इथे मिसळपावावर अनेक मराठी लोक आहेत. मराठी म्हणजे काय, तर कधीतरी जे मराठी बोलत होते, ते लोक.
मीही त्यातलाच एक. बायकोशी मराठीत, आणि मुलांशी इंग्रजीत बोलणारा इतर भारतीयांसारखा एक.
जकार्त्यात राहून भारताच्या राष्ट्रपतीला पत्रे जरी लिहीत नसलो, तरी भारताविषयीच्या महत्वाच्या बातम्या वाचणारा एक माणूस.
आता समजा, मी गूगल न्यूज सारख्या संकेतस्थळावर बातम्यावाचायला गेलो, तर अर्थातच गूगलला माझा आय पी पत्ता कळणार, आणि तो आय पी पत्ता कॅलिफोर्नियातला आहे, असे समजून उत्तर कॅलिफोर्नियातल्या बातम्या गूगल मला दाखवणार. पण मला त्याचा काय उपयोग ?