Skip to main content

शीर्षक नसलेली सत्यकथा!!

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 06/04/2011 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक नेहमीसारखाच कंटाळवाणा नोकरीचा दिवस..... मी रोजच्याप्रमाणे ऑफिसात येऊन दाखल झालो होतो... नेहमीचीच कामं! काही सहकार्‍यांवर सोपवली, जी फक्त माझ्यासाठीच होती ती करून संपवली..... आता दिवस मोकळा.... पण नशीब नेहमीच साथ देत नाही!!! "ट्रिंग, ट्रिंग...", फोन वाजला.... "हॅलो:....", मी "हॅलो, सर, धिस इस जेनिफर स्मिथ, फ्रॉम डॅलस, टेक्सास.....", जेनिफर ही माझी एक सीआरए, क्लिनिकल रीसर्च असोसिएट.... "हाय जेनिफर, नाईस टू हिअर फ्रॉम यू आफ्टर अ लॉन्ग टाईम!

स्वातंत्र्याची दुसरी लढाई

लेखक विकास यांनी बुधवार, 06/04/2011 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. बहुगुणी यांचा, "उन्मन क्षण " वर चर्चा चालू असतानाच लक्षात आले की आज पाच एप्रिल उजाडलेले आहे... आज भारतात एका अर्थी इतिहास घडत आहे. ह्या प्रसंगांच्या होऊ शकणार्‍या दृश्य परीणामांवर त्याची खोली ठरेल इतकेच. पंतप्रधान मनमोहनसिंग, संपुआच्या आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या श्रीमती सोनिया गांधी आदींशी संपर्क करून देखील लोकपाल विधेयक पुढे जात नसल्याने आणि भ्रष्टाचाराच्या एकापाठोपाठ एक घटना बाहेर येत असल्याने, वैतागून श्री. अण्णा हजार्‍यांनी आमरण ऊपोषण चालू केले आहे.

आमंत्रण - सरुटॉबाने १७ एप्रिल २०११

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 05/04/2011 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, १४ फेब्रुवारीचा भोजन कट्टा झाला तेंव्हा आम्ही सांदण दरीचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झालं तेंव्हाच एक स्वप्न पाहिलं होतं, एका नव्या कट्ट्याचं, ब-याच जणांच्या खवमध्ये हा शब्द गेल्या काही दिवसात वाचला असेल. आमचे इगुरु श्री. गणपा यांच्या धाग्यानं चिकन भुजिंगच्या धाग्यानं आणि त्यातल्या फुललेल्या निखा-यंनी आमच्या स्वप्नात अजुन निखारे फुलवले. म्हणुन आम्ही ह्या दुस-या खादाडी कट्ट्याचं आयोजन केलंय आणि आमंत्रण देतो आहे. सर्व येउ इच्छिणा-यांचं हार्दिक स्वागत आहे. सरुटॉबाने - म्हणजे सयाजी रुफ टॉप बार्बेक्यु नेशन.

कोकणातील पिकनीक स्पॉट हवेत

लेखक टारझन यांनी मंगळवार, 05/04/2011 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , पुण्यापासुन ३०० ते ३५० किलोमिटर च्या रेंज मधे कोकणातले स्पॉट सुचवा. १ रात्री मुक्काम आणि दोन दिवस अशा प्रकारच्या दुचाकी प्रवासाचे प्रयोजन आहे. पिकनिक च्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट बरोबर शांत आणि मोकळे स्वच्छ समुद्रकिणारे असावेत आणि झक्कास समुद्री जेवण चापता यावं ह्या बरोबर रहाण्याची वगैरे सोय कशी आहे ते सांगावे. डायरेक्ट मोकळ्या हाताने मदत मागतोय असंही नाही. मी उकरुन काढलेली ठिकाणं १. वेळणेश्वर बिच २. अंबोली ३. श्रीवर्धन ४. सिंधुदुर्ग / विजयदुर्ग अगदीच ४०० किमी पर्यंत जाते पण ओक्के .. ह्यांवरही जाणकारांनी प्रकाश टाकल्यास चालेल. माहितीबद्दल आगाऊ धन्यवाद

गुढीपाडवा

लेखक VINODBANKHELE यांनी मंगळवार, 05/04/2011 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
मंचर मध्ये काल गुढीपाडवा घरोघरी ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारून उत्साहात साजरा झाला. हिंदू नववर्षानिमित्त शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांत हजारो आंबेगावकरांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत मराठमोळ्या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडविले. शहर भर रस्तोरस्ती भव्य भगवे झेंडे फडकावले होते हिंदू नववर्षारंभानिमित्त बजरंग दल आणि दुर्गावाहिनी तर्फे आज सायंकाळी मारुती मंदिर येथून स्वागतयात्रा काढण्यात आली . स्वागतयात्रांच्या अग्रभागी गुढी व भगवे झेंडेधारी होते.

डीस्काउंट

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 05/04/2011 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
११ वर्षाने भेटतोयस. चल जेवायला नेतो तुला. का पाडव्याचे जेवण घरी चे कंपल्शन? " लग्नाच्या नंतर दोन वर्षात पाडवा हरवला. तो का हरवला ते आजपर्यंत शोधतोय" शोध लागला की सांग हा. माय्ला काही बोल्लो की नावाला जागलच पाहीजे का? ----------------------------------------------------------------------------------------चल एसी त बसु. "नको. महाग असते" मी बील भरतो, काळजी करु नकोस. " उगाच कशाला खर्च"? असु दे. ---------------------------------------------------------------------------------------- काय मागवतोस? "सगळे महाग आहे रे" गप ए. मेनु बघ आणि ऑर्डर दे. " तुला आठवते कारे?