साहित्य :
१. लाल बुंद गाजरे १ किलो
a. स्वच्छ धुवून व कोरडी ठक्क पुसून वरचे वर किसून..(मधला पिवळट पांढरा भाग घेवू नये)
२. १ लिटर ताजे निरसे दूध
३. साखर : २- ३ मोठ्या वाट्या...
४. केशर : २-३ चिमट्या
५. बदाम : १०० -१५० ग्राम्स मामरा बदाम ज्यास्त चांगले
६. पिस्ते : १०० ग्राम्स (अफगाणी पिस्ते जे विशेष करून प्रशांत कोर्नेर ठाणे येथे मिळतात)
७. बेदाणे : १०० ग्राम्स (अफगाणी ...वरच्या पिस्त्यान प्रमाणेच)
८. काजू : १०० ग्राम्स/ १५० ग्राम्स मोठे
९. तूप : ५०० ग्राम्स घरी कढवलेले : साजूक (चितळ्यांच्या लोण्याचे असेल तर फारच उत्तम)
१०. मोठे जाड बुडाचे पातेले २
११. तुमची इंग्लिश डिक्शनरी
कृती :
एका पातेल्यात दूध मंदाग्नीवर तापायला ठेवावे...कोमट झाल्यावर साखर घालून हलकेच ढवळावे..
बदाम पिस्ते काजू जाड जाड क्रश करून घ्यावे त्याच्यातले १/३ ३ च्माचे तुपात १ मिनट परतून घ्यावे व बाहेर काढावे...
दुसऱ्या पातेल्यात सुमारे ३०० ग्राम्स तूप माध्यम आचेवर पातळ करून हळू हळू मुठी मुठीने किस्लाले गाजर घालुन परतत राहावे..गाजराच्या प्रत्येक कणाला तूप लागले पाहिजे .. थोडी आंच वाढवा ...गाजराच्या मध्ये खड्डा करा व बाजूने हलकेच दाबत राहा म्हणजे गजराच्या किसातील पाणी मध्ये येईल..ढवळा - खड्डा -ढवळा...बर्यापैकि पाणी निघेउन गेल्यावर २ /३ चमचे तूप टाकून पुन्हा ढवळा...
इकडे दुधाला माफक उकळि आली असावी...आता त्या दुधात केशर तळहातावर चुरून टाका..बेदाणे सोडून बाकीचे ड्राय फ्रुट्स (साधे व तळलेले )घाला व थोडी आंच वाढवा...दुधाला फर्मास उकळी आली पाहिजे...
एकीकडे गाजरे व दुसरीकडे दूध चालू देत ढवळणे...कंटाळा आला कि मधून मधून १-२ चमचे तूप टाकत राहा गाजरावर..
दुधाला थोडे आटले कि त्याला झकास केशरी रंग येईल..पिस्ते उत्साहाने वर तरंगू लागतील..
आता थोडी काळजी पूर्वक कृती....
उकळते दूध शिजनार्या गजरांवर ओतायचे आहे...वाफ हातावर येऊ देऊ नका...दुधाच्या पातेल्यातील तळाला व बाजूला चिकटलेला मसाला नीटकाढून गाजारावर टाका...
ह्या मिश्रणावर उरलेल्या तुपातले ४ चमचे काढून घेउन बाकीचे तूप टाका..व ते जे काही समोर दिसते आहे ते हलक्या हाताने एक जीव करत राहा ...आंच माध्यम ... ५-७ मिनिटांनी बेदाणे घाला व आंच थोडी वाढवा...हे मिश्रण आटून येईपर्यंत धीर धरा (१० -१५ मिनटे)...खाली लागू देवू नका.
आंच बंद करून झाकण ठेवा.. आणि हो ते उरलेले ४ चमचे तूप द्या सोडून कडेने...
आता इंग्लिश डिक्शनरी उघडा...calories diet weight हे शब्द नाहीसे झालेत ह्याची खात्री करून ते झाकण उघडा आणि तुटून पडा..
वरील कृती साधारण १ माणसाला एका वेळी पुरी पडावी....:-)))))
वाचने
5416
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
काल गाजर आणले आणि आज ही पा.कृ
मस्त लिहिलंय
खवा वापरला तर...
फटू किदर?
हाय नाय बाय नाय
मी तर फक्त फोटु साठी पाक्रुझ
छानच....
एक किलो गाजरे किसून झाल्यावर
नाहि....
In reply to एक किलो गाजरे किसून झाल्यावर by सस्नेह
थोडक्यात, गाजराचा किस तुपात
फोटो येत आहे..
साहित्य आणलं का ? मग करा बघू
In reply to फोटो येत आहे.. by अत्रन्गि पाउस
लफडा
अफलातून रेसिपी आहे