सुट्टी संपली -
सुट्टी संपली दिवाळी झाली
घण घण घंटा ऐकायची
दप्तर पाठीवरती टाकुन
तुरू तुरू घाई पळायची !
पाठांतर अभ्यास परीक्षा
वेळच गुंतुन जाण्याची
शुद्ध न राहिल शाळेमध्ये
डबा उघडुनी बघण्याची !
नवीन कपडे खेळ नवे
नीट नेटके जपण्याची
सुट्टीमधली सवय रहावी
रोज पहाटे उठण्याची !
शंकरपाळी चिवडा लाडू
चकली शेव करंजीची
वर्षामधला धमाल सण
आठवण नुसती करायची !
शाळेमधुनी दमून येता
निवांत स्वप्ने पहायची
पुढल्या वर्षी किती फटाके
चक्रे झाडे आणायची ?
मिसळपाव
प्रचंड धाप लागलेल्या अवस्थेत, तो रडत-खडत, कसाबसा, पाण्याबाहेर आला, अंगातील कपडे शरीराला घट्ट चिकटले होते. चालताना सैल होणार्या पॅन्टच्या बॉटममधुन पाणी गळत होते, मुरुममिश्रीत मातीत वाहणार्या पाण्यामुळे त्याच्या बुटांचा " छपाक-छपाक " असा आवाज येत होता.