एलियन आणि प्रॉमिथियसच्या निमित्ताने ...
चित्रपट बघणं हा कधीकधी त्या चित्रपटापेक्षा त्याच्या कथादुनियेत रमवणारा एक अनोखा अनुभव असू शकतो. म्हणजे ज्या इहलोकात तो घडतो, ज्या जगाचे परिमाण त्या चित्रपटाशी आणि त्याच्या पटकथेशी निगडीत असतात तेच कित्येकदा आपणास अत्यंत समाधानकारक अनुभव देऊन जाऊ शकतात.
सायन्स फिक्शनचे काल्पनिक जग हे एका कलाविष्कारापुरताही सीमित असू शकते जसे "वॉर ऑफ द वर्ल्ड"चे जग; म्हणजे आधी कॉमिक्स आणि नंतर स्टिवन स्पीलबर्गने टॉम क्रुसला घेऊन बनवलेल्या चित्रपटात दाखवले गेलेले.
मिसळपाव
विकांताला मेंदूला झालेला त्रास बघता ह्या वेळी मेंदूचा वापरच करावा लागणार नाही असा एखादा मसालापट बघायचे ठरवले आणि पावले चालली 'शांघाय'ची वाट.
'पोलिटिकल थ्रिलर' असा गाजावाजा झालेला हा चित्रपट ना पोलिटिकल थ्रिलरच्या अपेक्षा पूर्ण करतो ना नुसत्या थ्रिलरच्या. हान काही काही प्रसंगात थिल्लर वाटण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे हे नक्की.