Skip to main content

नवा खेळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 21/04/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला अवघे आभाळ काजळून कंठ माझा दाटला पंचप्राण शोषून माझे जीव असा टांगला तुझ्या स्मरणात भिजता कसा हा जडावला वर्षाव मोहरलेल्या तुझ्या स्वप्नांचा बरसला मनास माझ्या वाहवत क्षितीजास घेऊन गेला क्षितिजी तुझ्या स्मरणांचा आता वणवा पेटला वाहत आलेल्या मनास माझ्या चटका लावून गेला प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला जीवास सुखावून काळजास हुरहूर देऊन गेला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२१/०४/२०११)
काव्यरस

मासे २५) हलवा

लेखक जागु यांनी गुरुवार, 21/04/2011 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
हलवा पापलेट सारखाच दिसतो पण त्याची खवले काळपट असतात. तर पापलेटला खवलेच नसतात. हलवा हा चवदार असतो.

स्पेशल फीचर...

लेखक गवि यांनी गुरुवार, 21/04/2011 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : यशचं घर. (बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बाबा मुडपून आडवारलेले. यश हातात मोबाईल घेऊन घराच्या दाराबाहेर उभा. मोबाईलवर नजर अखंड खिळलेली आहे. एका हाताने मोबाईलची खूप फास्ट बटनं दाबत आणि मधेच त्यावरचा काहीतरी मजकूर वाचून खुदकन हसत तो उभा असतो. एक मोकळा हात सतत अस्वस्थपणे स्वत:चे खिसे चाचपत असतो. घराच्या किल्लीसाठी..पण मोबाईल वरची नजर मात्र एक क्षणही हटत नाही.) यश (स्वत:शी) : किल्ली कुठे गेली च्या मायला..(विचित्र टोन मध्ये मोठ्यांदा) पड्ली बिडली की क्कॉय…?!? (तेवढ्यात खिशातून खण्णकन किल्ली खाली पडते.

सुंदर माझा गाव !!!

लेखक परदेश् वासी तरिहि घाटी यांनी गुरुवार, 21/04/2011 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपा कर, मी एक नवीन मिपा कर आहे. सध्या व्हर्जिनिया टेक या अमेरिकन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हे विद्यापीठ वॉशिंगटन डीसी पासून ३०० मैलावर ब्लॅकस्‍बर्ग या छोट्याश्या गावात आहे. विद्यापीठाचा परिसर खूपच सुंदर आहे. नुकतेच मी काही फोटो घेतलेत. ते इथे सादर करत आहे. आशा करतो कि मिपा कर चांगला प्रतिसाद देतील. फोटोंवर प्रतिक्रिया दिल्यास अति उत्तम.

पत्राचे दिवस ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 21/04/2011 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी कसे छान दिवस होते तारुण्याचे कसे एक गाणे होते पत्र येईल येईल म्हणून मन वाट बघायचे निळ्या पत्रात मन हरवून जायचे शब्दांची रांगोळी कशी छान वाटायची निळ्या निळ्या आभाळात कशी पाखरे उडायची तिच्या घरासमोरचा पिंपळ सळसळताना दिसायचा संध्याकाळी ती खिडकीतून दूरवर नजर टाकीत वाट बघायची [अशी कल्पना त्याच्या डोक्यात यायची] नुसत्या आठवणीने किती बहरून जायचे मन जुनी पत्र चाळताना किती हरवून जातेय मन ...! पोस्टमनची वाट बघता बघता कसा दिवस हरवून जायचा स्वप्नात तिचा भास छळत राहायचा ..!! पत्राची एक निराळीच गंमत होती तिच्या लिहिलेल्या शब्दाशब्दावर जीव फुलत होता अधून मधून चोरून पत्र वाचत र
काव्यरस

पेअर चॉकलेट केक

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 21/04/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांनी एक नवी केकृ खास इस्टर निमित्त-
साहित्य- १५० ग्राम बटर, १५० ग्राम साखर,३०० ग्राम मैदा,५० ग्राम ओट फ्लेक्स, ४ अंडी, ३ चहाचे चमचे बेकिंग पावडर, १ चमचा रम,१ चमचा कोको पावडर, १०० ग्राम कुकिंग चॉकलेट,१/२ चमचा जायफळ पावडर+१/२ चमचा दालचिनी पावडर,४ चमचे दूध, ८५० ग्रामचा पेअरचा टिन.( ४ पूर्ण + अर्धे पेअर असे ९ अर्धे पेअर ), १ चिमूट मीठ सजावटीसाठी- चॉकलेट आयसिंग, व्हाइट चॉकलेट कृती-पेअर चाळणीवर टाकून पाक निथळून घेणे. बटर भरपूर फेटणे

वासंतिका‏

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 20/04/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वागता पुन:र्मिलनाच्या उत्तरा अन रविच्या घेऊन बहार साचा आला वसंत आला || विरह तो सहा मासांचा तिज शुष्क थंड शिशिराचा गर्भात फुलवीत आशा पुन:रुपी वसंत आला || रंगेल सोहळा आता विरहीत दोन जीवांचा उभारीत गुढ्या पर्णांच्या विलासी वसंत आला || लेऊन गर्द हिरवाई कोरून पुष्प काशिदाही रसरशीत फळे ही पदरी मिलनास अधिर अवनी ही || आला वसंत आला .......... __/\__ अपर्णा
काव्यरस

पोटपाल

लेखक तिमा यांनी बुधवार, 20/04/2011 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोणा एका राज्यात भ्रष्टाचार अतोनात माजला होता. राजा देखील या मलिन प्रतिमेमुळे अतिशय त्रस्त झाला होता. पण त्याच्या भोवतीचे कोंडाळे, प्रधानजी, राजाच्या पूर्वजांनी अनेक वर्षे पोसलेले वतनदार या सगळ्यांपुढे तो काहीच करु शकत नव्हता. स्वतः साधे रहाणे यापलिकडे तो लोकांसमोर कुठलाही आदर्श ठेवू शकत नव्हता. प्रजा ही एके काळी साधी होती. परन्तु सततच्या भ्रष्टाचारामुळे तीही अशा गोष्टी गृहीत धरु लागली होती. संपूर्ण लोकसंख्येमधे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे फारच थोडे लोक राहिले होते. ज्यांना कुठे ना कुठे हात मारता येत होता ते यथेच्छ ओरपत होते. ज्यांना संधीच मिळत नव्हती ते नाईलाजाने प्रामाणिक राहिले होते.

खिमा पाव

लेखक गणपा यांनी बुधवार, 20/04/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
परवा प्रभ्याशी गप्पा हाणताना खिम्याचा विषय निघाला. तसा तो खुप आधी पासुन माझ्या मागे लागला होता की खिम्याची पाकृ दे एकदा. पण योग जुळुन आला नव्हता. असो तर ही पाकृ खास आपल्या प्रभ्याच्या आग्रहा खातर. साहित्यः १ लहान चमचा हळद. १ मोठा चमचा मसाला (मालवणी/वाढवळ) १ लहान चमचा गरम मसाला. १ मोठा चमचा शाहीजीरे/जीरे. १ मोठा चमचा धणे पुड. १ मोठा चमचा जीरे पुड.