शांतिनिकेतन
एवीतेवी बंगालमध्ये आलोच आहोत तर इथली काही ठिकाणे चुकवायची नाहीतच असे ठरवले होते (वर्ग सोडून ;) ) त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे गुरुदेवांचे शांतिनिकेतन (गुरुदेव म्हणजे फक्त रबिन्द्रनाथ ठाकूर). जरा माहिती काढली तर असे कळले की २३ डिसेंबरपासून पौष मेला चालू होतोय. हा चान्स सोडायचा नाहीच असे ठरवलेच होते.
कसे जायचे वगैरेची माहिती मित्राकडून व जालावरुन घेतली.
खडगपूर-बोलपुर (शांतिनिकेतन) हा निदान ५ तासाचा रेल्वे प्रवास आहे. हावडावरुन काही ट्रेन्स आहेत. पण खडगपूरहुन फक्त बेंगलोर-गुवाहाटी एक्सप्रेस जाते. लवकर पोहचावे म्हणून मी हावडा-बोलपुर असे एका ट्रेनचे तत्काल आरक्षण केले होते.
मिसळपाव