Skip to main content

गर्द नजरेची नार..

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 10/04/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द नजरेची नार जणु चांदण्याची धार होता पैंजणांचा वार सार डोलतं शिवार कधी उसळता ज्वार कधी बावरी ती खार चिंब मोगर्‍यांचे हार हसु तिचं वाहणारं उंच उडणारी घार जशी तेज तलवार करी नजरांचे भार एका नजरेत गार गर्द नजरेची नार काय शब्द बोलणारं तिच्या नजरेतं सारं माझ्या मनातलं सार
काव्यरस

चिउ आणि काऊ

लेखक मानव यांनी मंगळवार, 10/04/2012 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती चिउ आणि एक होता काऊ.दोघांच प्रेम हे जगासाठी एक विजातिय जोडीच होती पण दोघांचही एकमेकांवर खुप प्रगाढ प्रेम होत.काउ दिवसभर काव काव करत गावभर फ़िरायचा.आणि चिउ त्याची घरी वाट पहात बसायची.चिउ काऊवर खुप प्रेम करत असे पण काऊला मात्र वेळच पुरत नसे तो दिवसभर पोटाच्या मागे लागलेला असे.तशी चिउ ची भुक फ़ार न्हवती तिला अगदी थोडसच लागायच पण काउला मात्र सगळ गोळा करुन ठेवायची हौस जडलेली होती. त्याच्या कामात तो एवढा व्यस्त असे की चिउचे प्रेम घेण्याएवढाही वेळ शिल्लक नसे.काउ पहाटेच उडुन जाई आणि संध्याकाळी घरट्यात परतत असे.घरी आल्यावर तो चिउला एकेक हुकुम सोडे माझ डोक दाब,पाय दाब.चिऊ त्याच सर्व काही प्र

सन २१९८ सालच्या दैनिकातिल एक लेख.

लेखक मानव यांनी मंगळवार, 10/04/2012 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
तर २१व्या शतकातिल काही मंडळींचा प्रमुख उद्योग लोकांच्या मुड्या मुरगळुन पैसा कमावणे होता.पैसा म्हणजे कागदावर छापलेली चित्रे.

स्वप्न अन सत्य

लेखक पहाटवारा यांनी मंगळवार, 10/04/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ,म्हणजे जेव्हा 'ख्वाबों को सच बनाने का ख्वाब देखने की ऊमर थी ' तेव्हाचे लिहिलेले आहे ..

मन पाऊस पाऊस... (अष्टाक्षरी)

लेखक वेणू यांनी मंगळवार, 10/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मन पाऊस पाऊस चिंब अंगण- ओसरी, कुंद गारव्याची हवा गंध मातीचा पसरी.. मन पाऊस पाऊस होते गालिचा हिरवा, टेक क्षणभर तू ही नको होऊस पारवा! मन पाऊस पाऊस पाणी डोळ्यांच्या द्रोणात, अवखळ ओघळते मंद हवेच्या झोकात! मन पाऊस पाऊस थेंब थेंबाने रुजतो, ध्यास रुजे त्याच्यासवे कोंब आशेला फुटतो.. मन झिम्माड पाऊस आठवांची बरसात माझ्या काजळात ओल्या फुले उद्याची पहाट!! मन पाऊस मेघांचा सुटे मळभ जीवांचे रंग आसमानी झाले तुझ्या माझ्या नशीबाचे! मन इतके बरसे, दु:खं झाली मातीमोल सल काढले खुडून सरे पापण्यांची ओल...! असे चित्र पावसाचे, जणू इवला कोलाज सार्‍या आठवणी खुळ्या त्यांत मावल्या सहज..! मन पाऊस पाऊस म्हणे कसा बरसल

ऑनर किलिंग

लेखक मानव यांनी मंगळवार, 10/04/2012 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ऑनर किलिंग (जळगाव मध्ये एका धनगर नावाच्या इसमाने आपल्या पोरीचा गळा दाबून खून केला व खुना मध्ये काका व आजी यांचा हि सहभाग आहे.) वाहिन्यांमुळे आपल्याला मिळालेला आणि रुजलेला शब्द म्हणजे ऑनर किलिंग. दोन प्रेमी जिवांच्या नातेवाईकांनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी प्रेमी जिवांची केलेली हत्या म्हणजे ऑनर किलिंग अशी याची थोडक्यात व्याख्या. या भारतवर्षात एक काळ होता जेव्हा स्त्री आणि पुरुष हा भेद न्हवता.लीलावती,गार्गेयी,मैत्रेयी या विदुषींचे दाखले आपण आजही देतो."कामसुत्र" हे या देशात तयार झाले.कामसुत्राचा उल्लेख एवढ्याच्साठी की स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजच्या इतका मागसलेला न्हवता कारण यातील शिल्पे आ

सिंधुदूर्ग

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 10/04/2012 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
कोंकणात भटकायचे तर पावसाळा संपल्यासंपल्या लगेच जावे. सगळीकडे निसर्गाचे विलोभनिय दर्शन होते. छायाचित्रकारांना तर पर्वणीच. पण काही कामा निमित्त हल्लीच मालवण आणि गोवा अशी सफर केली. काही निसर्गचित्रे कॅमेरात बंदिस्त केली. तीच आज तुमच्या आस्वादासाठी सादर करीत आहे. सौंदर्याचे वरदान लाभलेला मालवण किनारा.

नीतिमत्ता

लेखक सहज यांनी मंगळवार, 10/04/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
वडीलोपार्जीत संपत्ती? मानवतेचा ठेवा? स्त्रीधनच. बहुतेक वापरु की नको? जग कुठे चालल्लेय? ---------- उधळ्या इसाप भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध! आता, मी वाटून काय उपयोग? आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला? ----------------------- ती ना? नसतेच राजकारण्यांकडे, सरकारी बाबूंकडे आणि भांडवलशहांकडे. म्ह्णूनच मीही वापरत नाही. कशाला त्यांची वक्रदृष्टी? -------------------------- म्हणाली, मला स्वातंत्र्य द्या. तुमच्या आयुष्यात स्थान द्या. नाही जाणार पळून, नाही होत मी भ्रष्ट. ज्यांनी दिले, ते अजरामर झाले. स्साली, जरा बोलू दिले, तर पोहोचली थेट माझ्या मरणापाशी..