Skip to main content

देह आत्म्याचे मंदीर

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 24/12/2012 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
उभे भक्कम पायावर एक राजस आहे घर तेथे भगवंताचा वास, देह आत्म्याचे मंदीर देणे लाभले इश्वरी चमत्कार खरोखरी त्याचे लोभस रुपडे काया रेशमी गोजीरी चार खांबांचा निवारा दोन नेत्रांचा पहारा आत्माराम तेजोमय राही धरूनी पिंजरा नको भरू ते धूराने नको माखू काजळीने प्राणज्योतीचे देऊळ ठेवी त्याला निगुतीने देह आत्म्याचे मंदीर दिव्यतेजाचे ते घर उरे मूठभर माती जाता प्राणपक्षी दूर लक्ष चौ-यांशी फ़े-यांत आला मानवी देहात नको घालू रे करंट्या देणे इश्वरी, कच-यात
काव्यरस

मराठी रंगभूमीवर शोककळा

लेखक लीलाधर यांनी सोमवार, 24/12/2012 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
सरत्या वर्षात अजून काय काय पहावे लागणार आहे हे एक गुढच आहे. सकाळी सकाळी एक दु:खद बातमी कानावर आली. मराठी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेता आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे व पेंडसे यांचा दीड वर्षीय चिरंजीव यांचे अपघाती निधन.... मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उर्से टोल नाकयाजवळ रात्री १२.०० च्या सुमारास समोरून येणार्र्या टेंम्पोचा ताबा जाउन डीव्हायडर पार करून तो टेंम्पो त्यांच्या गाडीवर येउन धडकला आणि पुढे काय झाले असेल याचा विचार करणेच खरेच कठीण होउन बसलेय...

ख्रिसमस फ्रुट केक

लेखक Mrunalini यांनी सोमवार, 24/12/2012 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा - १ कप Brown sugar - पाऊण कप बटर - १ कप (room temprature) बेकिंग पावडर - १ टि स्पुन अंडी - २ मिक्स्ड ड्राय फ्रुट्स (बदाम, मणुका, आक्रोड, ड्राय प्लम, जर्दाळु, काजु, ऑरेंज पील कँडी, ड्राय चेरी) चोको चिप्स - २-३ चमचे रम इसेन्स - १ टि स्पुन व्हॅनिला इसेन्स - १ टि स्पुन Baking sheet केक मोल्ड कृती: १. मैदा व बेकिंग पावडर एकत्र २ वेळा पिठाच्या चाळणीने चाळुन घ्यावे. २. सर्व ड्राय फ्रुट्स व चोको चिप्स एका भांड्यात घेउन त्यात १-२ चमचे मैदा टाकुन मिक्स करावे. ह्यामुळे केक मधे ड्राय फ्रुट्स खाली न बसता सगळीकडे पसरतात. ३.

बलात्कार, मिडिया साठी नवा मसाला........

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 23/12/2012 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
बलात्कार, मिडिया साठी नवा मसाला........[माफ करा... असं म्हटल्याबद्दल... :-( ] वर्तमानपत्र आता नुसता बलात्कारांच्या बातम्यांनी भरून येतायेत... बाकी बातम्या बाजूला राहिल्या कुठल्याश्या पानावर ? काय म्हणाव, सुचत नाहीये, सुचिन्ह ? का मसाला ? आधीही बलात्कार व्हायचे मग आत्ताच काय यांना येवढा उत आलाय ?.... माफ करा... पण डोळ्यासमोर छेड होतेय पाहून सुद्धा त्यांच्यात हिम्मत नसते जाऊन अडवायची, मग नुसती प्रदर्शने करून काय होणार ?... नाही करावीत हि.... पण बरोबरच असले प्रकार होताना थांबवण्याची हिम्मतहि दाखवावी, नुसता तेव्हा शेपूट गुंडाळून स्वतःचा स्वार्थ - प्राण वाचवायचा नाही...

मिपाकरांच्या गाठी भेटी

लेखक रुमानी यांनी रविवार, 23/12/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो , बरयाच दिवसापासून आपणाशी संवाद साधण्याची सुप्त इच्छा होतिच. पण काही धाडस झाले नाही .पण झाले असेकी आठ दिवसा पूर्वी काही मिपाकर औरंगाबाद येथे येणार असल्याचे आपले मिपाकर मित्र प्रा .डॉ दिलीप बिरुटे ह्यांच्या कडून समजले . तेव्हाच ठरवले कि काही झाले तरी त्या सर्वांची भेट घ्यायची.

मराठी गाणी

लेखक neeta यांनी रविवार, 23/12/2012 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
आता जरा नवीन व जुनी गाणी आठ्वूया, एका शब्दावरून किती गाणी आठवता आहेत ते बघूया . हे संकेत स्थळ मराठी साठी असल्यामुळे मराठी गाणी आठवूया. शब्द आहे जीवन. माझ्याकडून : जीवनात ही घडी अशीच राहू दे. धागा आवडला नाही तर प्रतिसाद देऊ नका. ज्यांना गाणी आवडतात त्यांना लिहून देत.

खुणावणारे ते यश शेवटी मृगजळच ठरले

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 23/12/2012 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कडाक्याच्या थंडीतही सत्तर वर्षाची, अंगावर सुरकुत्या पडलेली आजी मंदिराच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या अनेक वर्षापासून ती नियमितपणे मंदिरात येत होती पण आज मात्र काठी सावरताना तिचे हात थरथरत होते, पायात एक विलक्षण असा शिणवटा आला होता. 'जन्म हि निसर्गाने दिलेली देणगी आहे. आयुष्याचे इप्सित ध्येय साध्य झाले कि त्या दिवसाची आठवण म्हणून वाढदिवस साजरा करावा' अशी तिची ठाम समजूत होती. ती आपल्या यशोशिखराच्या अगदी पायथ्याशी उभी होती व ईश्वराने साथ दिलीच तर आज ती आपला पहिला वाढदिवस साजरा करणार होती.

'कट्टा... On The Rocks': संक्रमणावस्थेतील पिढीचा आत्मशोध

लेखक रमताराम यांनी रविवार, 23/12/2012 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
'कट्टा' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका.कधी चहाची टपरी नसेल तर कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोल च्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशी पासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा.