Skip to main content

राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्र...

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 13/03/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
National Counter Terrorism Centre (NCTC)...राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्र.. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी १ मार्च २०१२ पासून राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंध केंद्र सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न होता.परंतु दहा राज्याच्या(गुजरात,बिहार ,तामिळनाडू, प. बंगाल .मध्यप्रदेश,पंजाब ,छत्तीसगड,ओरिसा,त्रिपुरा,हिमाचल प्रदेश) मुख्यमंत्र्यांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळे या प्रस्तावावर चालू अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे. NCTC हि दहशतवाद विरोधी यंत्रणा असून याचा मुख्य उद्देश भारत सरकारच्या विविध गुप्तहेर विभागांमध्ये माहितीची आदान-प्रदान करणे व त्यांना एकत्र आणणे हा आहे.

एक होता राजा....

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 13/03/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
"त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत " - इति माझा अखिल भारतीय खिलारेवाडी तरुण मित्रमंडळाच्या क्रिकेट संघाचा अघोषित कप्तान. "पण पायातला यॉर्कर म्हणजे काय? यॉर्कर फक्त पायातच टाकतात ना? डोक्यावरुन गेला तर त्याला बाउंसर म्हणतात. "- इति मी. "तेच ते. त्याला बाउंसर पण खेळता येत नाहीत" " अर्रे पण त्याला म्हणजे कोणाला" मी हताश होउन विचारले? "सौरव गांगुली.

मराठि सिनेमा बद्दल मला काय वाटते.

लेखक गोंधळी यांनी मंगळवार, 13/03/2012 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मरठी सिनेमांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाले.हे बघुन आनंद झाला. मरठी सिनेमांचे सुवर्ण् युग आले आहे,अशी चर्चा सुरु झाली. पण काहि मोजके अपवाद सोडले तर व्यवसायिक निकषांवर मराठी सिनेमांना म्हणावे तसे यश मिळ्त नाहि असे दिसते.

चुकवू नये अशी - कहानी

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 13/03/2012 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर एका दमट दुपारी ती दारातून बाहेर पडते - विद्या वेंकटेशन-बाग्ची; सहा-सात महिन्यांची पोटुशी, चालताना दम लागणारी. टॅक्सीचालकांचा गराडा तिच्याभोवती पडतो. त्यातला एक जण चलाखीने तिच्या बॅगचा ताबा घेतो आणि तिला आपल्या टॅक्सीत बसवतो. बहुतेक लोक घराचा किंवा हॉटेलचा पत्ता सांगतात, पण चालकाला आश्चर्य वाटते कारण तिला जायचं असतं कालीघाट पोलीसचौकीत. पोलीसचौकीत ती तक्रार नोंदवते. तिचा नवरा - अर्णब बाग्ची - लंडनहून दोन महिन्यांपुर्वी नॅशनल डेटा सेंटरमध्ये असाईंनमेंटवर आलेला असताना अचानक गायब झालेला आहे; तिच्याकडे त्यांच्या लग्नात काढलेला त्याचा एकमेव फोटो आहे.

वांझोटा...

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 13/03/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
बोंबला, तिच्यायला माझी बायको बायको म्हणुन जिला जीव लावला, दहा वर्षे जे तिला सोसावं लागलं ते सोसायला मदत केली, बोललो असेन एक दोन वेळा मी सुद्धा चिडुन, पण म्हणुन असं पदरचं दुखः इंटरनेटवर मांडावं, ह्या देशात कायदा आहे म्हणे की, बलात्कार झालेल्या बाईचं नाव डायरेक्ट लिहित नाहीत, मग हे कसं काय चालतं. हा काय बलात्कार नाही का, म्हणजे जे नटरंग मध्ये दाखवलं तसं झालं तरच पुरुषावर बलात्कार होतो का, बायकांची मनं जळतात, करपतात, उध्वस्त होतात आणि पुरुषाच्य मनाला काय नवी पालवी फुटते, पालीला शेपटी फुटते तशी ?

नक्षत्रं आणि राशी

लेखक असुर यांनी मंगळवार, 13/03/2012 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, नक्षत्रं आणि राशी, असं नाव वाचून साधारण जो ग्रह होणं शक्य आहे, तसा राशीचक्राचा इथे संबंध नक्कीच आहे, पण थोडा वेगळ्या अर्थाने. एखादा खगोलावरचा लेख अल्पमती साथ देते तसा लिहावा हा प्रयत्न आहे. अगदीच कुणाला आवडलाच लेख, आणि चार दोन लोकांचा इंटरेस्ट वाढलाच खगोलशास्त्रात, तर आम्ही स्वतःला धन्युधन्यु समजून घ्यावे ही अल्पशी अपेक्षा. बाकी ज्योतिष या विभागाकडे वळायचा माझा अजून तरी धीर होत नाही बुवा. 'faith is a gift I'm yet to receive' असं कुठेतरी, कोणीसं, काहीसं म्हणून गेलं ना; तसं माझं या ज्योतिषाबाबत झालंय.

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 13/03/2012 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते.

मी ,ओककाका,भानामती आणि मिपा

लेखक साती यांनी सोमवार, 12/03/2012 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
पैसाताईंनी इथे दिलेला प्रतिसाद बघून आज मुद्दामून इथे आलेय. पैसा, ओककाका काही चुकीचं म्हणत नाहीयेत गं! पण काय आहे ना त्यांना कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे (हे मी वेगळे सांगायची गरज नाही म्हणा :) ) तर या त्यांच्या भानामतीच्या करण्या दुसर्‍याही एका मसंवर प्रसिद्ध होतात. तिथे मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”.