Skip to main content

चित्रचक्कर क्रमांक १ ते २३

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 10/08/2011 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रचक्कर क्रमांक १: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात बाप स्वत: परधर्माच्या स्त्रीबरोबर विवाह करतो परंतू कालांतराने जेव्हा त्याचा पुत्र स्वधर्माच्याच स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा ती केवळ खालच्या सामाजिक स्तरातील आहे म्हणून या प्रेमाला बाप विरोध करतो. हा प्रेमपट कोणता? चित्रचक्कर क्रमांक २: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात लता मंगेशकरांनी एक गाणे मध्यंतरापुर्वी गायले आहे. तेच गाणे (म्हणजे धृवपद तेच आहे पण कडवी वेगवेगळी आहेत) चित्रपटाच्या शेवटच्या रिळात किशोरकुमारने गायले आहे. किशोरकुमारने गायलेले गाणे सोलो आहे.

मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं -

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 10/08/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
( मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं ) चाल : माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं मुंबैच्या दर्यामंदी जहाज बुडू जातं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं मुंबैच्या दर्यामंदी साचले काळं पानी खुपते दृश्य सारं, किनारा पाहुनी कोळंबी,बांगडा धोक्यात जीवं येतं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं ! नावेची सागरात, जोरात धडक होई एमेसी चित्रा हंसा, बुडूनी त्यात जाई 'रेसक्यू ऑप्रेशन' नेहमीच फेल होतं कचरा, ग्रीस, तेल पसरे चौपाटीतं बुडली फुटली, बुडली फुटली बुडली गं ! फसतो कोळी
काव्यरस

<<ज्योतिष - भाकीताचा पडताळा>>

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 10/08/2011 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी वर्तवलेले पोर्णिमेचे भाकीत खरे ठरतेय असे पे पर मधल्या बातम्यांवरून दिसत माझे भाकित "दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्‍याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल." पेपर म धली बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9540188.cms या जोडीला लंडन मधिल हिंसाचार आहेच... टिप - ही जाहिरात नव्हे

वामचा रस्सा आणि सुके (Eel fish)

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 10/08/2011 04:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईकडे हि वाम एकदम आवडती पाकृ आहे. आमच्याकडे हिला "वाम" म्हणतात, पण ह्याला दुसरे काही नाव असल्यास मला महित नाही. हि वाम नदित व समुद्रातही सापडते. नदीतील वाम समुद्रातील वाम पेक्षा छोटी असते. परवा, इथे मार्केट मधे फिरताना मला हि एकदम fresh वाम मिळाली. एवढी fresh वाम बघुन मी फक्त त्या मार्केट मधे उड्या मारायचे बाकी होते. ;) घरी त्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी हेच होते. त्याचीच पाकृ इथे देत आहे.

अंतर

लेखक निनाव यांनी बुधवार, 10/08/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
3

गेटवे

लेखक रामदास यांनी बुधवार, 10/08/2011 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मिपाच्या समृध्दतेत भर टाकावी असे माझ्या नेहेमी मनात असते . या विचारातून अनेक नविन लेखकांना मी येथे येण्याचे निमंत्रण देत असतो. ( कविवर्य अरूण म्हात्रे यांचे मिपावरचे आगमन हा त्या प्रयत्नाचा भाग होता.) सुप्रसिध्द चित्रकार श्री. प्रकाश बाळ जोशी (ईगतपुरीचा पाऊस हे चित्र त्यांचेच) यांची लेखक प्रकाश बाळ जोशी अशी ओळख मिपावर व्हावी असे मनात आल्यावर बरेच दिवस श्री.जोशी यांच्यासोबत मी चर्चा करीत होतो. प्रकाश बाळ जोशी टाईम्स ऑफ इंडीया या वृत्तपत्रात काम करतात. त्यापूर्वी अनेक वृत्तपत्रात ते सातत्याने लिखण करीत असत.

कानसेन कोण? २०११ - ४

लेखक मेघवेडा यांनी मंगळवार, 09/08/2011 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागील पानावरुन पुढे. विजेत्यांची नावे या तक्त्यातच अपडेटवली जातील याची नोंद घ्यावी. या भागात थोड्या पुढल्या काळातील गाणी देखील येणार असून हिंदी-मराठी असं कॉम्बिनेशन आहे. आता बिगरी का एम.ए. ते ठाऊक नाही ब्वॉ.. ज्याची त्याची जाण, समज, आवड, निवड इ. इ.

पुण्याजवळ आंदोलकांवर गोळीबार: सकाळ ची बातमी कुठे ?

लेखक निमिष ध. यांनी मंगळवार, 09/08/2011 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याजवळ जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार करून यात ४ लोकांचा मृत्यू झाला. ही बातमी मला आय बी एन वर पण सापडली. म टा ची तर मुख्य बातमी आहे. मग पुण्यातले वर्तमान पत्र असून सकाळ गप्पा का ? की आपल्या पक्षाच्या नेत्याला वाचवायचा प्रयत्न आहे ? (मला हिंसक आंदोलकांचे समर्थन करायचे नाही.

तुम्ही नारळासारखे आहात..किंवा फणसासारखे..

लेखक गवि यांनी मंगळवार, 09/08/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
जे ज्योतिषी शास्त्राचा अभ्यास करून अचूक भविष्य सांगतात त्यांना सादर वंदन करुन अन्य होतकरु रोजगारेच्छुक तरुणांसाठी एक स्वयंपूर्ण व्यवसायप्रस्ताव सुचवू इच्छितो. तुम्ही चेहरा पाहून भविष्य सांगण्याचा व्यवसाय सुरु करा. गंमत नाही. खरंच.. एकदा का एखादी व्यक्ती भविष्य जाणण्यासाठी तुमच्या समोर जातीने आली तर तुम्ही कसल्याही विशेष शास्त्राचा वापर न करता अत्यंत इंप्रेसिव्ह आणि "वॉव" व्हॅल्यू असलेलं कथन करु शकता. याचा मूळ ज्योतिषशास्त्राशी काही संबंध लावू नये किंवा ज्योतिषी असेच वागत असतील असा दावा करु नये.

भविष्य वर्तवणार्‍यांना आव्हान....इत्यादि...इत्यादि

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/08/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आपल्या येथील एका सदस्यांनी त्यांची सतत हेटाळणी होत आहे या समजामुळे ज्योतिष्यशास्त्रासाठी आव्हान स्विकारले आहे. त्यासाठी त्यांनी काही फीही आकारायची ठरवले आहे व ती परत मिळणार नाही असेही जाहीर केले आहे. त्याचे कारण त्यांनी त्यांना या सगळ्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत त्यासाठी ते पैसे त्यांना मिळाले पाहिजेत असे जाहीर केले गेले आहे. एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की हे कार्य कोणाच्या घरचे नसून या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या विरूद्ध दंड थोपटून उभे रहायचे कोणाला वैयक्तिक कारण असेल असे मला वाटत नाही.