Skip to main content

भावपूर्ण श्रध्दांजली

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी मंगळवार, 13/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
बरोबर १० वर्षांपूर्वी आज भारताच्या संसदभवनावर दहशतवाद्यांनी अतिभयंकर हल्ला केला. या हल्ल्यात सुरक्षारक्षकांनी जोरदार प्रतिकार केला आणि केवळ म्हणून ते आत घुसले नाहीत आणि आपण मोठ्या संकटातून वाचलो. त्या दिवशी देशासाठी प्राणार्पण केलेल्या सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली. इतकी वर्षे झाली तरी या हल्ल्याचा सुत्रधार अजून जिवंतच आहे. त्याला लवकरात लवकर फासावर लटकवावे ही इच्छा. पुण्याचे वटवाघूळ

वाचने 5157
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

>>>>>>>इतकी वर्षे झाली तरी या हल्ल्याचा सुत्रधार अजून जिवंतच आहे. त्याला लवकरात लवकर फासावर लटकवावे ही इच्छा. या वाक्याने चर्चेची दारे पुन्हा उघडली आहेत. असो. आपल्या मा. राष्ट्रपतींना सही करायला वेळ मिळाला की पुढे कधीतरी शिक्षेची अंमलबजावणी होइल असी भाबडी आशा आहे.

तुमची इच्छा इतक्यात पुर्ण होणार नाही..... त्या हल्ल्यात एखादा तरी नेता मेला असता, तर त्याला फाशी झाली असती निदान छुपा एन्काऊंटर तरी ....

In reply to by सुहास झेले

त्या हल्ल्यात एखादा तरी नेता मेला असता, तर त्याला फाशी झाली असती निदान छुपा एन्काऊंटर तरी .... हेच म्हणतो. एखाद्याची तरी विकेट जायला हवी होती.

In reply to by सुहास झेले

त्या हल्ल्यात एखादा तरी नेता मेला असता, तर त्याला फाशी झाली असती निदान छुपा एन्काऊंटर तरी काही वेळा असेच वाटते पण तरीही.. राजीव गांधीच्या मारेकर्‍यांना शिक्षा केव्हा झाली?

In reply to by देवदत्त

शिक्षा जाहीर झाली आहे पण अंमलबजावणी नाही झाली. राजकारण चालू आहे. |( \( :angry:

भावपूर्ण श्रध्दांजली.
केवळ म्हणून ते आत घुसले नाहीत आणि खासदार मोठ्या संकटातून वाचले.

...त्या दिवशी देशासाठी प्राणार्पण केलेल्या सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली ते सुरक्षारक्षक त्या ह्ल्ल्याच्या सुत्रधाराची वर येण्याची वाट पहात असतील कदाचित्...सूड घेण्यासाठी. त्यान्ची इच्छा पूर्ण व्हावी. ती पूर्ण होइल का ????? इतका महत्वाचा विषय मान्डल्याबद्दल व आठवण करुन दिल्याबद्दल ' पुण्याचे वटवाघूळ ' तुमचे आभार. विनोद१८

In reply to by डावखुरा

>>लवकरच अफजल आणि कसाबला श्रद्धांजली वाहण्याचीही संधी मिळो ही ईच्छा.. आम्ही नाही बुवा अफजल आणि कसाबला मेल्यावर "श्रद्धांजली" वाहणार.

आपले सुरक्षा जवान पण ना... ! त्या संसद भवन मध्ये सगळे हलकट नेते असतात हे माहित असूनही त्यांना वाचवायला जीव धोक्यात घातला आणि मेले...! घुसू द्यायला हवं होतं एखाद्या अतिरेक्याला आत मध्ये.. एखादातरी नेता मेला असता तर निदान कसाबला पोसावंसं वाटलं नसतं नंतर! सगळ्या जवांनांना आदरांजली!!

In reply to by प्राजु

कालच फेसबुकवर एकाचा स्टेटस पाहिला. "Dear God,Your love for films (Shammi Kapoor and Dev Anand), music (Jagjit Singh and Bhupen Hazarika), art(M.F. Hussain) and technology (Steve Jobs) is now beyond all doubt. We suggest to take keen interest in Politics too"

शहिद सुरक्षारक्षकांना भावपूर्ण श्रध्दांजली ..........!!!!!!! हल्लेखोरांना लवकरात लवकर फाशी होवो ही समस्त भारतवासियांची ईच्छा परमेश्वराने पूर्ण करावी..........!!!!!!!! --" भा र त माता की जय " !!!!!!!! --