'क्लाउड कंप्युटिंग' - म्हणजे काय रे भाऊ ?
- इन्फ्रास्ट्रक्चर अॅज अ सर्विस (IaaS)
- प्लॅटफॉर्म अॅज अ सर्विस (PaaS)
- सॉफ्टवेयर अॅज अ सर्विस (SaaS)
इन्फ्रास्ट्रक्चर अॅज अ सर्विस (IaaS)
इन्फ्रास्ट्रक्चर हा क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे. ह्यावरच सगळा डोलारा उभा आहे. ह्या प्रकारात सर्व प्रकारचे सर्व्हर्स, नेटवर्क डिव्हायसेस, स्टोरेज डिस्क्स तत्सम हार्डवेयरचा समावेश होतो. इन्फ्रास्ट्रक्चर अॅज अ सर्विस सेवा घेतल्यावर, आपल्याला फक्त हार्डवेयर कोणते हवे ते ठरवायचे असते, बाकीच्या किचकट गोष्टी सेवा पुरवठादार आपल्या वतीने करतो. ही सेवा 'जेवढा वापर तेवढे बील' अश्या तत्वावर चालते. वापर वाढला तर बील जास्त वापर कमी झाला तर बील कमी अशी 'इलास्टिक' सेवा असते ही. त्यामुळे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' मध्ये प्रचंड बचत होते.
IBM® Cloud ह्या नावाने IBM ही इन्फ्रास्ट्रक्चर अॅज अ सर्विस सेवा पुरवते.
प्लॅटफॉर्म अॅज अ सर्विस (PaaS)
उद्या जर मला एक ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस देणारी वेब साईट चालू करायची असेल तर मला आधि एक डोमेन नेम विकत घ्यावे लागेल, मग सर्व्हर स्पेस विकत घ्यावी लागेल, डाटाबेस विकत घ्यावा लागेल आणि मग साईट चालू होईल. जर साईट खूप चालली आणि खुप युजर्स मिळाले तर मला जास्त सर्वर स्पेस विकत घ्यावी लागेल आणि असेच बरेच काही. हे सर्व झेंगाट मलाच बघावे लागेल. पण हे सर्व नको असेल तर मी क्लाउड वर प्लॅटफॉर्म अॅज अ सर्विस ही सेवा विकत घेऊ शकतो. ज्यामुळे माझे अॅप्लिकेशन ह्या प्लॅटफॉर्मवर होस्ट केले जाईल आणि सर्व प्रकारची अॅडमिनीस्ट्रेटीव्ह जबाबदारी सेवा पुरवठादाराची असेल. म्हणजे मी नोकरी संभाळून आता ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस चालू ठेवू शकतो. ;)
अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहु ह्या प्लॅटफॉर्म अॅज अ सर्विस सेवा पुरवणार्या कंपन्या आहेत.
सॉफ्टवेयर अॅज अ सर्विस (SaaS)
ह्या प्रकारात मध्यवर्ती संगणकावर सॉफ्टवेयर सेवा (अॅप्लिकेशन सॉफ्टवेयर), सेवा पुरवठादार पुरवतो आणि आपण आपल्याकडचा संगणक किंवा मोबाइल वापरून ही अॅप्लिकेशन्स वापरू शकतो. गुगलच्या सर्व सेवा (डॉक्स, ड्राइव्ह, पिकासा, कॅलेंडर ई.), ई-मेल सर्विसेस, मायक्रोसॉफ्ट्ची ड्रॉपबॉक्स सेवा, ब्लॉगर.कॉम, वर्डप्रेस.कॉम ह्या सर्व सेवा सॉफ्ट्वेयर अॅज अ सर्विस ह्या प्रकारात मोडतात.
तर असे आहे हे क्लाउड कंप्युटिंग, कळले का रे भाऊ! :)
कळले म्हणताय ? तर मग ह्या भाऊंना आता कोणीतरी समजावून सांगा
In reply to झकास by रमताराम
ते सर्कारी बेणं येकदम येडं आस्लं तरी क्लाउड च्या कॉन्सेप्ट ला बळी पडणारे सात येडे हैत. तिच्यायला जी काय म्हाईती बगायची ती येका जागी बगा ना राव. आईच्यान सांगा किती लोक हापिसची कामे मोबाईलवरून करतात, घ्या तुळजाभवानीची आण. आन् नसंल तर ह्ये खूळच न्हवं का?हे आमच्या मानववस्तीपासून शेकडो किलोमीटरवर खाणीत काम करणार्या सहकार्यांना सांगा त्यांना पटेल. नाही, ते सुद्धा क्लाऊड वापरतात म्हणून म्हणतोय. :-) घरची कामं हाफिसात बसून मोबाईलवर करणारा (जमीनीवरचा)हेराम! ;-)
In reply to हे हे हे by Nile
In reply to अजिबात खुळ वैगेरे नाही. by पाषाणभेद
In reply to पाभे by रमताराम
In reply to तुम्ही त्यावर काम करतात by पाषाणभेद
In reply to पाभे by रमताराम
Data As A Service'बहूदा गूगलच्या दिसणार्या जाहिराती हे ह्याचेच बाळ आहे.
In reply to तांत्रिक विषय सोपा करून सांगितलात, धन्यवाद! by बहुगुणी
In reply to डेटा जरी 'ढगात' असला तरी तो by पाषाणभेद
In reply to तांत्रिक विषय सोपा करून सांगितलात, धन्यवाद! by बहुगुणी
In reply to मस्त माहिती देणारा लेख.... by मदनबाण
'क्लाउड कंप्युटिंग' ची संकल्पना १९६० साली John McCarthy ने मांडली होती.अनेक क्षेत्रात हे असेच होत असावे. मी 'आय. टी. वाला' नाही. 'टेल्हिव्हिजन ब्रॉडकास्टींग इंजिनीयरींग' हे माझे क्षेत्र आहे, अर्थात गेल्या दहा पंधरा वर्षांपासून आमच्या क्षेत्राची व आय.टी. च्या क्षेत्राची बरीच सरमिसळ झालेली आहे. तेव्हा माझा थोडाफार अभ्यास कॉंप्युटर्स, नेटवर्कींग इत्यादींचाही आहे. माझ्या क्षेत्राबद्दल सांगायचे तर, गेल्या दशकांत अगदी सहज वापरात आलेल्या अनेक संकल्पना जुन्याच आहेत. ह्यातील काही संकल्पना विवीध तर्हेने गेल्या अनेक दशकांपासून वापरात आलेल्या आहेत (उदाहरण द्यायचे झाले तर 'Data Compression schemes': श्वेत दूरदर्शनच्या काळापासून चालत आलेले line interlacing चे टेक्निक, तसेच रंगीत दूरदर्शनमध्ये सुरूवातीपासूनच वापरात आणले गेलेले chroma encoding ही ह्याचीच उदाहरणे होत). काही संकल्पना पूर्वी माहिती होत्या पण त्या राबवण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र तेव्हा उपलब्ध नव्हते. जसजसे ते उपलब्ध होऊ लागले तसतशा ह्या संकल्पना आर्थिक दृष्ट्या सहजरीत्या वापरात आणल्या जाऊ लागल्या. लेख माहितीपूर्ण आहे, पण त्यातील
'संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले' असे म्हणणार्या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन...ह्याविषयी बराच साशंक आहे. हे वाक्य बहुधा संदर्भाविरहीत घेतले असावे असे वाटते. तसेच पाषाणाभेद ह्यांच्या प्रतिसादांतूनही असेच काही सूर दिसून येतात. रमताराम ह्यांनी थोडे जास्तच सिनीकली त्यांचे म्हणणे मांडले आहे, ते बहुधा त्यांच्या मुद्द्यास अधोरेखित करण्यासाठी असे मला वाटते. त्यांच्या सगळ्याच मुद्द्यांशी मी सहमत नाही, परंतु त्यांचा एक मुद्दा अगदी रास्त आहे-- क्लाऊड काँप्युटींगचा फायदा एंटरप्राईजेसना होणार आहे, वैयक्तिक वापर करणार्यांना (individuals) नव्हे असे त्यांचे म्हणणे आहे. पाषाणाभेद ह्याविषयी प्रतिवाद करतांना दिसत नाहीत. जुन्या काळात काही फारसे माहिती नव्हते, आता एकदम काही लखाखते ज्ञान जगापुढे आलेले आहे, हा अत्यंत चुकिचा गैरसमज आहे, आणि त्यामागे, तसे प्रतिपादन करणार्यांची अपुरी माहिती असावी, असे म्हटले तर ते चुकिचे ठरू नये.
In reply to 'जुन्या संकल्पना, जुने ते टाकाऊ' by प्रदीप
काही संकल्पना पूर्वी माहिती होत्या पण त्या राबवण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र तेव्हा उपलब्ध नव्हते. जसजसे ते उपलब्ध होऊ लागले तसतशा ह्या संकल्पना आर्थिक दृष्ट्या सहजरीत्या वापरात आणल्या१००% सहमत!
ह्याविषयी बराच साशंक आहे. हे वाक्य बहुधा संदर्भाविरहीत घेतले असावे असे वाटते.हे मत IBM च्या थॉमस वॅटसनचे आहे. टॉप १० मिसकोट मध्ये हे वाक्य येते. "I think there is a world market for maybe five computers." -- Thomas Watson, chairman of IBM, 1943. http://en.wikipedia.org/wiki/Thomas_J._Watson इथेही त्याचा उल्लेख आहे. मी ह्याचा संदर्भ प्रथम अच्युत गोडबोल्यांच्या 'किमयागार' ह्या पुस्तकात वाचला होता. लेखात हा संदर्भ, संगणक क्षेत्रातल्या आत्तापर्यंतच्या एकंदरीत वाटचालीची कल्पना यावी म्हणून घेतला होता.
क्लाऊड काँप्युटींगचा फायदा एंटरप्राईजेसना होणार आहे, वैयक्तिक वापर करणार्यांना (individuals) नव्हेहे रास्त कसे काय ते जरा विस्तृतपणे सांगाल का? - (विद्यार्थी) सोकाजी
In reply to ह्याविषयी बराच साशंक आहे. हे by सोत्रि
क्लाऊड काँप्युटींगचा फायदा एंटरप्राईजेसना होणार आहे, वैयक्तिक वापर करणार्यांना (individuals) नव्हे हे रास्त कसे काय ते जरा विस्तृतपणे सांगाल का?मी 'वैयक्तिक वापर करणार्यांना (individuals) [हे फायदेशीर नसेल] ' लिहीले आहे, ती माझी मिस्टेक आहे, हे कबूल करतो. मला म्हणायचे होते ते असे की, क्लाऊड कॉम्प्युटींग सध्या individuals ना परवडण्याइतके स्वस्त नसावे? आणि त्याहून त्यांना सध्याच्या अॅव्हरेज वापरात तसल्या टेक्नॉलॉजीची जरूर आहे का? पुढेमागे किंमती कमकमी होत जातील, तसेच वैयक्तिक वापरातील रीसोर्सेसची जरूरीही वाढेल, तेव्हा हे तंत्रज्ञान वैयक्तिक वापरासाठी 'वापरण्यायोग्य' होईल. थोडक्यात हे 'वैयक्तिक वापर करणार्यांना सध्या फायदेशीर नसेल व खरे तर ते त्यांना सध्या आवश्यकही नसावे'.
क्लाउड हे वैयक्तिक वापराच्या दृष्टीने फारसे उपयुक्त नाहिहे मला तितकेसे पटले नाही. गुगलच्या सर्व सेवा ह्या क्लाउडचाच परिपाक आहेत. मी वैयक्तिकरित्या गुगल डॉक्स एक्स्टेंसिव्हली वापरतो. आमच्या मित्रांबरोबर केलेला दारू (खाणे-पिणे) खर्च डॉक्सच्या एक्सेल फाइल मध्ये अपडेट करून, ही फाईल सर्वांना शेयर केलेली असते. महिन्याअखेरिला हिशोबाप्रमाणे आपापले पैसे द्यायचे. ही फाइल आम्ही बिल दिल्या दिल्या मोबाइलवरून लगेच अपडेट करतो म्हणजे जो बिल पे करेल त्याची जबाबदारी फाइल अपडेट करण्याची. हा क्लाउडचाच महिमा आहे. जरा एक जोरदार 'रिसेशन' येउद्या अजून एक म्हणजे ह्या क्लाउडचा महिमा त्यांनाही पटेल ज्यांना हे खूळ वाटत आहे. - (आज शुक्रवार, संध्याकाळी 'ढगात' जायची आस लागलेला) सोकाजी
In reply to ररा आणि पाभे, तुमचे by सोत्रि
ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, 'काळा काळा पिंजलेला कापूस' असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी 'ढगाला कळ लागल्यावर काय होते' ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस 'ढगात' जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही 'क्लाउड' कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच.हा इंट्रोदेखील एकदम खास.... :)
In reply to माहितीपूर्ण लेख by स्मिता.
In reply to बेसिक फंडा ???? by चौकटराजा
जस्ट फॉर जोक हं !हे सांगायची गरज होतीच का? नसतं सांगितलं तरी आम्ही जोक म्हणूनच घेतलं असतं. :) असो. माहितीपूर्ण धाग्यावर जास्त विषयांतर करत नाही.
आजच्या युगात क्लाउड कंप्युटिंग पुढे रेटण्याचा मुख्य मार्केटिंग मंत्र म्हणजे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' पासून सुटकारा. 'तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आमचे' हे क्लाउड कंप्युटिंग सेवा पुरवठादारांचे ब्रीदवाक्य आहेभारतिय कंपन्यांना ह्यात किती संधी आहे ? केवळ User बनून वा गूगल्,अॅमॅझॉनचे API वापरणे ही मर्यादित संधी आहे. त्या पलिकडे जाण्यासाठी भारतिय कंपन्यांना काही संधी आहेत का ? भारतिय कंपन्यांना सेवापुरवठादार बनण्यासाठी काय करावे लागेल ?
In reply to फार पूर्वी जेव्हा हार्ड by आशु जोग
In reply to सुरक्षा by नितिन थत्ते
In reply to आणखी एक by नितिन थत्ते

In reply to हम्म... by दादा कोंडके
ही आयटीवाली लोकं साध्याच गोष्टींनाच काहीतरी फंडू नावं देउन पोटं जाळतात!दादा, तुम्हाला गुपित कळले तर, पण तसे नाही केले तर आम्ही आमची पोटं कशी भरणार :D - (पोट भरण्याचे धंदे करणारा) सोकाजी
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to बर्यापैकी सोपं करून सांगितलंय. by पैसा
>>क्लाउड कंप्युटिंग हे