Skip to main content

अर्घ्य

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 14/12/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
हव्या हव्याशा वाटणा-या रत्नांना नकोनकोशा वाटणा-या लहरी वाहून नेतात मागे ठेवून जातात एक काळपट तवंग आणि पेरून जातात काही नवीन रत्न; खिजवायला कुणा तिस-याच्या किना-यावरून खेचून आणलेली. त्याच किना-यावर त्याच लहरींना आज वाह्तोय हे अर्घ्य न गवसलेल्या मोत्याचं श्रद्धा म्हणून नाही, वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची मुजोरी संपवण्याचा एक प्रयत्न म्हणून.
काव्यरस

झाड

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/12/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
झाड
आजकाल कुणी सावलीत येत नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||धृ|| गेली कित्येक उन्हाळे सावली देत आहे उभा; कोरडे ठेवीले वाटसरूंस पावसाळ्यात सुध्दा; हिवाळ्यात केवळ निष्पर्ण होउन जाई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||१|| खोड जुन वाढले फांद्या जुन्या झाल्या; त्या मुळी न मातीत नव्याने रूजल्या; नवी पाने फुलूनी धुमारे येणार नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||२|| कधी गळते दुजे पान पहिल्यासारखे; मातीत मिळूनी होते ते मातीसारखे; त्या पानांसारखे माझेही पान होई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||३|| - पाषा

ओरिगामी प्रदर्शन - टिळक स्मारक मंदिर, पुणे.

लेखक उदय के'सागर यांनी मंगळवार, 13/12/2011 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर महिन्यात (३ ते ६ नोव्हेंबर) टिळक स्मारकला ओरिगामी प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनातील ओरिगामीच्या काहि कलाकृती इथे टाकत आहे. प्रदर्शनात फोटो काढण्यास सक्त मनाई असेल (नेहमीप्रमाणे) असे वाटल्याने कॅमेरा जवळ नव्हता, म्हणुन मग मोबाईलच्या कॅमेरानेच फोटो काढले होते त्यामुळे ते आहेत तसेच गोड मानुन घ्यावे :) पण जे मिपाकर काहि कारणास्तव प्रदर्शनला जाऊ शकलेच नाहि त्यांसाठी "हेहि नसे थोडके" नाहि का :) मिपाकर - सुधांशु नूलकर ह्यांनी प्रदर्शना बद्दल मिपावर मिहिती पुर्ण धागा आधिच टाकला होता. दिलेल्या माहिती बद्दल त्यांचे मनापसुन धन्यवाद! १.

भारताची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे काय?

लेखक प्रदीप यांनी मंगळवार, 13/12/2011 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
रॉयटर्स वृत्तसंस्थेचा अलिकडील एका लेख अस्वस्थ करणारा आहे. लेखातील निदान बरोबर असेल, तर भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे असे दिसते. मूळ लेखाचा दुवा येथे देतो. व थोडक्यात त्यातील मुद्दे मांडतो. http://www.reuters.com/article/2011/12/05/us-economy-india-funding-idUS… कमीकमी होणारे उत्पादन, व हाताबाहेर जाणारी महागाई ह्यांमुळे भारताच्या आर्थिक परिस्थितीवर ताण आहेतच. (गेल्या वर्षांत अनेकदा आक्रमकपणे इंटरेस्ट रेट्स वाढवूनही महागाई कमी होण्याची लक्षणे नाहीत).

द्वंद्व.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 13/12/2011 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
द्वंद्व स्वर्गात शंकर-पार्वती आपल्या आसनावर विराजमान असताना खाली पृथ्वीवर पहात होते आणि पार्वतीच्या नजरेस एखाद गरीब ब्राह्मण पडतो आणि मग पुढे ती गोष्ट चालू होते.... अशा अनेक गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतील. वरून बघतांना त्यांना आता ही शहरे कशी दिसत असतील आणि त्यात त्यांना माणसे दिसत असतील का ? असा प्रश्न माझ्या मनात नेहमीच उभा रहातो. मला तर वाटते त्यांना ही शहरे एखाद्या मुंग्यांच्या वारूळासारख्या दिसत असतील. सध्या जसा मुंग्यांच्या वारूळाचा अभ्यास करण्यासाठी काचेच्या पेट्या असतात त्याप्रमाणे तेही खाली असलेल्या या मुग्यांच्या वारूळाचा अभ्यास करत असतील का ?

युलीप बाबत काय करावे? तुमच्या फायद्यासाठी अवश्य वाचा व प्रतिसाद द्या.

लेखक सदानंद ठाकूर यांनी मंगळवार, 13/12/2011 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
युलीप बाबत काय करावे? वय वर्षे ३५ पर्यंतचे व्यक्तीने शक्यतो टर्म इंशुरन्स माध्यमातून जिवन विमा घ्यावा व गुंतवणूक आपल्या जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार करावी, जर शेअर बाजाराची जोखीम स्विकारण्याची तयारी असेल तर म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत गुंतवणूक करावी जर कमी जोखीम स्विकारावयाची असेल तर म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत गुंतवणूक करावी व जर अजिबात जोखीम स्विकारावयाची नसेल तर बँक/पोष्टाच्या ठेवी, पीपीएफ आदी सुरक्षीत गुंतवणूक पर्यायांमध्ये करावी.

भावपूर्ण श्रध्दांजली

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी मंगळवार, 13/12/2011 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर १० वर्षांपूर्वी आज भारताच्या संसदभवनावर दहशतवाद्यांनी अतिभयंकर हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षारक्षकांनी जोरदार प्रतिकार केला आणि केवळ म्हणून ते आत घुसले नाहीत आणि आपण मोठ्या संकटातून वाचलो. त्या दिवशी देशासाठी प्राणार्पण केलेल्या सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली. इतकी वर्षे झाली तरी या हल्ल्याचा सुत्रधार अजून जिवंतच आहे. त्याला लवकरात लवकर फासावर लटकवावे ही इच्छा. पुण्याचे वटवाघूळ

मुगाच्या डाळीचा हलवा ...

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 13/12/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
मुगाच्या डाळीचा हलवा
साहित्य : २ वाट्या मुग डाळ , २ वाट्या साखर ( पिठीसाखर ) , काजू १०-१२, बदाम १०-१२ , मनुके २०-२५ तूप अर्धी वाटी ( साजूक असेल तर उत्तम ),इलायची पावडर अर्धा छोटा चमचा , दुध अर्धी वाटी (ऑप्शनल) कृती : मुगाची डाळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यात किमान दोन तास भिजत घाला , नंतर डाळ कोरडी करून मिक्सिमध्ये दरदरीत वाटून घ्या ,(अगदी पुरणासारखी केली तर हलवा गिचका लागतो ) एका कढईत २ चमचे तूप घाला ,त्यात डाळीचे मिश्रण घ

जीवघेणा फास

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 13/12/2011 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याश्या सावळीला, सावळ्याचा ध्यास आहे सांग कां तो सावळ्या रंगी, निळासा भास आहे भेट होता, सावळी ती जाहली कांती तुझी गं गोरट्या रंगात त्या, आता निळ्याचा वास आहे माळ माळूनी अबोली, सावळ्याला साजिरीशी गंध नाही त्या फुलांना, 'ती' तरीही खास आहे सावरुनी घे जिवाला, काय हा वेडेपणा गं लाजलाजूनी उरी हा, मोहणारा श्वास आहे मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (११/१२/२०११) मात्रा: गालगागा गालगागा गालगागा गालगागा वृत्त: व्योमगंगा
काव्यरस

प्राचीन भारतः पाताळेश्वर लेणी

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 12/12/2011 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
पाताळेश्वर-पुण्यात भर गर्दीतल्या जंगली महाराज रोडवर असलेला हा कातळकोरीव ठेवा फारश्या कुणाच्या खिजगणीत नसलेला. हा वसलेला आहे जंगली महाराज मंदिराच्या अगदी शेजारीच. पाताळेश्वराला याधीही भरपूर वेळा चकरा झालेल्या होत्या पण यावेळी काही मिपाकरांना बरोबर घेऊन जायचे ठरले, खरडाखरडी, फोनाफोनी झाल्यावर धनाजीराव वाकडे, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त आणि त्यांचे एक स्नेही श्री. सुहास फडके हे ठरलेल्या वेळेवर बरोबर ४.३० वाजता जंगली महाराज रोडवर पोचते झाले. प्रवेशद्वारापाशीच व्यालप्रतिमा आणि कळसाचे काही अवशेष ठेवलेले आहेत.