Skip to main content

षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ कर..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 14/07/2011 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर विसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर वेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला वेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे ना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर!! षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!" षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा च
काव्यरस

नवीन लॅपटॉपबाबत मदत हवी आहे.

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी बुधवार, 13/07/2011 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझा सध्याचा लॅपटॉप बराच जुना झाल्यामुळे नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार आहे. मला core i5/i7 (, 4GB RAM, 500 GB HDD, DVD RW, BLUETOOTH, WIRELESS LAN, MIN. 3 USB PORTS, 14/15 INCH SCREEN असलेला लॅपटॉप हवा आहे. पण मला विन्डोज नको आहे. आपण मला सदर फ़िचर्स असलेल्या लॅपटॉपबाबत अधिक माहिती द्यावी. त्याबरोबरच थेट वेबसाईटवरून खरेदी करावी की दुकानांमधून, आपले अनुभव - सर्व्हीस व स्पेअर पार्टची उपलब्धता वगैरेबाबतही मार्गदर्शन अपेक्षित आहे. चैतन्य कुलकर्णी.

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/07/2011 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा
              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात.

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट?

लेखक धमाल मुलगा यांनी बुधवार, 13/07/2011 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :( ही बातमी खरी आहे काय? असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना! आपला, -(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.

प्रेम

लेखक amirohi यांनी बुधवार, 13/07/2011 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले, साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले...!
काव्यरस