Skip to main content

इन ट्रान्सिट...

लेखक अभिज्ञ यांनी बुधवार, 28/12/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
टेंडरचे काम संपवून एअरपोर्टला पोहोचता पोहोचता रात्रीचे आठ वाजलेच.मुंबईला जाणारी रात्री साडे नऊ वाजताची फ़्लाईट पकडायची म्हणजे आधीच उशीर झाला होता.गडबडीत ऒन्लाईन चेक-इन करता आले नव्हते. ई-तिकिटावर कन्फ़मर्ड असे स्टेटस जरी दाखवत होते तरी मनात थोडी धाकधुक होतीच. सामानाचे स्कॆनिंग वगैरे सोपस्कार पार पाडून आत जातो तो काउंटर समोर हि भली मोठी रांग पाहून पोटात गोळाच आला.इतर फ़्लाइटना असलेली गर्दी पाहता इमिग्रेशन व सेक्युरिटी चेक संपवायला अर्धा एक तास सहजच लागणार होता. साडे नऊ ची फ़्लाईट म्हणजे किमान नऊ वाजता बोर्डिंग करणे आवश्यक होते.आताशा माझा धीर सुटायला लागला होता. त्याला कारणही तसेच होते.

विमा प्रतिनीध म्हणून काम करण्याची एक वेगळी व नवीन संधी

लेखक सदानंद ठाकूर यांनी बुधवार, 28/12/2011 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
विमा प्रतिनीध म्हणून काम करण्याची एक वेगळी व नवीन संधी विमा प्रतिनीधी म्हणून अनेक व्यक्ती चांगले उत्पन्न मिळवत असतात हे सत्य आहे मात्र यात बरेच कष्ट करावे लागतात हि वस्तुस्थिती आहे. बहुतेक वेळा विमा पॉलीसी गळ्यात मारली जाते. तसेच विमा हे काही गुंतवणूकीसाठी फार चांगले उत्पादन मानले जात नाही. टर्म इंशुरन्स हे जीवन विम्याचे शुध्द उत्पादन आहे मात्र एवढे एकच उत्पादन विकणे हे विमा प्रतिनीधीला पुरेसे उत्पन्न मिळवून देण्यास असमर्थ ठरते कारण याचा हप्ता कमी असतो व दुसरे म्हणजे लोकांमध्ये याची जागरुकता फारच कमी आहे.

आंदोलन आणि फलित

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 28/12/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज काही कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली. आज अण्णा हजारे उपोषणस्थळी उपस्थित नव्हते. तुरळक गर्दी होती सुमारे दोन हजार लोकांची. मंचावरून बहुधा मनिष सिसोदिया यांचे भाषण चालू होते.

कर्नाळा किल्ला तो पाहू..!!

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 28/12/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ४.१५ चा कर्ण-कर्कश गजर उशाशी ठेवलेल्या मोबाईलमध्ये वाजला धडपडून जागा झालो. पटापट सगळं आवरून बाईक काढली आणी मित्राला घेऊन पनवेलच्या वाटेला लागलो. मुंबईकरांना कधी तरी अनुभवायला मिळणार्या पहाटेच्या गुलाबी थंडीने चांगलाच जोर पकडला होता. समोरून वेगाने येणार्या हवेने पायाला आणी हातांना चांगलेच कणके बसत होते. पनवेलला पोहचेपर्यंत ६.१५ वाजले होते. दिलेल्या वेळेप्रमाणे स्पा त्याच्या मित्राला घेऊन कल्याण-शिळ मार्गे पनवेलला एस टी स्टँडला हजर होता. वाजणारी थंडी कमी करण्यासाठी 'कटिंग' ची ऑर्डर देण्यात आली. चहा पिताना थोड्याफार गप्पा चालू होत्याच मग त्या तात्पुरत्या थांबवून आम्ही निघालो.

काय करावे या किड्याला ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 28/12/2011 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे या किड्याला साला लिहिता लिहु देत नाही डोक्यात बरेच येत असते पण डोळ्यांना पाहु देत नाही. सुचत असते पान उघडल्यावर 'हे'...'हे'...लिहायचे.. पण बसले एकदा लिहायला की..ते-तेच का रहायचे..?
काव्यरस

कचरावाला

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 28/12/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , खुप दिवसानी मिसळपाव वर लिहित आहे ..खुप म्हणजे अगदी बरेच दिवस झाले .... इंजिनिअरींग ,त्यासोबत असणार्‍या अ‍ॅक्टिव्हिटीज आणि बरेच पालथे धंदे ...

अण्णा चक्रव्यूहातील अभिमन्यू !

लेखक आशिष अनिल म्हात्रे यांनी बुधवार, 28/12/2011 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
Anna Hajare महाभारताच्या युद्धात १६ वर्षीय अर्जुनपुत्र अभिमन्यू याने कौरवांच्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन, कर्ण, जयद्रथ इत्यादी कौरवांच्या महारथींना तोंड देत तरुण वयात एवढा मोठा पराक्रम केल्यामुळे भारताच्या इतिहासात अभिमन्यू अजरामर झाला. अधर्माच्या विरोधात धर्माने दिलेल्या या लढाईत धर्मासाठी अनेक रथी-महारथींनी पराक्रम केला. त्यांच्या पराक्रमामुळेच धर्माचा जय झाला. कौरवांच्या ११ अक्षौहिणी सैन्याचा केवळ ७ अक्षौहिणी पांडव सेनेकडून पराभव झाला.

मागे वळुन बघायच नाही

लेखक निश यांनी बुधवार, 28/12/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
समजावल आहे मनाला आता मागे वळुन बघायच नाही. जरी आला विचार अंतरी आठवणीत अडकायच नाही. झाली जखम मनाला तरी जखमी होऊन रडायच नाही. आपल सुख मिळाव आपल्याला तरी हे जरी असल खर तरी जगात कोणी कुणाच नसत हे खोट समजायच नाही. असेल ताकद लढायची तर हरलेला डाव नव्या उमेदीने उभा करुन परत कधी खचायच नाही. मागे वळुन बघायच नाही....

आठवतोस तू .....!!

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/12/2011 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
फोन हाती घेतल्यावर बघावा एखादा sms सेंड करावासा वाटावा , मग नकोच जाऊदे असे वाटावे , फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू ..... न चुकता करावा तुला फोन मग तू उगीचच काहीतरी बोलवे बोलता बोलता मग असाच वेळ निघून जावा ,फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .... बोलणे व्हावे खूप काही पण जेवढ्यास तेवढे असेच नेहमी, गप्पच असतात मग ते बोलणारे शब्दही ,फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू ..... अगदी पहाटे कधी पाऊस पडावा, तुझी आठवण येऊन चहा पिऊन झालेला असावा, आरसाही सकाळीच रुसलेला असावा,फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .....