Skip to main content

कुंकू का लावतात

लेखक शुचि यांनी बुधवार, 16/01/2013 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतेच. अमेरीकेत खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "हिंदू स्त्रिया, कपाळावर कुंकू का लावतात?" मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "फॅशन" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेते. तर काहींना सांगते की "लग्नानंतर लाल कुंकू लावयच" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "पुरुष गंध का लावतात?" आणि मी निरुत्तरशी होते. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगते की योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, शरीरात अनेक अध्यात्मिक चक्रे असतात.

अलिबागचा समुद्रकिनारा / सुर्यास्त / गणपती विसर्जन: काहि छायाचित्रे!

लेखक पांथस्थ यांनी बुधवार, 16/01/2013 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा वाचल्यावर आठवले कि आपणहि काहि महिन्यांपुर्वी अलिबागला जाउन आलो आहोत आणि छायाचित्रेही काढली आहेत. पण त्यावेळी वेळ नसल्याने अथवा काहि कारणाने मिपावर टाकणे राहुन गेले. मी गणपतीच्या काळात (२०१२) पुणे-अलिबागला एक चक्कर टाकली होती त्या दरम्यान अलिबागला काढलेले हे काहि फोटो. गणपतीच्या ५व्या दिवशी हे फोटो अलिबागच्या समुद्र किनार्‍यावर काढलेले आहेत.

पाकिस्तानमध्ये काय होईल?

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 16/01/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानची निर्मिती ही धर्माधिष्ठित असली तरी प्रत्यक्षात त्या भागात एकाच प्रकारची संस्कृती नव्हती. किंबहुना भारताइतकेच प्रांताप्रांतात असणारे चालीरीतीतील बदलच नव्हे तर भाषा, आचार, विचार याबाबत संपूर्ण पाकिस्तानात वेगवेगळे मतप्रवाह, जनसमुदाय होते - आहेत. भारताला जसे एका घटनेने (संविधानाने या अर्थी) बांधले आहे तसे पाकिस्तानचा 'बायंडिंग फॅक्टर' हा धर्म वाटला, असला तरी त्यांहून मुख्य फॅक्टर होता 'भिती'.

कोबी पराठा.

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 16/01/2013 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
लहाणपणी "कोबी" अन त्याची भाजी हे एक माझ्या नाकासाठी छळवादी प्रकार होते. का कुणास ठाउक पण कोबी काही माझी लहाणपणाच्या आठवणीतली,"रम्य, चविष्ट,तों.पा.सु." भाजी नाही. मग वयाने मोठ व्हाव लागल, अन पानात पडेल ते मुकाट खाण हे रितीला धरुन मान्य कराव लागल. तरीही, कोबी असला की मी दही-साखर, तिळकुट, तोंडी लावणे, यावर जास्त भर देत शक्यतो कोबी शेवटपर्यंत राखुन ठेवत असे. मग झाल लग्न; अन रोजच्या," आज काय करायच?" या प्रश्नाबरोबर टिफीन फ्रेंडली भाजी म्हणुन मला या"गड्ड्याला" शरण जावं लागल.

रक्तामधील घटकांचे आणि रक्ताभिसरणाचे नियंत्रण

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 15/01/2013 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
शरीरामधल्या रक्ताची विविध प्रकाराने तपासणी करून आणि रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरे अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्याचा उपयोग रोग्याच्या शरीराची अवस्था समजून घेण्यासाठी आणि त्याच्या व्याधीचे निदान करण्यासाठी केला जातो. हे करतांना त्याच्या रक्तामध्ये काही दोष किंवा तृटी आढळल्या तर त्यावर औषधोपचार करतात. काही बाबतीत रक्ताच्या तपासणीमध्ये सगळे काही व्यवस्थित निघाले तरी व्याधीच्या निवारणीसाठी त्याच्या गुणधर्मांमध्ये थोडा बदल करणारी औषधयोजना केली जाते.

कांती शाह नावाच कल्ट

लेखक पिंपातला उंदीर यांनी मंगळवार, 15/01/2013 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल लॅपटॉप वर एड वुड हा रिचर्ड बरटन- जॉनी डेप यांचा चित्रपट बहुदा २८ व्या वेळी पाहत होतो. एड्वर्ड डेविस 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुड मधला निर्माता आणि दिग्दर्शक. ६० आणि ७० च्या दशकात याने एलीयेन्स, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. अमेरिका मध्ये Golden Turky Award नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे.

मी नव्याने कोवळा झालो...

लेखक धन्या यांनी सोमवार, 14/01/2013 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील जुन्या आणि नव्या अशा सर्व आदरणीय जिलेबी सम्राटांस वंदन करुन हे जिलेबीचे ताट आपल्यासमोर ठेवत आहे. या काव्याची प्रेरणा काय आहे हे जाणकार कवितेतील काही शब्दांवरुन ओळखतीलच.
काव्यरस

मनातलं जनात आणलंय

लेखक तळेकर यांनी सोमवार, 14/01/2013 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता "महामानव" आयुष्यभर त्याने संत साहित्याचा अभ्यास केला. प्रचार केला. खास करून व्यभिचार आणि भ्रष्ट आचाराला वीरोध केला. व्यभिचारींची "मदत" घेण्यास नकार दिला. त्यांच्या आचरणाने शिकवणीने आम्ही सारे भारुन गेलो.