लेखकविकासयांनी गुरुवार, 24/11/2011 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
तीन वर्षांपूर्वीचा हाच बुधवार. चार दिवस सलग थँक्सगिव्हींगची सुट्टी म्हणत घरी येण्यासाठी लवकर निघालो होतो. गाडीत रेडीओ लावला तेंव्हा ओझरती बातमी आली होती की मुंबईत कोण्या एका बंदूकधार्याने गोळीबार केला म्हणून. सुरवातीस काहीतरी स्थानिक असेल असे वाटले. पण घरी जाईस्तोवर लक्षात आले की हा काहीसा अतिरेकी हल्ला आहे.... आणि नंतरच्या तासाभरातच त्याचे गांभिर्य हे जास्तच समजले कारण तो पर्यंत करकरे, साळसकर, कामटे यांच्या हत्येची बातमी देखील समजली होती. पुढचे अनेक दिवस हे सर्वच भारतीयांना आणि जागतीक माध्यमांमुळे कुठल्याही संवेदनाशील मनाला अस्वस्थ करणारे ठरले होते.
लेखकपाषाणभेदयांनी गुरुवार, 24/11/2011 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
कला बघा कलाकारांची
डोंबारी - छायाचित्रः पाषाणभेद
मायबाप हो तुम्ही कला बघा कलाकारांची
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||धॄ||
गावोगाव फिरावं उन्हातान्हात राबावं
मिळलं ते खावं अन जमंल तसं रहावं
नाही हक्काचं ठिकान आम्हां
दोन हात करतो जिंदगीशी
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||१||
दोरीवरून चालणं नशीबी आलं
ढोलकी वाजवत बालपण चाललं
कालचा दिस गेला आजचा चालला
कठीण परीक्षा काळाची
अंगम
लेखकअश्फाकयांनी बुधवार, 23/11/2011 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण ३-४ वर्शा पुर्वी ही छान कविता वाचली होती , आज सहजच चाळ्ता चाळता सापड्ली , आपन बहुतेक वाचली असेल ,
कवी माहीत नाही.
एका सागराची कथा
एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली
'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?
लेखकसदानंद ठाकूरयांनी बुधवार, 23/11/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
फिक्सड् मँच्युरिटी प्लान - एफएमपी
फिक्सड् मँच्युरिटी प्लान्स हे निश्र्चित कालावधी डेब्ट योजना (Close Ended Income Schemes) या प्रकारच्या योजनेत गणल्या जातात यांच्या मुदतपुर्तीचा कालावधी अगोदरच जाहिर केला जातो, सर्वसाधारणपणे या योजना स्टॉक मार्केटवर नोंदवल्या जातात.
लेखकअन्या दातारयांनी बुधवार, 23/11/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागे हरिपूरला जाऊन आल्यावर हा लेख लिहिला होता. लेखाचा सूर थोडासा नाराजीचा असल्याने फोटो टाकायचे टाळले होते. आज सहज कॅमेरा मेमरी कार्ड स्कॅन करता करता तिथले फोटो सापडले.
लेखकnavinavakhiयांनी बुधवार, 23/11/2011 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
खळखळणारे पाणी भिडे कातळाला
सांगे गुज मनीचे त्या स्थितप्रज्ञाला
तोही मग हलकेच घेई कवेत त्याला
पाणीही मग सरसावे आलिंगनाला
हळुवार बोलणे त्यांचे वाटे खळाळता झरा
शुभ्र लाटाही मग उठाती त्यांच्या साथीला
चाले संवाद त्यांचा क्षणोक्षणी, दर एक ऋतूत
निसर्गही मग देई दाद त्यांच्या मैत्रीला
लेखकnavinavakhiयांनी बुधवार, 23/11/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहज असे वाटले कि स्वप्नांच्या गावी फिरून यावे .. थोडेसे आठवणींचे गाठोडे घेऊन एकटेच बाहेर पडावे .. निवांत स्वतः स्वतःला शोधून पाहावे. काही तरी जुने फिरून नव्याने मिळते का पाहावे .. नाही जरी मिळाले तरी जुने विश्व पुन्हा एकदा अनुभवावे ..
म्हणून मग आठवणींचे गाठोडे उघडून बसले नि - त्यात कधी हरवून गेले माझे मलाच कळले नाही. स्वप्नांच्या गावी जाण्याची गरजच जणू उरली नाही. जुनीच स्वप्ने पुन्हयांदा नवी वाटू लागली.
मला पण माझी भीती वाटू लागली. पण स्वप्नेच ती किती वेळ सुखावण्याची ताकद असणार त्यांच्यात ?? परिस्थितीचे भान दिल्याशिवाय ती तरी कशी सत्यातून जाणार ?
मी पण मग हट्टाला पेटले.