डॉन
दुबईच्या आलिशान हॉटेलच्या स्विमिंग पुलाच्या कठड्या वर बसून सिगारेट चे झुरके घेत तो बसला होता .संध्याकाळचा लालभडक सूर्य जसजसा अस्ताला जात होता ,तसतसा त्याला आपला २५ वर्षापूर्वीचा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर दिसू लागला .....
हैदराबाद मधल्या झोपडपट्टीतील ती छोटीशी खोली .पप्पा आणि मम्मी दिवसभर कामाच्या शोधात दिवसभर वणवण भटकत होते ,घरात दोन वेळच्या जेवणाची सुद्धा मुश्कील होती .तो आणि छोटी बहिण सुरीली तिथेच मातीच्या ढिगार्यात खेळत होते .तेवढ्यात तिथे एक गाडी आली .गाडीतून ३-४ माणसे उतरली आणि त्यातल्या एका गॉगलवाल्याने त्याला एक चॉकलेट दिले .दिवसभर भुकेला असल्याने त्याने पटकन ते खाल्ले
मिसळपाव