Skip to main content

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

लेखक मोदक यांनी शनिवार, 19/01/2013 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..

एपिक फॉल

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 19/01/2013 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
कालच ७ वेळा टुर द फ्रांसचा विजेता लॅन्स आर्मस्ट्राँग याने सुरुवातीपासुनच परफॉर्मन्स एन्हॅन्सिंग ड्र्ग्ज घेतले याची कबुली दिली. याआधी त्याने अगदी शपथेवर खोटं बोलुन झालेलं आहे. मुलाखतीत त्याने तो जे प्रकार करत होता त्याविषयी तेंव्हा आपलं काही चुकतंय वगैरे वाटत नसल्याचं सांगितलं. एक लिंक : http://www.youtube.com/watch?v=QTHSFRndS1s आता आमच्या डोक्यात एक किडा वळवळला की बहुतेक खेळाडु टिकुन रहायच्या आशेने असले कैतरी उद्योग करत असतात. क्रिकेट मधे मॅच फिक्सिंक होत होतं / आहे. पण क्रिकेटर्स डोपींग करत असतील का?

मेसोअमेरिका (६.१) - आस्तेक

लेखक किलमाऊस्की यांनी शुक्रवार, 18/01/2013 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग : "मेसोअमेरिका(६) - आस्तेक " २५ फेब्रुवारी १९७८ ची मध्यरात्र. मेक्सिको सिटी नगरपालिकेच्या वीज कामगारांचं नेहमीप्रमणे खोदकाम चालू होतं. 'झोकालो'(१) च्या आसपास खोदकाम करता करता अचानक २ मीटर खोल अंतरावर सुमारे ८ टन वजनाचा अतिशय सुंदर कोरीवकाम केलेला दगड कामगारांना सापडला. त्यानंतर लगोलग मेक्सिको सिटी आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू झालं आणि यातूनच आस्तेकांबद्द्लची बरीच माहिती उजेडात आली. हा शोध फक्त मेसोअमेरिकाचं नव्हे तर जागतिक पुरातत्त्वक्षेत्रात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

सखे ...

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 18/01/2013 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
वळणांवळणांवरती सखे तव आठवणींची भरती सखे कसे विस्मरू सांग तुला मी हे श्वास श्वास तुज स्मरती सखे | पाऊस हा घनगर्द सखे अन् तुझ्या मिठीचा गंध सखे कसा सुटावा असा रेशमी तव बाहुंचा बंध सखे रक्तवर्णित तव लज्जित चर्या श्वासा श्वासांवरि भीति सखे अनामिकशा त्या ओढीने रोमांचित तव कांती सखे चिंब चिंब ही तुझी कुंतले चेहर्‍यावरी मम रुळती सखे थेंब थेंब हा तुला स्पर्षता न कळत होई मोती सखे थरथरत्या तव अधरांची मग पडे घट्ट ती मिठी सखे असे गुंतलो एकामेकीं जणु जन्मांतरीची भेटी सखे श्रावणातल्या सायंकाळी मला गवसले मीच सखे विरुन गेले तुझ्यात अलगद सायुज्यता का हीच सखे ही भोगाची उर्मी म्हणु की तल्लीनतेची समाधी सखे
काव्यरस

दार का लावतात ?

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 18/01/2013 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
इमारतीच्या गेटच्या लगत पेस्टीसाईड मारणार्‍या कंपनीने एक पाटी चकट फू लावलेली असते ." गेट समोर वहाने लावू नयेत" तरीही न शिकलेली - पेपर टाकणारी पोरं तिथंच नेमकी सायकल का लावतात ? असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की " सगळे लोक दार का लावतात?" मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "मुले वयात आल्यानंतर आई व़डीलानी दार लावायचंच " अशी परंपरा आहे.

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 18/01/2013 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मन्नूस, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, पत्र लिहिण्यास उशीर झाल्या बद्दल क्षमस्व. आज मी मुद्दाम प्रयत्न करून तुला मोठे आणि सविस्तर पत्र लिहित आहे, कारण इथल्या नवीन शाळेतल्या मॅडम ज्यांना इथे बाई म्हणतात त्या नेहमी मला माझ्या गचाळ हस्ताक्षर आणि शुद्धलेखनाच्या चुकांसाठी खूप रागावातात. इतक्या मोठया शहरातून आलास तरीही तुझं लेखन इतकं अशुद्ध आणि अक्षर इतकं खराब कसं असं त्या नेहमी म्हणतात. पण त्यांना माझे निबंध मात्र खुप आवडतात, ते त्या सगळ्या वर्गांमधे वाचुनही दाखवतात. त्या माझे नाव आंतर शालेय निबंध स्पर्धेत पाठवणार आहेत, आणि माझा नंबर जिल्ह्यातुन पहिला आलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या.

नकोस

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 18/01/2013 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
ती :- दिवसभराचा उजेड उतरत जातो झाडांच्या तळकोषी आरामाला झिरपत जातो हळू हळू अंधार व्यापतो आभाळाला........ तो :- नकोस हिणवू नको ओणवू सावर ग स्वतःला नभी चांदणे येइल अलगद सजविल तव मेण्याला धुके भ्रमाचे विरघळेल उदयेल नवी स्वरमाला हरवुन जाशिल तिथे सोडशिल ना या जन्माला संध्या- छाया ऊन-सावल्या खेळविती हृदयाला उमलविती रोमांकित वलये जागविती मधुशाला रंग नभाचे तसेच आपले अंत नसे क्षितिजाला शब्द कुंचले घेउन हाती हो सुसज्ज लढ्ण्याला ......................अज्ञात
काव्यरस