Skip to main content

Photography.

लेखक nishant यांनी सोमवार, 09/05/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल टिपलेलि कहि छायाचित्र: Photobucket ट्युलिप्चे फूल Photobucket ट्युलिप्चे फूल

लिहिण्यास कारण की -

लेखक विदेश यांनी सोमवार, 09/05/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
तहानभूक विसरून , नित्याची कामं बाजूला ठेवून , किंवा हातातली कामं करत करत दूरदर्शन संचापुढे ठिय्या मांडून बसणारे किंवा येता जाता न चुकता दूरदर्शन संचाकडे नजर टाकणाऱ्याचे अभिनंदन करण्याची आवश्यकता नाही ! कारण सदैव ही माणसे चिंतातुर चेहऱ्याने वावरत असतात.त्याच त्याच बातम्या २४ तास ऐकून जगाचे काय आणि कसे होणार याची काळजी त्यांना पडलेली असते! मालिकेतील पात्राच्या दु:खात दूरदर्शन पुढची माणसे समरस होतात, पण त्यांना घरातील पात्रांच्या सुखदु:खात काडीइतका रस घ्यावा वाटत नाही! हातात असलेली कामं निपटून दूरदर्शन संचातील ' पाक-क्रीडा ' पहावयास काय हरकत आहे?

कैरीचे पाण्यातील लोणचे..

लेखक यश राज यांनी सोमवार, 09/05/2011 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १.कैरी (१ किलो) २.मोहरी(राई) दाळ (१/२ किलो) ३.हिन्ग (चविपुरते) ४.लाल तिखट : ४ मोठे चमचे. ५.हळद : २ मोठे चमचे. ६.तेल : १/२ किलो. ७. मिठ : १/२ किलो. ८.पाणी : ५ ते ६ वाट्या. ९.बडिशेप पुड: १ चमचा. १०. धणे पुड : १ चमचा. क्रुती: १. प्रथम कैरिच्या फोडी करुन घ्याव्यात. २.मिक्सर मधुन मोहरी डाळ कोरडी वाटुन घ्यावी. ३. एका पातेल्यात तेल घेवून कड्कडित गरम करावे. ४.एका मोठ्या परातित वाटलेली मोहरी डाळ व थोडे पाणी घेवुन हाताने खुप फेटावे.(जवळपास १० मिनीटे. ) ५.

बालगंधर्व...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/05/2011 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
नारायणराव बालगंधर्वांची नाटकं जोरात सुरू आहेत. नुकताच एका कर्जाचा डोंगर उतरून कधी नव्हे ते रु ३०००० इतकी रक्कम नारायणरावांच्या सहकार्‍यापाशी शिल्लक आहे. नारायणराव बसले आहेत. त्यांच्या पुढ्यात नानाविध उंची अत्तरं मांडलेली आहेत. नारायणरावांनी नुकतीच अत्तरांची खरेदी आटोपली आहे. माझ्या नाटकाला येणार्‍या रसिकांकरता उंची अत्तर हवंच, हा नारायणरावांचा अट्टाहास आहे. नारायणराव रसिकतेने अत्तराचा सुवास घेत आहेत. "नारायणराव, आता हे ३०००० रुपये बँकेत जमा करतो.." "हो, चालेल.

संदर्भ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 09/05/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमओले तप्त ओठ आज पुन:श्च थरारले तू समोर ठाकताच फिरुनी शुष्क जाहले तव लोचनी तरळताच रंग माझिया प्रितीचे गालावरील गुलाब तुझिया बघ उमलू लागले सात्विक चेहर्‍याशी ती लाली पाहून नयन सुखावले क्षणी मनात माझिया तुळशी वृंदावन उमटून गेले नजर भिडताच कस्तुरीगंधित काया किंचित थरारली रुपसंपन्न मृगनयनी नवतारुण्य अवचित अवगुंठले प्रयास तो अनुराग लपविण्याचा किती निष्फळ नजर अन् मनातील द्वंद्व पहा लख्ख दिसू लागले
काव्यरस

ब्रॉयलर कोंबडी सारखे हे शहर ....!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 09/05/2011 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
हे शहर झालेय ब्रॉयलर कोंबडी सारखे गुबगुबित देखणे तरी सत्वहीन नुसतेच मास अंगावर बेचव नि अळणी संस्कृतीहीन झालेय हे शहर नि येथला निसर्ग देखील कृत्रिम झालाय नुसतीच फुले आकर्षक गंधहीन .........! सुजत चाललय हे शहर वाढत चाललय बाद्लीबाद्लीने ओतली जातात येथे माणसे नकोतितक्या भन्नाट वेगाने कोण कुठली ...? बिन चेहर्याची .....
काव्यरस