Skip to main content

'क्लाउड कंप्युटिंग' - म्हणजे काय रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 26/04/2012 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, 'काळा काळा पिंजलेला कापूस' असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी 'ढगाला कळ लागल्यावर काय होते' ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस 'ढगात' जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही 'क्लाउड' कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच. :) संगणक विश्वात झालेली क्रांती ही, 'संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले' असे म्हणणार्‍या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन आज ती 'क्लाउड कंप्युटिंग'पाशी येऊन पोहोचली आहे.

विच्छा आमची ...

लेखक विदेश यांनी गुरुवार, 26/04/2012 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
. विद्यमान राष्ट्रपतीमहोदयांचा कालावधी तीन महिनेच राहिला आहे. नंतरचे तीन महिने नव्या राष्ट्रपतींच्या " निरनिराळ्या सत्कार समारंभात आणि परदेश दौरा करण्यात " जाणार ! आमचा जीव इथे टांगणीला लागून राहिला आहे, याचे कुणाला काहीच कसे वाटत नाही ?

खरच मी लढणार...

लेखक निश यांनी गुरुवार, 26/04/2012 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
खरच मी लढणार माणसातल्या राक्षसाला माणुसकी शिकवणार . खरच मी लढणार.. सत्तेतल्या गुंडाबरोबर. आया बहीणींवर अत्याचार करणार्‍या जनावरांबरोबर.

असेच काही, अवती- भवती...!

लेखक वेणू यांनी गुरुवार, 26/04/2012 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
अपयश झेलायला काही क्षण पुरतात, तर पेलायला सबंध आयुष्य! महत्वाकांक्षांचे अपयश एकवेळ पचतेही, पण नात्यांनी कच खाल्ली, की सावरणारे हातच दुबळे पडतात... तिथे 'आपलं' काही उरत नाही 'तुझं-माझं' नावाचा एक विचित्र प्रवास सुरू होतो! आणि हळूहळू, वाटाच निर्णय घेऊन टाकतात, विरुद्ध निघून जाण्याचा! दोन प्रवासी- वेगळ्या वाटा, हुरहूर मात्र आत जपलेली.. ही खाल्लेली कच, रुतणारा सल आणि लागलेली हुरहूर, मनात घर करून राहते, नि त्या घरावर अपयशाचा झेंडा!! आता स्वतःला समजवण्याचे अनेक नवे मार्ग, नवी कारणे, समर्थनाचे लाखो उपाय! जोडलेली मनं तुटणं, ती दूर होणं, आयुष्याचे सुंदर- नाराजीचे, तर कधी संमिश्र क्षण ज्यासोबत अनुभ

मोहोळ

लेखक जयवी यांनी गुरुवार, 26/04/2012 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींचं मोहोळ आज फुटलं फिरुन सयी छळती जीवाला डंख मारुन मारुन जखमा जुन्या पुराण्या पुन्हा नव्याने सलती भळाभळा लागे वाहू जरी खपली वरती कधी आसूड शब्दांचे गेले कातडी सोलून कधी कुणी फसविले गळा केसाने कापून घाव वर्मावर झाले काही काळजाच्या पार परी दुखावून गेले सग्या सोयर्‍याचे वार सार्‍या कटू आठवांचे येई मळभ दाटून होई चित्त सैरभैर राही काळोख भरुन ओझे झाले पापण्यांना काळ्या सावळ्या ढगांचे कोसळे झडझडून मन ऋणी आसवांचे जयश्री
काव्यरस

पुन्हा एकदा स्मार्टफोन

लेखक सन्जोप राव यांनी गुरुवार, 26/04/2012 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा स्मार्टफोन..... एक स्मार्टफोन घ्यायचा आहे. किंमत जास्तीत जास्त रु.२०,०००. ३जी, चांगला कॅमेरा, चांगला म्युझिक प्लेअर, बर्‍यापैकी मेमरी, शक्यतो व्हीडीओ कॉलिंग सुविधा फार तांत्रिक गुंतागुंत नसावी. फार नाजूकही नसावा. विक्रीपश्चात सेवा उपलब्ध असावी. याआधी आंतरजालावरुन फोन घेऊन हात पोळून घेतले आहेत. जाणकारांनी कृपया मदत करावी. स्वतःचे अनुभव सांगीतल्यास अधिक बरे होईल. लिंक्स शक्यतो देऊ नयेत. धन्यवाद.

खट्टी-मिठी कैरीची कोशिंबीर

लेखक जागु यांनी गुरुवार, 26/04/2012 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
१) छोट्या कैर्‍या ५-६ मोठ्या असतील तर १-२ नुसती कैरी पाहूनच तोंपासु की नाही!:स्मित: २) १ मोठा चमचा मिठ ३) १ मोठा चमचा साखर ४) पाऊण चमचा लाल मसाला किंवा लाल तिखट ५) १ चमचा गोडे तेल