Skip to main content

पंढरपुर ला पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ?

लेखक निश यांनी बुधवार, 21/03/2012 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अलीकडे माझे पंढरपूरला जाणे झाले. तिथे पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ? दोघांचाही मुर्ति एकत्र नाहि आहेत. ह्या बद्दल नक्की काय कथा आहेत? आणी आषाढी व कार्तिकीला त्या एकत्र आणुन पुजा करतात ह्या मागे काय कथा आहेत? अजुन एका श्लोका मध्ये पांडुरंगाचा उल्लेख रकुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा असा उल्लेख आहे. राई म्हणुन जो उल्लेख आहे तो पांडुरंगाच्या पत्निचा असावा का ?

मालवणी गजाली बरो...

लेखक निश यांनी बुधवार, 21/03/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
(मी कोकणातला असल्यामुळे एक मालवणी कविता) असोच लोका उगाच देतत माका भाव म्हणूण झालो माझा गावात नाव. नाचु लागलो मनात मोर, लोका म्हणती कवठा चोर, म्हटला झाला अस माझा नाव, मांडुन बघाया राजकारणी डाव. मित्रान सांगितल्यानी, जाऊन तुझ्या बापाशिक विचार, निवडणु़क लढवुचा असय, पैसो दे म्हणाव. बापाशिक जाऊन विचाल्यानी, पैसो देउक नाय, पण माझा मुस्काट फोडल्यानी. आवशीच्या घोवान कधी निवडणुक लढवल्यानी, गाववाल्यानी तुझो मामा केल्यानी. पैसो कमवुची अक्कल नसा तुका, शिक्षो म्हणुन कोंबडो केलो बापान माका. जसा काय चांगल्या जेवणात मीठ जास्त पडता. तसो मराठी माणुस आपल्याच माणसाचो पाय खेचता. बापाशीच्या मारान घे

फ्राईड भेंडी

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 21/03/2012 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बोटाइतक्या लहान व कोवळ्या भेंड्या पाव किलो शेंदेलोण व पादेलोण प्रत्येकी १/२ चमचा लाल मिरचीपूड १/२ चमचा दालचीन पूड पाव चमचा तळणासाठी तेल अर्धी वाटी भेंडी धुऊन देठे व शेंडे कापावे. कढईमध्ये तेल तापवून पूर्ण आचेवर अखंड भेंड्या थोड्या थोड्या तळून घ्याव्या. निवल्यावर एका ताटामध्ये पसरून प्रथम शेंदेलोण, पादेलोण व नंतर दालचीन पूड व लाल मिरचीपूड वरून भुरभुरावी. स्नॅक्स म्हणून खाण्यास चांगली.

व्हेज राइस

लेखक Pearl यांनी बुधवार, 21/03/2012 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
व्हेज पुलाव किंवा बिर्याणी करायचा कंटाळा आला असेल तर हे सोपं वर्जन करून पहा. किंवा संध्याकाळी हलका आहार घ्यायचा असेल तर जेवण्यासाठी चांगला ऑप्शन. साहित्यः तेल, हिंग, जिरे, हिरव्या मिरच्या १-२, (फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवड्याच्या शेंगा) या भाज्यांचे काप, मटार, स्वीटकॉर्न, भरपूर (उभा चिरलेला कांदा), तांदूळ, मीठ, बटर किंवा तूप, काजू, लिंबूरस कृती: १) एका कुकरमध्ये तेल घेऊन तेल तापले की हिंग-जिर्‍याची फोडणी करून घ्या. त्यात काजू घालून परता. मग १-२ मिरच्यांचे तुकडे घाला. आता त्यात भरपूर कांदा घाला.

शाईचा पेन

लेखक सुधांशू यांनी बुधवार, 21/03/2012 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
'चला दीपक सरकार, जायच का घरी?', एक तासाच्या कंटाळवाण्या मिटिंग मधून बाहेर आल्यावर मी दीपक ला विचारल. दीपक काहीतरी काम सांगून तो मिटिंग ला आला नव्हता, लकी साला. सगळ्यांचे पुढच्या महिन्याचे टार्गेटस ठरवता ठरवता आमच्या बॉस ने आमच्या डोक्याला झिणझिण्या आणल्या होत्या. खूप बिझी दिवस होता आज. कस्टमरना पटवता पटवता नाकी नऊ येत होते, तरी पण आज मी १० कॉम्पुटर विकले होते. संध्याकाळी ५ वाजता कोणी टार्गेट मिटिंगस घेत का? पण या बॉस लोकांना सांगणार कोण? 'नाही रे थांब जरा, अजून वेळ आहे', दीपक म्हणाला.

दर्द - ऐ - दात

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 20/03/2012 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी आताशा ठरवुनच टाकलंय, पुढचं प्रेम या डॉक्टरवरच करायचं. सगळे दात काढले तिनं, तरी तिच्यावरच मरायचं. मी आताशा ठरवुनच टाकलंय... एक दिवस काय झालं, बासुंदी पिता पिता हाटेलात पुढचा एक दात कर्रकन हलला मला वाटलं त्याचा बेरिंगच निसटला घरी येता येता दवाखान्यांत गेलो तिथली रांग पाहुन मनोमन सुखावलो बाहेर एक बाउन्सर बहुधा कंपाउंडर असावा आत नाही जमलं की इथंच उपटत असावा. शेवटी माझा नंबर आला, हळुच आत गेलो बेसिनमधले गोरे हात पाहुनच गार झालो या हातानी एक काय चार दात काढा जमलं तर भरुन द्या मागच्या दोन दाढा 'येस,प्लिज, य, खुर्चीवर बसा,' आवाज बरा नव्हता, काळी तिन पांढरी दोनच्या मध्ये अडकला होता काय झालंय ते
काव्यरस

राजधानीत अभिषेक!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 20/03/2012 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/TMC-MPs-guard-urinates-… नुकतेच वाचण्यात आले की तॄणमूल काँन्ग्रेसच्या एका खासदारीण बाईंच्या अंगरक्षकाने राजधानी एक्सप्रेसच्या प्रवासात एका प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली आणि ह्याची वाच्यता करु नये म्हणून त्या प्रवाशाला धमकावलेही. ह्या बाईंचे नाव काकोली घोष दस्तिदार . नंतर पत्रकारांशी बोलताना ही एक मामुली गोष्ट आहे. तक्रार करणारा विरोधी पक्षाचा आहे त्यामुळे तो तसे सांगतो आहे वगैरे नेहमीचीच मखलाशी केली.

प्रतिशोध

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 20/03/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
काय कायदा काय वायदा कसले पोलिस ठाणे ओलिस आहे मुके रांगणे गुंडच इथे शहाणे डोंबाच्या हाती सत्तेचे उजवे चलनी नाणे डावे पाठी री ओढे गुणगुणे पोरके अन गाणे सारे गनिमी व्याध; अमीषे त्यांची मिठास वाणी माया भरते दारी त्यांच्या अथक कृपेचे पाणी कळसावर लखलखते सोने वार सोसते कोणी आटपाटची नगरी ही तर; ताक चोरते लोणी सांग विठू तू बद्ध करांनी का अजुनी रे मौनी पायाखालिल वीट क्रयास्तव कलली पाहुन चैनी रेत जाळते पाणी रानी चौखुर आणीबाणी आक्रंदे प्रतिशोध; संयमी जनता केविलवाणी ..............................अज्ञात
काव्यरस

(रे मना ..)

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 20/03/2012 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ गझल : http://www.misalpav.com/node/21076 - सांजसंध्या त्यावरुन पॉझिटीव्ह कविता : रे मना नभ पुन्हा उजळून आले शब्द भावनांची माळ माळून आले. आस रात्रीस, ह्या चांदण्या नभाची मेघ तेंव्हा मिठीत न्हावून आले हे श्वास होते भारलेले कधीचे क्षण तुझ्यासवे आज दरवळून आले देहात रुजलेली जाणीव मिलनाची तव स्वप्न मनी आज फुलून आले जीवनाचे डाव कित्येक खेळले मी तुझेच प्रितवार आज झेलून आले. --- शब्दमेघ
काव्यरस

रे मना ..

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 20/03/2012 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
रे मना .. रे मना मोती पुन्हा निखळून गेले थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले श्वास होते रोखलेले मी कधीचे भास होते खास आज कळून गेले जीव घेणे घाव देही सोसले मी शीतवारे ना कधी जवळून गेले खेळ जेव्हां जीवनाचे साहवेना शोधते वैरी कुठे वितळून गेले - संध्या (२३.२०.२०१०) गझलसम्राट कै सुरेश भट यांच्या एका गझलेतून प्रेरणा घेऊन
काव्यरस