Skip to main content

MI 4 Ghost Protocol

लेखक snowy यांनी शुक्रवार, 16/12/2011 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिशन इम्पॉसिबल 4 हा ह्या सिरीजमधला चवथा चित्रपट. इथन हंट ( टॉम क्रूज ) व त्याचे सहकारी एका महत्वाच्या कागदपत्रास हस्तगत करण्यासाठी क्रेमलिन ला जातात पण तिथे विस्फोट होतो . त्याचा ठपका IMF वर ठेवला जातो. संपूर्ण IMF वर बंदी लादन्यात येते. त्यात सेक्रेटरी चा मृत्यू होतो.

रानातल्या फुलांचा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 16/12/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
जागु ताईंनी कलादालनात आजवर प्रस्तुत केलेल्या सर्व रानफुलांच्या दर्शनातुन ही कविता जन्माला आली आहे.मला या कवितेतनं ही कविता ''माझी आहे'' असं श्रेय नको आहे,तेंव्हा ही कविता कशी कडु/गोड जमली असेल तशी त्या रान फुलांनाच अर्पण करतो. रानात जाउनी मी होइन या फुलांचा सहवास देवतांच्या बागेतल्या मुलांचा... किती रंगरुप त्यांचे व्हावे मनात गोळा भरगच्च रानराइ वाटे ही सांब भोळा मी एकटाच त्यांची बांधेन देवळेही परि मुळ तत्व त्यांचे आहेच देवळे-ही राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला त्याचीच रूपकेही त्याने प्रतीत केली आंम्ही खुळ्या जनांनी भक्तीत सोय केली सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त
काव्यरस

रस्सा...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 16/12/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
(..चाल.. कोणतीही..) विचारमैथुन चालू असावे जेव्हा काही कामच नसते कचेरीमधे लेखन प्रसवत चोप्य पस्ते..चोप्य पस्ते.. (...चाल बदलून...) अंगलटीला उलटुन येता प्रतिक्रियांच्या पचपच पिंका ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका पेरुन द्याव्या विकीलिंका.. (..चलन बदलून...) बोटावरची थुंकी बदलणे रुमाल टाकुन जागा धरता प्रकाटाआ डुकाटाआ अशक्य होईल बूच मारता. (..चालचलन आणि वृत्त बदलून..) अच्रत ब्वलत शीबै नैकै पुलेशुभेच्छुक पुभालटा तर्रीभरला शाब्दिकरस्सा इथे उकळतो रटारटा.. (.. चाल सोडून...) डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला.. ..............................
काव्यरस

वैष्णवेर क्रियामुद्रा....*

लेखक हरिकथा यांनी शुक्रवार, 16/12/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या ईशान्य भागातील त्रिपुरा प्रदेशामध्ये अनेक वर्ष राजेशाही होती. गेल्या शतकामध्ये तिथे श्रीवीरचन्द्र माणिक्य यांचं राज्य होतं. महाराज वीरचन्द्र हे एक निराळंच व्यक्तिमत्व होतं. महाराज आचार-विचाराने वैष्णव होते. त्यांच्या घराण्यामध्ये गौर संप्रदायी भक्तीची परंपरा होती. राजकार्य करत असूनही ते यथाशक्ति यथासंभव भगवत् भजन करायचे. त्यांच्या राज्यकारभारावरही वैष्णव पद्धतीचा पगडा होता. ते स्वतःला विष्णुंचा प्रतिनिधी मानून कारभार करायचे. प्रजेवर पुत्रवत् प्रेम करायचे आणि कायम तिच्या क्षेमकुशलाची चिंता वाहायचे. त्यांची प्रजाही त्यांच्यावर खूप प्रेम करायची.

हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम....

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी शुक्रवार, 16/12/2011 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम.... .. वणव्यात पेटलेली, वस्ती अजून बाकी, जाळून पीळ गेला.... रस्सी अजून बाकी..! हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम, दोस्ती उजाड झाली, बस्ती अजून बाकी..!

पुन्हा एकदा

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 16/12/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
दुलई धुक्याची अंगावर दंव निळी ओढणी गूढ नभावर कौलांवरती वलये धुराची ऊब पांघरुन जो तो भूवर झिरमिळ पालव रेशिम इरकल चित्र नव्हाळे लज्जित कणभर गोत जिव्हाळा हा सृजनाचा मकर क्रांतिचा वारू मनभर चाहुल वा ही हूल म्हाणावी येते जाते तुडवित अंतर पाचोळा उधळित स्वप्नांचा पुन्हा एकदा झुलते अंबर ....................अज्ञात
काव्यरस

चित्र

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शुक्रवार, 16/12/2011 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दीवशी मी तीचे चित्र काढले रक्ताच्या लाल रंगाने समोरच्या कॅनव्हॉस वर, ज्यावर बर्‍याच अकृत्यांची गर्दी होती, त्यातील एका अबलक वारुला ती आवडली आणि तो तीला घेउन गेला कुठल्यातरी रम्य अरण्यात दूर दूर काही सुप्रसिद्ध तारे तारकांच्या साक्षीने जे जन्मत:च स्वयम्भू होते मी इतका शोकाकुल झालो की माझे अश्रु त्या कॅनव्हॉस वर पडले म्हणून मी घेतले तारेवर वाळत असलेले कापड ज्याने मी कॅनव्हॉसवरचे पाघळलेले रक्त पुसून काढले.... बेहेरे मकरंद ११०२२१६१

२०१३ बॉस्टन अधिवेशनाचे घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शुक्रवार, 16/12/2011 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
२०१३च्या बॉस्टन येथे होणार्‍या BMM अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ च्या अधिवेशनात विनामूल्य प्रवेश दिला जाईल. तसेच अधिवेशन स्मरणिकेत विजेत्या स्पर्धकाचे छायाचित्र प्रकाशित केले जाईल. ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतल्या सर्व मराठी/ अमराठी व्यक्तींसाठी खुली आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक आणि इच्छुक असलेल्यांनी आपले घोषवाक्य आणि/ अथवा प्रतीकचिन्ह, ३१ डिसेंबर २०११ पर्यंत श्रीनिवास साने यांना shriniwas.sane@bmm2013boston.com या इमेलवर पाठवावे.

वसा..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 16/12/2011 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा सहज यावे शब्द आणि भाव उमजावा जसा! आज कविते ये फ़िरूनी सांध शब्दांनी दुवा टाक उघड्यावर मनाला, अन जराशी दे हवा लख्ख झाल्या कल्पनेला दाव आता आरसा बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा पावसाच्या हालचाली, गर्द हिरवी वाटही प्रेम शृंगारात भिजली, तारकांची रातही अन पहाटेच्या मनावर, गोड उमटावा ठसा बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या वाहुदे जन्मांतरी मजला तुझा हा वारसा बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा -प्राजु
काव्यरस