Skip to main content

सृष्टीविज्ञान मासिक. ८५ वर्षे पूर्ण. हा १००० वा अंक

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 23/07/2011 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, हे आवाहन जर कोणाला इ-मेल ने आले असेल किंवा मिपाच्या धोरणात बसत नसेल तर उडवायला माझी अजिबात हरकत नाही. खाली दिलेल्या मासिकाला आज ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत यासाठी ते अभिनंदनास पात्र आहे. आपण सर्वजण त्यांचे अभिनंदन आणि आभारही मानूयात. या मासिकाचे संस्थापक श्री. गो.रा. परांजपे आपल्याला माहीत असतीलच. त्यांनी आकाशातल्या ग्रह तार्‍यांबद्दल जे पूस्तक लिहीले आहे तेच हे थोर गृहस्त. मराठीत एवढी वर्षे विज्ञानाला वाहिलेले मासिक चालवायचे सोपे नसावे. आपण सर्वांनी याची वर्गणी ( वा्र्षिक रु.

माझी बाग.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शनिवार, 23/07/2011 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात काही फुले बघीतली.बागेत काही न फुलणारी पण बागेची शोभा वाढवणारीही झाडे असतात. आज त्या झाडाबद्द्ल थोडे. १)विविध प्रकारचे क्रोटन.

दोन कविता ... श्री. महानोर

लेखक शरद यांनी शनिवार, 23/07/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन कविता .. श्री. महानोर. आज श्री महानोर यांच्या दोन कविता एकदम घेत आहे. एक कवी म्हणून ही निवड नव्हे तर एकच कवी दोन निरनिराळ्या व्यथा कशा उलगडवून सांगतो ते पहाण्याकरिता. पहिली व्यथा आहे एका खेडेगावातल्या मध्यमवयीन स्त्रीची. दुसरी आहे वृद्ध आईवडिलांची; ते खेडेगावातील असतील वा शहरातील, भारतातील वा अन्य कुठल्याही देशातील. या दृष्टीने दुसरी कविता/व्यथा जास्त व्यापक, जागतीक आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण ते खरे आहे कां ? ते तर बघूच.

स्लेजिंग झिंदाबाद

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 23/07/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वाईट गोष्टीची सुरुवात चांगाल्यातुन होते म्हणे. उदाहरणार्थ माफिया. माफिया सुरुवातीला शेतकर्यांची संघटना होती. असहाय्य, लुबाडल्या जाणार्या शेतकर्यांनी आपल्या बांधवांच्या हितरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी सुरुवातीला हत्यार हातात घेतले आणि मग रक्ताची चटक लागलेल्या बाघाप्रमाणे हळुहळु ही प्रामाणिक संघटना गुन्हेगारीकडे वळली. मूळ उद्देश विसरला गेला आणि लोकांना लुटणे हा धर्म बनला. स्लेजिंगचे थोडेफार असेच झाले. सुरुवातीला हा खेळ खेळीमेळीच्या वातावरणातच पार पाडायचा. नंतर स्लेजिंगच्या राक्षसाने उग्र रुप धारण केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे.

(आली माझ्या घरी ही गटारी )

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 23/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी सौंदर्यं यांची ही गाथा वाचली आणि आम्हाला ही आता तयारी करावी लागणार याची जाणीव झाली. आली माझ्या घरी ही गटारी सर्व पेयांची झाली तयारी मस्त रात्रही,धूंद वास हा,मी तर पेग भरावे दर वर्षी रे,वेग वेगळी घेऊन मी पहावे कीक जोरात बसे,काडी ओठी घुसे दोस्त लोकांची मैफल न्यारी आली माझ्या घरी ही गटारी !!! विदेशी मारता नको असता,भानही हरपून गेले तंगडी बुर्जी पापड आणून, जेवण भरपूर केले हर्ष दाटे उरी, मित्र आले घरी आज बनली चिकन तंदुरी आली माझ्या घरी ही गटारी !!! अमोल केळकर --------------------------------------
काव्यरस

संस्कार १: येतोच... आलोच....

लेखक नीधप यांनी शनिवार, 23/07/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं. आता सुरू झाली प्रतिक्षा. हॉलमधे बाकी भारतीय बैठक आहे आणि एखादीच खुर्ची. भारतीय बैठकीवर बसले असते तर परत चादर उस्कडली असती. मी खुर्चीवरच बसून रहायचं ठरवलं. सांगितल्या वेळेला अगदी आतूरतेने मी बेल वाजण्याची वाट बघत होते.

जालस्थ

लेखक विकास यांनी शनिवार, 23/07/2011 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! येनार येनार येनार! असे अनेक दिवस ऐकत असलेले "गुगल प्लस" जालावर अवतरले. काय मस्त आहे म्हणून सांगू त्या फेसबुकापेक्षा! कारण काय म्हणता? अहो, असे बघा, त्याफेसबुकावर फक्त मित्र करू शकतो आणि मग त्या मित्रांच्या (आणि आपल्या) भिंती रंगवत बसू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यात एकच गोष्ट सगळ्याच कनेक्शन्सना समजू शकते. मात्र, आमच्या गुगल प्लसचे तसे नाही बरंका! त्यात तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे वेगवेगळी वर्तुळे अथवा मराठी जालीय भाषेत कट्टे करू शकता. मग अ, ब, क, ला पार्टीस बोलावलेले ड, इ, फ, ला समजत नाही! वगैरे वगैरे. आता मी असे माझ्या नवीन कोर्‍या गुगल प्लसच्या वर्तुळात आनंदाने लिहीले.

मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 23/07/2011 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक चित्रकार... .... अमुक एका ठिकाणी पोचायचे म्हणून नव्हे, तर निव्वळ आवड म्हणून माळरानावर, राना-वनात भटकंती करणारा, जे आवडेल, ते चित्रात, शब्दात मांडणारा एक प्रवासी.... माझं जीवन हे सुध्धा अशीच एक निरुद्देश भ्रमंती... यात जे जे काही बघता-करता आलं, ज्यात मी काही काळ का होईना, रमून गेलो, त्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न ... चांदोबा, मेणबत्ती आणि निसर्ग .... इंदूर मध्ये ३० सप्टेंबर १९५१ रोजी जन्मलो. जन्मापासून सव्वीसाव्या वर्षापर्यंत माळव्यात, इंदुरात वाढलो, पण मध्यंतरी सातवी ते नववी महाराष्ट्रात सांगली जवळच्या माधवनगरात होतो.

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 22/07/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ "येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही" अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही.