणयपुष्करिणी

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 02/12/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
"पास आओ ना, ए जाने दो ना...छुओ ना छुओ ना देखो छुओ ना छुओ ना...छुओ ना...प्यासे होंठों की जो कहानी हैं...पास आके तुम्हे सुनानी हैं....ये बातें मैं न कर पाऊंगी, पास न आना मर जाऊंगी..." अहाहा, काय सुंदर गाणे आहे हे! निळाशार आसमंत, देखणा ॠषि कपूर, मादक डिंपल, आरडीचं तितकच मादक संगीत...अवघ्या ३-४ मिनिटांत शृंगार रसाचा चषकच जणू कलंडून प्रेक्षकांना चिंब भिजवतो. हा झाला रुपेरी पडद्यावरचा प्रणय. प्रत्यक्षात मात्र अशी शृंगारदेवतेची आराधना कुणी केली असेल की नाही शंकाच आहे किंवा कुणी असतीलही रोमँटिक उत्साही तर त्यांनी चार भिंतींच्या आणि एका छताच्या आड असे शृंगाररसपान केले असेल.

"इंडिअन आयडॉल" चा रोड शो ..........

लेखक स्पा यांनी गुरुवार, 02/12/2010 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
आता बॉलीवूड च्या बरोबरीने "छोटे स्टार" सुद्धा रस्त्यावर वाहन धड्कावण्यात आघाडीवर आहेत.... हे वाचा.... http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=11… आता या शुक्रे बाई गाण्याचा रियाझ वगेरे करायचं सोडून, "रेस रेस" खेळतात..... आणि तो सावंतांचा अभिजित..... करिअर ची गाडी रेस मध्ये मागे पडलेली असताना(शिवाय लग्न झालेलं असताना ) ....

कत्तलखाना !!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 02/12/2010 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
!जनावरांचे कळप चालत असतात कत्तलखान्याकडे हाडांचे जणू सापळे सरकत असतात ह्या कत्तलखान्याकडे लवथवते विक्राळपण ह्यांच्या डोळ्यातून पाझरत असते तरी सरकत असतात गुरांचे कळप मुकाटपणे नजरेत नसते कसली ओढ घरादाराची तरी ओढली जातात अनामिक ओढीने ह्या जनावरांचे कळप डोळे कोठे लागलेले असतात शून्यात कोठेतरी त्याना येत असतो पाठीवर बसलेल्या काठीचा आवाज नि बेचैन होऊन सरकत असतात झुंडीने अनामिक दिशेला एखादे जनावर मुतते फदाफदा नि हगते जीव घाबरा झाल्यासारखा एखादा कावळा बसतो त्यांच्या शिंगावर शहाजोगपणे मजेने स्वताची हाउस घेत असतो पुरवून जनावरांना नाही वाटत सुख, नाही फुलत रोमांच त्यांच्या कातडीवर कसे हो
काव्यरस

माझा मालक कोण ?

लेखक मिसळभोक्ता यांनी गुरुवार, 02/12/2010 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
इथे मिसळपावावर अनेक मराठी लोक आहेत. मराठी म्हणजे काय, तर कधीतरी जे मराठी बोलत होते, ते लोक. मीही त्यातलाच एक. बायकोशी मराठीत, आणि मुलांशी इंग्रजीत बोलणारा इतर भारतीयांसारखा एक. जकार्त्यात राहून भारताच्या राष्ट्रपतीला पत्रे जरी लिहीत नसलो, तरी भारताविषयीच्या महत्वाच्या बातम्या वाचणारा एक माणूस. आता समजा, मी गूगल न्यूज सारख्या संकेतस्थळावर बातम्यावाचायला गेलो, तर अर्थातच गूगलला माझा आय पी पत्ता कळणार, आणि तो आय पी पत्ता कॅलिफोर्नियातला आहे, असे समजून उत्तर कॅलिफोर्नियातल्या बातम्या गूगल मला दाखवणार. पण मला त्याचा काय उपयोग ?

रोझा पार्क्स

लेखक मराठे यांनी गुरुवार, 02/12/2010 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी गुगल वरच्या लोगोने माझं लक्ष वेधलं. रोझा पार्क्स ने एका छोट्याश्या कृतीने कित्येकांच्या जीवनात फार मोठा बदल घडवून आणला. त्याला आज ५५ वर्ष झाली. बर्‍याच जणांना रोझा पार्क्स हे नावही माहित नसेल कदाचित, (मी अमेरिकेत येण्यापूर्वी मला तरी माहित नव्हतं) म्हणून हा प्रपंच. ------------------------- रोझा पार्क्स (जन्म: ४ फेब्रुवारी १९१३ मृत्यू: २४ ऑक्टोबर २००५) रोझा लुईस हे तिचं पाळण्यातलं नाव. अगदी सामान्य गरीब घरात रोझाचा जन्म झाला. रोझा जेमतेम दोन वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.