Skip to main content

राजीव दिक्षित - ??

लेखक यकु यांनी शुक्रवार, 16/12/2011 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
सातवी-आठवीत असताना एकदा घरात राजीव दिक्षीतांच्या ''आजादी बचाओ आंदोलन'' च्या वीस कॅसेट्सचा संच (1996-97) दाखल झाला. हिंदी वक्तृत्वाची ओळखच राजीव दिक्षीत यांच्या भाषणातून झाली. कितीतरी दिवस घरात त्या कॅसेट लावल्या जायच्या आणि राजीव दिक्षीतांचे विचार, त्यांचा इतिहासाचा अभ्यास आणि एक स्वातंत्र्यप्राप्त 'देश' म्हणून भारतात होत नसलेल्या गोष्‍टींची तळमळ शब्दाशब्दातून दिसायची. राजीव दिक्षीतांची भाषणे ही काही फक्त राणा भीमदेवी थाटाची बाजारू भाषणे नव्हती - त्यांच्या प्रत्येक मुद्याला इतिहासातील साधार विवेचन, संदर्भ, विश्लेषणाची जोड असे.

सायंकालीन छटा....

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शुक्रवार, 16/12/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकालीन छटा आजकाल तीच्या चेहर्‍यावर प्रतिबिंबित होत असतात आणि त्या छटा पाहुन मला अग्निज्वालांनी होरपळत असलेल निर्वात अंतरिक्ष स्वप्नात दिसते आणि मी जागा होतो आणि कुणा मदमत्त जोडप्याला हवी हवीशी रात्र मला भयाण वाटु लागते आणि मी ती स्मशान शांतता भंग पावु नये म्हणुन तोंडावर हात ठेवुन मी आक्रोश करु लागतो आणि शेवटाच्या विश्वापर्यंत जाउन येतो आणि त्याच वेळेला देवळाच्या गाभार्‍यात माझ नाव घुमत असत आणि विश्वेश मात्र शांतपणे बसलेला असतो बेहेरे मकरंद ११०२२०८०

हाती कळ्याच माझ्या

लेखक मकरन्दबेहेरे यांनी गुरुवार, 15/12/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
हाती कळ्याच माझ्या सजवून साथ गेली फुलवून त्या कळ्यांना उमलून रात गेली आता कशास होती संवाद गूज गोष्टी करुनी मुक्या मुक्याने सहजात बात गेली होते नभात तेव्हा अगणित लाख तारे दावून ती दिशाही कोन्यात वात गेली झाली युगा युगांची शेजेत भेट जेव्हा लाजून ती निशाही अडवून हात गेली हरलो कसा कळेना गाफील राहिलो मी माझी प्रियाच तेव्हा देऊन मात गेली बेहेरे मकरंद ११०२६०११

"निषेधकर्ता" च्या निमित्ताने

लेखक विकास यांनी गुरुवार, 15/12/2011 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
टाईम मॅगझीन या साप्ताहीकाच्या दर वर्षाअखेरीस प्रसिद्ध केल्या जाणार्‍या "वर्षातली व्यक्ती" अर्थात "Person of the Year" ला खूप प्रसिद्धी मिळते. १९२७ सालापासून सुरू केलेल्या प्रथेमध्ये केवळ अमेरीकन व्यक्तीच, किंबहूना केवळ व्यक्तीच असते अशातला भाग नाही. १९८२ साली Machine of the year म्हणून संगणकाचे छायाचित्र आले (थँक्स टू अ‍ॅपल) तर १९८८ साली Planet of the year असे म्हणत प्रदुषणाने विनाशाकडे वाटचाल होऊ शकते या विचारांचे समर्थन करत "पृथ्वी"स पुढे केले होते.

(ऐल-पैल)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/12/2011 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिथयश कवयित्री क्रांतीतैंचं अप्रतिम काव्य 'ऐल-पैल' वाचलं आणि मी सैरभैर झालो! मग काय आपोआप दाद निघालीच मनातून! ईर्शाद!! ऐल मळे पैल खळे भेटू मी कुठे, ना कळे टाकता पाऊल वळे बापूस माघारी! ऐल दिवा पैल वात भेट नाही पंध्रवड्यात आहे काळोख घरात खवीस दारी! ऐल साद पैल जाई चिंच फोक चोप देई ओरडा घुमत जाई भर बाजारी! ऐल 'चंद्रा' पैल 'निशा' अभिलाषा दशदिशा धुमसतात वेड्यापिशा पेटल्या सिगारी! ऐल जान पैल सखी बाप 'गाजरपारखी' दमदाटी हो सारखी 'वळ' 'माघारी'! ऐलपैलाच्याही पार तुझ्या परसाचे दार त्याच्या पायरीशी प्यार दे गं दुपारी! -चतुरंग
काव्यरस

मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..?

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी गुरुवार, 15/12/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
दार वाजू लागले.. पण दिसत तर कुणीच नव्हते... दुकानदाराला वाटले भास झाला असावा.. दार पुन्हा वाजले .. मग त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर एक धिप्पाड, मोठ्ठा, अल्सेशियन कुत्रा त्याच्या दुकानाचे दार ठोठावत होता.. त्याने त्याला लगेच हुसकून लावले....तरी पुन्हा तोच सीन.. कुत्रा त्याच्या दुकानाचे दार वाजवत होता.. मग त्याने नीट पहिले तर त्या कुत्र्याच्या तोंडात एक पिशवी होती..

ऐल-पैल

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 15/12/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
ऐल मळा पैल तळे जायचे कुठे ना कळे टाकता पाऊल वळे पुन्हा माघारी ऐल दिवा पैल वात भेट नाही आयुष्यात मिट्ट काळोख घरात अवस दारी ऐल गंध पैल जाई मधे गूढ खोल खाई आक्रोश घुमत जाई कडेकपारी ऐल चंद्र पैल निशा घेरतात सुन्न दिशा घुमतात वेड्यापिशा स्वप्नांच्या घारी ऐल प्राण पैल सखा जीव भेटीला पारखा खुपतो काट्यासारखा सल जिव्हारी ऐलपैलाच्याही पार तुझ्या महालाचे दार त्याच्या पायरीशी थार दे रे मुरारी
काव्यरस

'गरुडांच्या सहवासात'

लेखक नजदीककुमार जवळकर यांनी गुरुवार, 15/12/2011 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रान्नो, नमस्कार.. श्री. रघुनाथ भिडे यांनी लिहिलेले 'गरुडांच्या सहवासात' नावाचे आत्मकथन वाचले. फार मस्त आहे. पण पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की संपूर्ण अनुभव कथन करता आला नाही. पुस्तक अवश्य वाचावे आणि तुम्ही त्यांचे original लिखाण वाचले असेल तर कृपया share करावे हि विनंती. धन्यवाद !!