Skip to main content

वनराणी ..३

लेखक प्राजु यांनी शनिवार, 22/01/2011 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
वनराणी २ "शबरी...! चल! माझ्यासोबत चल. माझ्या आश्रमात चल. उठ बालिके. जे व्रत घेतलं आहेस ते पुर्ण कर. " अतिशय गंभीर आणि निर्णायक आवाजात हे काय ऐकतेय मी!! आनंदाने डोळे भरून आलेत... "मुनीवर.. मुनीवर.. मी आपली..." अरे!! हे काय!! मुनीवर... मुनीवर... !! मुनीवर अरण्याकडे चालू लागले!! मलाही जायला हवं. ....मलाही जायला हवं.... "थांबा मुनीवर! मुनीवर थांबा.. मी येतेय.. थांबा मुनीवर..

डांबीस डोंब्या

लेखक धनंजय यांनी शनिवार, 22/01/2011 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
डांबीस डोंब्या - - - - - - - -
पहाट झाली आणि पाण्याच्या चकचक चकाकीमुळे डोंब्या डोमकावळ्याची झोप मोडली. "आईने न्याहारीसाठी काय बरे केले असेल?" म्हणून त्याने डोळे किलकिले केले. "क्राऊ-क्राऊ आऊ, काय-काय खाऊ?" म्हणून त्याने आईला हाक मारली. काहीच उत्तर आले नाही. मग त्याला आठवले. कालच आई त्याला किती रागावली होती - "एवढा मोठ्ठा बगळा झालास, पण तरी आईकडूनच दाणा हवा! उद्या पहाटे उठायचे नि स्वतःच खायचे शोधायला जायचे." रागवल्यामुळे आई उत्तर देत नसेल ना? त्याने डोळे मोठ्ठे करून बघितले. अबब!

साने गुरुजी समग्र पुस्तक संच.

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 21/01/2011 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
१९५० च्या सुमारास घडलेली ही खरी घटना आहे. साने गुरुजीच्या पुस्तकांनी महाराष्ट्राची तरुण पीढी भारावलेली होती. त्यातच एका १८/१९ वयाच्या युवकाचा समावेश होता. दुर्दवाने त्या युवकाला असाध्य अश्या आजाराने गाठलेले होते. मरण्यापूर्वी साने गुरुजींना भेटावे असे त्याला वाटत होते. त्याच्या पालकांनी साने गुरुजींना तसे कळविळे आणि भेटता येईल का असे विचारले. पत्राची वाट पाहत असतांना प्रत्यक्ष साने गुरुजीच त्यांना भेटायला त्याच्या गावी आले.

महामानवाचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग

लेखक chipatakhdumdum यांनी शुक्रवार, 21/01/2011 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
महामानव डॉ. आंबेडकर यांचे भारत स्वतंत्र होण्यामध्ये काय योगदान होते, त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये कोणती कामगिरी बजावली होती, त्यांनी ब्रिटीशांविरुध्द भारत ( अर्थात त्यावेळी हिंन्दुस्थान ) बद्द्ल कोणती निश्चित मते मांडली होती , या संदर्भात काही माहीती मिळेल काय ?

नवी दिशा...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 21/01/2011 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
`येस... आय अ‍ॅम लुकिंग फॊर अ जॉब चेंज'... ट्रेनमध्ये समोरच्या बाकड्यावर बसलेला तो, एव्हढ्या जोरात ओरडला, म्हणून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं... एका कंपनीचा लोगो शर्टच्या खिशावर मिरवणारे ते दोघं बाकड्यावर बसल्यापासून एकमेकांशी मस्त गप्पा मारत होते. सहकारी असावेत. कंपनीतल्या कामाला बहुधा दोघंही कंटाळले असावेत. म्हणूनच, अचानक त्याचं हे वाक्य ऐकून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याला तेवढ्यात फोन आला होता. अलीकडे, प्लेसमेंट कंपन्यांमध्ये नाव नोंदवणार्‍यांच्या मागे नोकर्‍या धावून येत नसल्या, तरी कंपनीचून येणारा फोन कॊल्सचा ससेमिरा मात्र मागे लागलेला असतो.

आपण ह्यांना पाहिलत का?

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 21/01/2011 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या कित्येक दिवसांपासुन आमचे परममित्र श्री नितीन थत्ते हे दिसत नाहित. आंतरजालावरुन ते गायब झाले आहेत. नितीनराव , तुम्ही गेल्यापासुन आम्हाला करमत नाही. आम्हा हिंदूचे चुकते काय हे कोण सांगणार? तुम्ही गेल्यापासून कुणी काश्मीरचा धागा वर काढलेला नाही. मदनबाण आणि सहजरावांनी व्हिडो प्रतिक्रीया देणे बंद केले आहे, आजकाल वहिदाने वाद घालणे सोडले आहे, मिपावर हिंदू-मुस्लिम धागे येत नाहीत, संपादक संपादन करत नाहीत. परा फक्त खरडीतुन स्त्री सदस्यांशीच बोलतो. चुचुने शीबै म्हणणे सोडून दिले. डान्राव रिकाम्या मंगल कार्यालयात आसु ढाळतात. टारोबा भावनांशी मी खेळणार नाही म्हणतात.

वन विभागाचा धिक्कार असो... support Mr. Vikaas dhus

लेखक अश्फाक यांनी शुक्रवार, 21/01/2011 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधि कधि अस्सा राग येतो म्हणुन सांगु राव , १० जानेवारी ला कराड शहरात एक बिबट्या भर वस्तित घुसला , त्याने ६ लोकांना जखमी केले , त्यातिल ३ अजुन गंभिर आहेत . त्या बिबट्याला गोळी झाडुन यमसदनी पाठवनार्या कर्तव्यदक्ष पोलिसा वर बिन्डोक वन विभागाने आज खटला दाखल केला . आता याला काय म्हनायचे पशुदया वगैरे सर्व ठिक आहे हो , जोवर ते मनुश्याच्या जिवावर येत नाही. ज्या पोलिसाचा सत्कार करयचा त्यावरच खटला , खटला खरे तर वन कर्मचार्यांवर भरला पाहिजे ज्यांनी तस्करांच्या संगन मताने जंगंल नागवले आणि वन्यजिवांना शहरात यायला मजबुर केले .