Skip to main content

आता तरी देवा,

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 15/12/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी देवा आम्हा पावशील का? महागाईला आळा तू घालशील का? दिवसेंदिवस हि वाढतच जाई | जगामध्ये हिला कोणी रोखणारा नाही | तू तरी हिला आता रोखशील का? महागाईला आळा तू घालशील का? गरीब श्रीमंतातली दरी वाढतच जाई | पुढारी खिसे भरण्यात मग्न होई | याच्यासाठी काहीतरी करशील का? महागाईला आळा तू घालशील का? पैसेवाले रोज करतात मजा | गरिबांसाठी संसार, आहे एक सजा | गरीबांचा वाली तू होशील का? महागाईला आळा तू घालशील का? रोज होत आहे नवीन घोटाळे | गरिबांचे निघते आहे रोज दिवाळे | त्यांच्यासाठी रोज दिवाळी आणशील का? महागाईला आळा तू घालशील का? महागाईचा असा चालला आहे खेळ | खर्चाचा नि पगाराचा बसेना वो मेळ | ताळमेळ घडवून तू आणशील का? महागाईला आळा तू घालशील का?
लेखनविषय:

वाचने 1005
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अप्रतिम, कविता सद्ध्या महागाइने जनता त्रस्त झालि आहे वास्तववादि म्हनुनच खुप आवडली