माझा मालक कोण ?
इथे मिसळपावावर अनेक मराठी लोक आहेत. मराठी म्हणजे काय, तर कधीतरी जे मराठी बोलत होते, ते लोक.
मीही त्यातलाच एक. बायकोशी मराठीत, आणि मुलांशी इंग्रजीत बोलणारा इतर भारतीयांसारखा एक.
जकार्त्यात राहून भारताच्या राष्ट्रपतीला पत्रे जरी लिहीत नसलो, तरी भारताविषयीच्या महत्वाच्या बातम्या वाचणारा एक माणूस.
आता समजा, मी गूगल न्यूज सारख्या संकेतस्थळावर बातम्यावाचायला गेलो, तर अर्थातच गूगलला माझा आय पी पत्ता कळणार, आणि तो आय पी पत्ता कॅलिफोर्नियातला आहे, असे समजून उत्तर कॅलिफोर्नियातल्या बातम्या गूगल मला दाखवणार. पण मला त्याचा काय उपयोग ? असोसिएटेड काँटेण्ट सारख्या संकेतस्थळांवरून ह्या अति-लोकल (हायपर-लोकल) बातम्या मला कळतातच. पण, गूगल न्यूज वर मी जातो, ते भारतातल्या बातम्या बघण्यासाठी.
हे गूगल न्यूज ला कसे कळणार ? मी जेव्हा गूगलवर जातो, तेव्हा मी भारताविषयीच्या बातम्या बघतो, हे गूगलने माझी आधीची वर्तणूक बघून ठरवायला हवे. अर्थातच, गूगलमध्ये माझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान डोकी आहेत, आणि त्यांनी हे आधीच ओळखले आहे. त्यांनी माझा गूगल-प्रवास आधीच नोंदवून ठेवला आहे.
अर्थात, हा माझा प्रवास आहे, तेव्हा मला ह्या प्रवासाची सर्व नोंद असायला हवी की नाही ?
मी समजा हा "माझा" प्रवास गूगल ला मागितला, तर ते देतील का ?
अद्याप तरी नाही.
पण गूगल ही एकच संस्था नाही की ज्यांना माझा प्रवास माहिती आहे. याहू वरील मेल मी नेहमी बघतो. याहू न्यूज देखील बघतो. फेसबूक वर मित्र-मैत्रिणीशी (मित्र जास्त, मैत्रिणी कमी, गैरसमज नसावा) संपर्क साधतो, ट्विटरवर काही बाही लिहितो, जे लोक वाचतात.
मी जे काही ऑनलाईन करतो, ते त्या त्या संकेतस्थळावरच्या माझ्याशी संलग्न लोकांना कळते. म्हणजेच, "माझी" माहिती मी गूगल, याहू, फेसबूक ह्या संकेतस्थळांना दिलेली आहे. त्या माहितीचा मालक कोण ? मी ? की गूगल, फेसबूक, याहू ?
अर्थातच, मला वाटेल, की माझी माहिती.. त्यामुळे, मी मालक.
पण तसे खरेच आहे का ?
गूगल, फेसबूक वगैरे मोठी लोके सोडा. आपले छोटेसे मिसळपाव घ्या.
मी मिसळपावावर जे लिहिले, ते कुणाच्या मालकीचे आहे ?
समजा मिसळपावावर माझ्या लिखाणाचा दुवा कुणी स्वतःच्या वर्डप्रेसवर दिला, तर ती चोरी ठरते का ? (माझ्या मते नाही.)
समजा मी मिसळपावावर मी लिहिलेले सर्वच्या सर्व तसेच्या तसे कुणी स्वतःच्य ब्लॉगावर कॉपी-पेस्ट केले, तर ती चोरी ठरते का ? (माझे मिसळपावावरचे नाव दिले असेल, तर नाही.)
माझे टोपणनाव दिले नाही तर ? मग नक्की ती चोरी ठरते.
पण समजा, मी इथल्या कुणाला दिलेली माहिती व्यनीतून खाजगी म्हणून दिलेली असेल, आणि त्याने/तिने ती कुठेतरी प्रकाशित केली तर ?
आता ही मजा आहे. ह्या वर्तणूकीला कायद्याचे किंवा मोरॅलिटीचे बंधन नाही.
उदाहरणार्थ, मिसळभोक्ता हा मिसळपावावरील आयडी, म्हणजे प्रत्यक्षात कोण आहे, हे ज्यांना माहिती आहे, त्यांनी समजा फेसबुकवर "स्वतःच्या" भिंतीवर ते लिहिले, तर मिसळभोक्ता काही आक्षेप घेऊ शकतो का ?
नाही !!!
त्रिवार नाही !!!
त्यामुळे मिसळभोक्ता स्वतःचे स्वत्व जपण्यासाठी (टू प्रोटेक्ट द आयडेंटिटी) येथे स्वतःचे खरे स्वत्व उघड करेल का ?
करेलही, कदाचित. केल्यास तो स्वतःच जबाबदार.
पण समजा त्याला स्वतःचे स्वत्व उघड करायचे नसेल, तर त्याला काय पर्याय आहे ?
एकच. मिसळपावावर काहीही लिहू नये. मिसळपावावर येऊही नये, कारण मिसळपाव मिसळभोक्त्याचे काय-काय कलेक्ट करते, ते त्याला अद्याप त्यांनी कुठे सांगितले आहे ?
सांगायला हवेच आहे का ? अर्थातच. मिसळभोक्त्याला ते माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा मिसळभोक्ता नर्वस होईल.
तर, काय काय जमवता भाउ ??
सांगा ना आता!
(ता. क. जुन्या मिपा मालकांनी आम्हाला बर्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्या त्यांच्या कामाला आल्या. आमच्याही थोड्याफार कामाला आल्या, म्हणा ;-) आता येऊ नयेत, असे वाटते.)
याद्या
6520
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
माझं एक रिझर्व बॅकेत आनि एक
आंतरजालावर कोणीही सुरक्षित
खी:खी:खी:खी:
In reply to आंतरजालावर कोणीही सुरक्षित by मदनबाण
अजून एक
हॅ हॅ हॅ
हे
'मालक' ह्या शब्दाचा शाळेत
आमास्नी पण सांगा की राव..
In reply to 'मालक' ह्या शब्दाचा शाळेत by परिकथेतील राजकुमार
येस येस...
In reply to 'मालक' ह्या शब्दाचा शाळेत by परिकथेतील राजकुमार
बोंबला!
In reply to येस येस... by एक
ही ही ही ही ही
In reply to 'मालक' ह्या शब्दाचा शाळेत by परिकथेतील राजकुमार
काही प्रश्न व माझी उत्तरे
पत्र
अगदी चेष्टाच काय कुचेष्टा
In reply to पत्र by विनायक प्रभू
+१
In reply to पत्र by विनायक प्रभू
खी खी..
>>फेसबूक वर मित्र-मैत्रिणीशी
In reply to खी खी.. by योगी९००
:D:D:D:D
In reply to >>फेसबूक वर मित्र-मैत्रिणीशी by पक्या
मिपावर तुम्ही जे लिहिता ते
चुक ...
In reply to मिपावर तुम्ही जे लिहिता ते by रन्गराव
अरेरे
In reply to चुक ... by छोटा डॉन
पुन्हा चुक ....
In reply to अरेरे by रन्गराव
एक शंका.
In reply to पुन्हा चुक .... by छोटा डॉन
"माझ्या मते ह्यात रुची
In reply to पुन्हा चुक .... by छोटा डॉन
!
In reply to "माझ्या मते ह्यात रुची by शैलेन्द्र
रन्गराव, छोटा डॉन ने
In reply to अरेरे by रन्गराव
अरेच्चा खरच की. चूक लक्षात
In reply to रन्गराव, छोटा डॉन ने by विश्वनाथ मेहेंदळे
समजा
वा वा वा वा एकदम चपखल उदाहरण
ब~याच घरात काय जेवायचे काय
मूलभूत प्रश्न
तुमच्या माहितीची किंमत
In reply to मूलभूत प्रश्न by राजेश घासकडवी
सर्व्हिस कॉस्ट ?
In reply to तुमच्या माहितीची किंमत by मिसळभोक्ता
???=०
In reply to सर्व्हिस कॉस्ट ? by छोटा डॉन
छोटा डॉन
In reply to सर्व्हिस कॉस्ट ? by छोटा डॉन
आपल्या महितीवर अवलंबून
In reply to तुमच्या माहितीची किंमत by मिसळभोक्ता
अन्नू मलिक