आवडलेली गाणी : ये मौसम रंगीन समा
गाणी वाजवायला शिकताना काही साधीसोपी पण एकदम मूड बदलून टाकणारी गाणी सतत मन वेधून घेत राहिली. या गाण्यात फार काही उच्च नाही पण त्यांच्या साधेपणामुळेच ती गुणगुणाविशी वाटतात. कामात सुद्धा ती बॅकग्राउंडला चालू असतील तर वातावरण लाईट राहतं.
पूर्वी मोठ्या स्टुडिओजमधे चित्रपट निर्मितीची वेगवेगळी कामं एकाच ठिकाणी चाललेली असायची. एकदा एक दिग्गज निर्माता स्टुडिओत फेरफटका मारत होता. तो गाण्याच्या रेकॉर्डिंग रूमपाशी थबकला. एक नामचीन संगीतकार तितक्याच प्रतिभावंत गायिकेला गाण्याची चाल बर्याच वेळेपासनं समजावून देत होता. निर्मात्यानं त्याला विचारलं `भाई बात क्या है? इतनी देर क्यों लग रही है गाना बिठानेमे?
मिसळपाव