Skip to main content

स्वप्नचित्र...

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 17/03/2012 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नाळू राती, सहज एकदा, नदीकिनारी बसले ओढून घेता, पदर नभाचा, रम्य दॄश्य ते दिसले चांदणे होते, चमचमणारे, तीरावरी उतरले पाण्यामध्ये, पोहते तारे, पाहुनिया मी हसले आकाशीच्या पडद्यावरति, चालत होते, मन कुंचले चंद्र सोळा चितारलेले, लख्ख दिवे लखलखले रंगीत संगीत रेषा हलता, जरा जरासे पर हलले फुलपाखरे, फडफडणारी, स्वप्नचित्र असे दिसले.. हिरवाईत होते, शुभ्र रेशमी, ससे देखणे, गोजिरवाणे पिठूर चांदणे, माळून येता, शुभ्रतेत मी न्हाले कुठे एकला, गात होता, चंदन तो ..
काव्यरस

देस-परदेस

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 17/03/2012 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी घराला कुलुप लावून गाडीत शिरलो. दार लावून घेता-घेता सेल फोन नेहेमीप्रमाणे कप होल्डर मध्ये ठेवत इग्निशनची किल्ली फिरवली आणि सवयीने उजव्या हाताने डावीकडून सीट बेल्ट ओढून लावला. लावताना हाताला शेजारी ठेवलेला एम पी ३ प्लेयर लागला. तो पॉवर-ऑन केला तर किशोर कुमारच्या फोल्डर मधलं कालचं अर्धवट राहिलेलं कुठलसं गाणं दिसलं, हल्ली चष्म्याशिवाय काही ढेकूळ दिसत नाही! आणि गाडी चालवतांना चष्मा लागत नसल्याने मी तो लांब बॅगेत ठेवलेला असतो तो ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत काढत नाही.

तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला

लेखक गोंधळी यांनी शुक्रवार, 16/03/2012 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधी करावे भांडण अंधाय्रा दु:खाशी कधी करावे स्वागत आनंदरुपी उजेडाचे कधी भरकटावे बिन्धास विचारांच्या जंगलात कधी उडावे उंच मनाच्या आभाळात कधी सुटावे सुसाट वाय्राच्या जगात कधी यावे पोहुन भावनांच्या समुद्रात कधी बघावे बसुन अनुभवाच्या शाळेत कधी दरवळावे होउन प्रेमाचा सुगंध मग बनावे प्रकाश दिवा होउन शेवटी व्हावे लुप्त मेणासारखे जळुन तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला जाताना ही मग खेद नसेही कुठला.

एक हिंस्र कविता (?)... (१८+ only)

लेखक अस्वस्थामा यांनी शुक्रवार, 16/03/2012 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
हाणा रे हाणा , या विडंबकांना.. हे चावताती, हळव्या कवींना.. टांगून उलटे, माळावरी अन.. नवकवितांची धुरी द्या हो त्यांना.. जशी कोवळ्या कवितांची, पिसे हे उपटती.. यांच्या बोडक्याचे, केस केस उपटा.. तरीही जर उरले, अतृप्त अस्वस्थ आत्मे, हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका.. (अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )

सच्याचे शंभर.........

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 16/03/2012 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर... सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्‍यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली. सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन.

खेळ नियतींचा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/03/2012 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
उडाली पाखरे परदेशी ,मोकळा चौसोपी वाडा. पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा.. परसदारी तो औदुंबर, असे शांतपणे उभा. ना त्यास प्रदक्षिणा, ना कुणी राखे निगा. कोनाड्यातील आरसा ,उडाला त्याचा हि पारा भीतीवरील कुंकु खुणा, मिरवी सौभाग्याचा तोरा अडगळीतली रेशमी वसने, सांगे शृंगाराच्या कथा कोप~यातली उभी काठी, रडे वार्धक्याच्या व्यथा. कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा? ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा

माझी चित्तरकथा

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 16/03/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आणि चित्रकलेचे नाते डॅरील कलीनन आणी शेन वॉर्नचे नाते जसे होते अगदी तसेच होते. कलीनन शेन वॉर्नला प्रचंड घाबरायचा. त्याच्या हातभर वळणार्‍या चेंडुला जास्त घाबरायचा की तोंडातुन हातभर बाहेर येउन चालणार्‍या जीभेला जास्त घाबरायचा ते नाही माहिती. पण त्याला म्हणे स्वप्नात सुद्धा शेन वॉर्न दिसायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." शेन वॉर्न ने त्याचे आयुष्यभर भांडवल केले आणि जमेल तेव्हा कलीननला टोमणे मारले.

सेवा - एक आंदोलन

लेखक विश्वास कल्याणकर यांनी शुक्रवार, 16/03/2012 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
समाज सेवेशी माझा सर्वप्रथम परिचय इशान्य भारतात झाला तो २००८ मध्ये.. तेथे, गेल्या ६० वर्षापासुन सेवा भारती, विद्या भारती, कल्याणाश्रम, विवेकानंद केन्द्र, रामकृष्ण मिशन या संस्थांद्वारे होत असलेले कार्य बघुन मी खुपच प्रभावित झालो. आपला देखील यात खारीचा वाटा असावा या हेतुने मग मी होइल तसे तिकडे जात राहीलो अर्थात ते देखील निवृत्तीनंतर. नोकरीत असतांना कामातुन वर मान करायला देखील उसंत नव्ह्ती. गोहाटी ला ,समाज सेवे चे कार्य कसे सुरु करावे यावर सेवा विभागाने काढलेली एक छोटी पुस्तिका माझ्या वाचनात आली त्यातील काही माहिती मी आपणासोबत शेअर करीत आहे.

कोस्टर्स

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 16/03/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स :) DSC00538" alt="" />

ती वेळ निराळी होती . . . ..

लेखक अरूण म्हात्रे यांनी गुरुवार, 15/03/2012 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
छातीत फुले फुलण्याची वार्‍यावर मन झुलण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. डोळ्यात ऋतुंचे पाणी मौनात मिसळले कोणी वाळूत स्तब्ध राहताना लाटेने गहिवरण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र निथळले तेव्हा मन शहारून मिटण्याची डोळ्यात चंद्र टिपण्याची . . . ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. ज्या चंद्र कवडशा खाली कुणी साद घातली ओली मग चंद्र वळून जाताना किरणात जळून जाण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. पाऊस परतला जेव्हा नभ नदीत हसले तेव्हा कोरड्या मनाने कोणी गावात परत येण्याची ती वेळ निराळी होती....