Skip to main content

२१ डिसेंबर

लेखक चाफा यांनी शनिवार, 08/12/2012 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोकॉपी मशीन समोर उभ्या राहिलेल्या प्रोफेसर देवधरांनी विचारांच्या भरात आकडा पंच केला 'एकवीस'. मशीनचा झूSS असा आवाज सुरू होताच ते भानावर आले, आणि त्यांना आपली चूक उमगली. हल्ली बरेचदा त्यांचं असंच व्हायचं, ते एकवीस डिसेंबरचं मनावर घेतल्यापासून. देवधरांना बहुतांशी शास्त्रज्ञ मॅड सायंटिस्ट म्हणायचे, म्हणजे देवधर खरंच वेडे वगैरे नव्हते पण पराकोटीचा आनंद आणि पराकोटीची निराशा यांच्यामधली भावना त्यांना कधी माहीतच नव्हती.

सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 08/12/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
धुंदीत जर कळाले, तारुण्य या कळ्यांना सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना गंधाळत्या नशेला, शृंगारुनी गुलाबी देऊन कोण गेले, गुलकंद पाकळ्यांना हे कायदे निजामी, का लावता फुलांना भेदी कुणी पहारे, टाळून सापळ्यांना अंधार दाटताना, रंगून सांज यावी थांबावयास सांगा, डोळ्यांत सावल्यांना ह्या रेशमी क्षणांनी. सृजनास जाग यावी कविता हळू फुलाव्या, अनुभूतल्या मळ्यांना संध्या
काव्यरस

कोकणसफरीतील विसाव्याचं स्थान - 'उत्तम फार्म'

लेखक प्रास यांनी शनिवार, 08/12/2012 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
सिमेंट कॉंक्रिटच्‍या जंगलामध्‍ये राहणा-या प्रत्‍येकालाच नैसर्गिक जंगलांची एक ओढ असते. शहरापासून दूर निसर्गाच्‍या सानिध्‍यात काही काळ व्‍यतित करुन स्‍वतःसाठी नवी उर्जा मिळवून पुन्‍हा आपपल्‍या कामांना जुंपून घेणारी जनता आजकाल प्रत्‍येक शहरात आढळते. कदाचित यामुळेच काही तरुणांमध्‍ये डोगर-द-यामंधून, जंगलांमधून, नदीच्‍या खो-यांमधून फिरवणारी ट्रेकींगची आवड वाढीला लागल्‍याचे आढळून येते. असं असलं तरी अनेकांना अशा ट्रेकींग प्रकारात होणा-या श्रमाची जाणीवच हतोत्‍साही करते. अशा लोकांना निसर्गाच्‍या सानिध्‍याचं आकर्षण असतं पण त्‍यासाठी अतिरिक्‍त श्रम करणं नको असतं.

दादला न लगे मला

लेखक शरद यांनी शनिवार, 08/12/2012 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
मला दादला नलगे बाई ! (1) सत्वर पाव गे मला ! भवानिआई रोडगा वाहिन तुला ! सासरा माझा गांवीं गेला ! तिकडेच खपवी त्याला ! ! सासू माझी जाच करती! लवकर निर्दाळी तिला जाऊ माझी फडफड बोलती ! बोडकी कर ग तिला ! नणंदेचे पोर किरकिर करिते ! खरूज होऊं दे त्याला ! दादला मारून आहुती देइन ! मोकळी कर ग मला ! एका जनार्दनी सगळेचि जाऊं दे ! एकटीच राहूं दे मला (2) मोडकेसें घर तुटकेसें छप्पर देवाला देवघर नाही मला दादला नलगे बाई ! फाटकेच लुगडें तुटकीसी चोळी ! शिवाया दोरा नाही ! जोंधळ्याची भाकर आम्बाड्याची भाजी ! वर तेलाची धार नाही ! मोडका पलंग तुटकीसी नवार ! नरम बिछाना नाही ! सुरतीचे मोती गुळघाव सोने !

रात्र चांदणी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 08/12/2012 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र चांदणी ही रात्र चांदणी वाटे कधी संपूच नाही कोडे मिठीतले वाटे कधी सुटूच नाही शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले? मुक्या शब्दांचे गीत कधी झाले ऐकतांना कळले नाही आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली कुठे ते कळले नाही प्रीतीच्या फुलांनी आसमंत धूंद झाला वार्‍यासही आवडूनी तो वाहवत गेला तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले कधी कळले नाही - पाषाणभेद
काव्यरस

छत्रपती शिवाजीमहाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले ?

लेखक बाबा पाटील यांनी शुक्रवार, 07/12/2012 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आंबेडकरी जनतेने दिलेल्या लढ्यानंतर त्यांना स्मारकासाठी त्वरीत जागा मिळाली,मग ज्या छत्रपती शिवरायांनी हा देशाला स्वराज्याचे स्वप्न दाखवले,मेलेल्या मनात स्वाभीमान जागृत केला,मनामनात,इथल्या दगडाधोंड्यात स्वराज्याचे,सुराज्याचे स्पुलिंग पेटवले त्या शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक कधी होणार्,का इथला मराठा पेटल्यावरच सरकारला जाग येणार आहे.....

बुद्ध सरणं गच्छामि । (भाग १)

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 07/12/2012 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. पण देव आणि धर्म यावर विश्वास असणारे लाखो लोक माझ्या भोवती आहेत त्यांच्या पासून तुटून पडण्यावारही माझा विश्वास नाही. त्यांना माझ्या बरोबर खेचून नेण्यासाठी आवश्यक असणारी व्यवहारातील तडजोड करण्यास मी तयार आहे. विचारात मात्र करणार नाही. याच कारण अस आहे की विचार हे तुम्हाला कोणीकडे जायचं आहे याची दिशा दाखवणारे असतात आणि व्यवहार तिथपर्यंत तुम्हाला टप्या टप्याने खेचून नेण्यासाठी असतो.

एखाद्याची लायकी

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 06/12/2012 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याची लायकी म्हणजे काय? हा प्रश्न मला बर्‍याच दिवसांपासून पडला आहे. ही एखाद्याची लायकी नेमकी कशी सिद्ध होते आणि कोण सिद्ध करतो? म्हणजे मलातरी अजुन कळलेले नाही. खरेतर माझी स्वत:चीच लायकी अजुन सिद्ध झाली नसल्याने दुसर्‍याची लायकी काढायचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदा पुण्यावरून मुंबैला येताना रात्री खूप उशीरा दादर स्टेशनवर, विरारला जाण्यासाठी, लोकलच्या तिकीट खिडकीवर तिकीट काढायच्या वेळी माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. तिक़ीट देणारा क्लार्क सुट्या पैशांसाठी हुज्जत घालत होता. बाजूच्या कोपर्‍यात एक एटीम मशीन होते आणि तिथला वॉचमन त्या काउंटरवरच्या क्लार्कशी मी यायच्या आधि गप्पा मारत तिथेच उभा होता.

मित्र :)

लेखक रसायन यांनी गुरुवार, 06/12/2012 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
अकस्मितपणे त्याची तिच्याबरोबर भेट झाली पहिल्या भेटीतचं जणू ती त्याला आपली वाटू लागली वरचेवर होऊ लागल्या त्यांच्या भेटीगाठी वाटले त्याला ती, फक्त बनलीय त्याच्यासाठीचं मनातं त्याच्या आलं सालं एक्दाचं धाडसं करावं आपल्या मनातलं प्रेम तिच्यापुढं व्यक्त करावं धाडसं करूनं तो म्हणाला, "स्विकारशीलं का माझ्या प्रेमा?" पण मित्र बनवून तिने त्याचा पुरता केला मामा ठाऊक नव्हतं बिचार्‍याला प्रेम करायचं सूत्र आयुष्यभरं बनूनं राहीला तो तिचा "मित्रं" :):):);) (कविता- स्वरचित)
काव्यरस