Skip to main content

लग्नाआधी आणि लग्नानंतर!

लेखक दादा कोंडके यांनी शुक्रवार, 03/02/2012 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक मित्र लग्नाच्या फायनल बोलणीसाठी गावाला जाउन आला. लग्न अगदी ठरल्यातच जमा होतं म्हणून आल्यावर मी त्याच्याकडे पार्टी मागितली पण तो म्हणाला ऐनवेळी बोलणी फिसकटली. थोडसं खोदून विचारल्यावर कळलं की त्या मुलगीला :) लग्नानंतर एक दिड वर्षेतरी तीचा पगार तीच्या घरी द्यायचा होता. हुंड्याचा वगैरे तर प्रश्नच नव्हता आणि माझा मित्रपण पगार न-देण्याबद्दल आग्रही नव्हता. पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता. जे माझ्या मित्राच्या मते योग्य जस्टीफिकेशन नव्हतं. अजुन एक उदाहरण माझ्या ओळखीचं आहे.

शुद्ध माडी (फोटोसकट)

लेखक जागु यांनी शुक्रवार, 03/02/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
नारळाचे झाड म्हणजे कल्पतरूच. त्याच्या पात्या, खोड, नारळ, त्याचे साल, करवंटी अगदी सगळ्याचाच वापर करता येतो. नारळ पाणी म्हणजे तर अमृतासारखेच. नारळाची उंच ऐटदार झाडे कोकण किनार पट्टीवर दाटीवाटीने मिरवताना दिसतात त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बर्‍याच लोकांचे नारळ व नारळाच्या झाडापासून मिळणार्‍या इतर उत्पन्नांवर उपजीवीका चालते. नारळाच्या झाडाच्या पात्यांतील काड्यांपासून झाडू तयार होतो. झावळ्यांपासून चटई प्रमाणे झाप तयार करतात, नारळाच्या खोडाचा पुलासाठी उपयोग होतो. ही सगळी माहीती आपण अभ्यासक्रमात शिकतच असतो.

बिल्लेकर

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 03/02/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
"....अप्पांनी खास तुमाला आमंत्रन द्याय सांगतलय. नक्की याच." सकाळी सकाळी अतुलराज चा फोन. जरा धक्काच. अप्पांच्या एकसष्ठीचा मोठा सोहळा करायचे ठरलंय. त्याचे आमंत्रण करत होता. " अरे पण अप्पा तयार झाले कसे ? जरा आश्चर्यच वाटतंय. " "हा दादा, कमाल झाली खरी. गावाच्यानी या एळी पार हट्ट केला. शेवटी हुकमी एक्का गाठला. ताईसाकड गेले. ताईसा हो म्हणली. म्हणली करू. म्हणली मी मनौते अप्पास्नी.अप्पा म्हणले कुनी राजकारनी नको मंचावर तर तयार हुईल. ताईसा हो म्हणली. मग काय दिवाळीच.कारकान्याच्या मैदानवच ठुलाय पोग्राम. नक्की याव." ताईसा अप्पांची धाकटी मुलगी. वय असेल ३२ च्या आसपास. पण अख्ख्या गावची ताई.

आईपण

लेखक सुषमा आर्या यांनी शुक्रवार, 03/02/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
'आई' या शब्दातच सारं जग सामावले आहे. आईपण मिळण्यासाठी प्रत्येक स्त्री किती आसुसलेली असते. मी एका private हॉस्पिटलमध्ये assistant customer care म्हणून जॉब करत होते. तिथली माझी सहकारी आणि मैत्रीण कविता. कविताचा नववा महिना संपत आला होता. हॉस्पिटलमध्ये स्त्री कामगारांना insurance policy द्वारे बाळंतपणाचा खर्च मिळत असे. त्यामुळे ती निश्चिंत होती. त्या दिवशी telephone operator न आल्यामुळे EPBX बोर्ड वर माझी duty होती. आणि त्याच दिवशी कविताला मुलगी झाली. मुलगी अतिशय सुंदर होती.

अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले !

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 03/02/2012 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
'विठ्ठल, विठ्ठल' - स्वर कानी आले दर्शनास मोहित, मन माझे झाले ! पंढरीची वाट धरता मी थेट वारकरी माझे आप्तजन झाले ! चंद्रभागी स्नान, देता अर्घ्यदान पापाचे क्षालन देहाचे या झाले ! कामात विठ्ठल - नामात विठ्ठल ध्यानात विठ्ठल - अती भ्रम झाले ! टाळ चिपळ्यात गुंतले दो कर मनी नामस्मरण माऊलीचे झाले ! माझा तो विठ्ठल - त्याचा हा विठ्ठल अवघे जग माझ्या विठ्ठलाचे झाले !
काव्यरस

जे लेनो आणि सुवर्णमंदीर

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 03/02/2012 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना जे लेनो माहित नाही त्यांच्याकरता: http://en.wikipedia.org/wiki/Jay_Leno सध्या अमेरिकेत रिपब्लिकन पक्षात रणधुमाळी चालू आहे. चार उमेदवार राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवण्याकरता नामांकन मिळवायला झुंजत आहेत. त्यातला एक आघाडीचा अतीश्रीमंत उमेदवार म्हणजे मिट रॉमनी. जे लेनोने त्याच्या एका कार्यक्रमात तमाम उमेदवारांची घरे दाखवली. एक विनोद/उपरोध/टिंगलीचा प्रकार म्हणून मिट रॉमनीच्या घराच्या जागी त्याने चक्क सुवर्णमंदीरचा फोटो दाखवला! अर्थात रॉमनीच्या श्रीमंतीवर एक उपरोधिक टोमणा मारला.

!!...'मानवी भूकंप'...!!

लेखक सन्दीप१२३३० यांनी गुरुवार, 02/02/2012 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
!!...'मानवी भूकंप'...!! गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत नवे स्फुरलेले.. मानवी भूकंपामुळे जरी झाली हो