Skip to main content

स्वप्न अन सत्य

मंगळवार, 10/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ,म्हणजे जेव्हा 'ख्वाबों को सच बनाने का ख्वाब देखने की ऊमर थी ' तेव्हाचे लिहिलेले आहे .. सध्या थोडा मोकळा वेळ असल्याने टंकून काढले. स्वप्न ऊराशी जे बाळगले, त्या स्वप्नी मन रंगी रंगले | तारा जुळल्या, सूर ऊमटले, पण सत्याशी नाते तुटले || त्या स्वप्नाशी नाते जुळता, स्वप्न मना ते सत्यची गमले | पण सत्याची चाहूल लागता, 'सत्य' काय ते मना ऊमगले || सत्य पूर्ण ते मना ऊमगता, स्वप्नांच्या तारा तणतणल्या | सूर बहकले, रंग ऊधळले, सत्य मनावर स्वार जाहले || जरी सत्य हे स्वप्नच होते, पण ते कारे सत्यच होते | त्या स्वप्नाचे रंग निराळे, अन सत्याला काठही काळे || स्वप्नी छेडल्या ज्या तारा मी. अन सूर ऊमटले स्वप्नील जे | त्या तारंच्या अन त्या सूरांच्या, शोधात भटकलो सत्यात मी || सत्याचे सर्व मार्ग धुंडुनी, अंती थांबलो, श्रांत वृक्षतळी | तनु श्रांतली , त्यात सावली, मनास निद्रा गाढ साधली || निद्रेत पुन्हा ते मन ऊधळले, अन स्वप्नांच्या नगरी पोहोचले | व्दारात थांबूनी ऊसंत घेता, मार्ग आपुला सिंहावलोकिला || मार्गावरची नजर हटेना, ऊरात आनंद तो मावेना | सत्य म्हणावे कि ते स्वप्न, मनास काही काही सुचेना || त्या मार्गाच्या एका बाजूस, होती ऊधळण अनेक्ररंगी | अन मार्गाची दुसरी बाजू, ल्यायली होती किनार काळी || मनास गमले सत्य अखेरी, स्वप्न सत्य अन सत्यची स्वप्न | या बाजूने बा त्या बाजूने, जाणे अपुले स्वप्नांच्या नगरी ||
लेखनविषय:

वाचने 720
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया