Skip to main content

पुस्तक

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 22/01/2013 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघालो आणि गाडीत बसलो कि राखून ठेवलेले एखादे पुस्तक काढतो वाचायला अन त्याच वेळी आपला शेजारी देखील त्याचे पुस्तक काढतो तेव्हा आपले लक्ष आपल्या पुस्तकापेक्षा त्याच्या पुस्तकात डोकावण्यात जास्त असते. नवरा बायकोचे पण तसेच असते काहीसे असे मला वाटते. म्हणजे दोघेही आपापली पुस्तक वाचत असतात पण दुसर्याच्या पुस्तकाबद्दल एक आकर्षण, ओढ आणि हळू हळू हक्क वाटू लागतो. आपण त्यात डोकावू लागतो, मग स्वताच्या पुस्तकामाधली पानं कधी सवयीने तर कधी दुसर्याला कळू नये म्हणून तर कधी आपोआप उलटली जातात. संसारात खरी मज्जा तेव्हा आहे जेव्हा दोघेही एकच पुस्तक वाचाल.

आनंदसागर

लेखक श्रिया यांनी मंगळवार, 22/01/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे.तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात" आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य,आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!

पुणे ५२

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 22/01/2013 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीची नीरव शांततेची वेळ. मुसळधार पाऊस पडतोय. झाडांवरून, इमारतींवरून झरझर कोसळणारा पाऊस सगळं कसं ओलंचिंब करून टाकतोय. जमिनीवर पडणार्‍या पावसाच्या थेंबाचा लयबद्ध आवाज घुमतोय. एक माणूस हातात विजेरी घेऊन पाठमोरा जातांना दिसतोय. त्याची नजर शोधक. डोक्यापासून पायांपर्यंत घातलेला त्याचा काळा रेनकोट पावसाच्या पाण्यात चमकतोय. झाडांची ओली पाने चंद्रप्रकाशात चंदेरी दिसत आहेत. तो चोरपावलांनी हळूहळू काहीतरी शोधत फिरतोय. एका बंगल्याचे एक दार उघडून तो आत शिरतो. एका खोलीच्या दाराजवळ येऊन थबकतो आणि पटापटा फोटो काढायला सुरुवात करतो... ही आहे 'पुणे ५२' ची सुरुवात! खुर्चीवर सरसावून बसलो.

ड्रॅगनच्या देशात १९ - शांघाई : French Concession, Xintiandi, यू युवान बाग, संग्रहालय आणि जेड बुद्धमंदीर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 22/01/2013 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात : ०१... ०२... ०३... ०४... ०५...

चाळ नावाची वाचाळ संस्कृती

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 21/01/2013 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
कॅनडामध्ये आल्यापासून भारतातल्या कित्येकतरी गोष्टी मिस करत आहे. सर्वात महत्वाची म्हणजे आमची मुंबई आणि त्या मुंबईमधली चाळ . चाळ म्हटलं की लोकांच्या अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. काय करणार आपण त्याला?? कारण बिल्डिंग म्हटलं कि मला पाहिलं आठवतात ती बंद दार आणि त्या बंद दारामध्ये नसलेला शेजारधर्म . कदाचित मी चुकीचा असेन, कदाचित म्हणून काय चुकीचाच असेन.कारण आमच्या जन्मापासूनच आतापर्यंतच आयुष्य ह्या चाळीतच घडल आहे .आम्ही कधी बिल्डिंग मधल आयुष्य अनुभवलं नसेल म्हणूनच ही मत बनली असतील. तसचं काहीस बाकी लोकांच असेल ज्यांनी कधी चाळीतल जीवन पाहिलं नाही त्यांच्या मनात काही गैरसमजुती असतील .

R2T (भाग १)

लेखक वाह्यात कार्ट यांनी सोमवार, 21/01/2013 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
(नमस्कार मिपाकरांनो ! __/\__ अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकेतल्या 'ललितलेखनानंतर' सार्वजनिक लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. सांभाळून घ्याओ) अनेक वेळा ठरून सुद्धा राजगड ते तोरणा ट्रेक काही मूर्त स्वरूप घेत नव्हता. राजगड आणि तोरण्याच्या अनेक वाऱ्या झाल्या होत्या पण R2T खुणावत होता. शेवटी हो-नाही करत ४ टाळकी जमली. मी, मयूर आणि २ भूषणस. पुण्यातून निघावयास शुक्रवारी रात्री १० वाजलेच. गडावर जात असल्यामुळे, शिवापुर् जवळ इतरांचा सामिष खावयायचा डाव हाणून पाडून चना मसाला चापून मार्गस्थ झालो. एव्हाना १२ वाजलेच होते. गुंजवणे गावात पोचायला अमंळ उशीरच झाला.

विसरभोळा

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 21/01/2013 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
[ओ. हेन्री यांच्या 'द रोमान्स ऑफ द बिझी ब्रोकर' वर आधारित] हार्वे मॅक्सवेल एक यशस्वी शेअर ब्रोकर होते. पीचर त्याच्या कार्यालयात स्वीय स्वचिवाचे काम करत होता. तो गुरूवारचा दिवस होता. सकाळी साडेनउला मॅक्सवेल नेहेमीप्रमाणे घाईघाईने आपल्या स्टेनोबरोबर ऑफिसमधे आले. स्टेनोचा बदललेला आविर्भाव बघून एरवी मख्ख असणार्‍या पीचरच्या चेहर्‍यावर एक क्षण आश्चर्याचे भाव नकळत उमटले. एका क्षणार्धात "गुड मॉर्निंग, पीचर" म्हणत मॅक्सवेल चित्त्याच्या चपळाईने आपल्या टेबलाकडे झेपावले. ग्राहकांची पत्रे आणि तारा यांचा एक मोठा ढीगच त्यांची वाट बघत होता. स्टेनो आपला रिवाज सोडून अजूनही मालकिणीच्या रूबाबात वावरत होती.

घे उत्तुंग भरारी,

लेखक अनिल तापकीर यांनी सोमवार, 21/01/2013 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात

ओढ तुझी

लेखक आर्णव यांनी सोमवार, 21/01/2013 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
अद्रुश्य भावनांचे, अस्तित्व जाणवावे. विसरुनी या जगाला, तुजला मिठीत घ्यावे. स्पंदनांनी ही मग, वेगळे नसावे. असल्या एका क्षणाचे, मी काय मोल द्यावे. असता जवळ तूची, इतरत्र क्षुद्र आहे. बिन तू चातक हा मी, तव-वृष्टी वाट पाहे. आठवणी तुझ्याच, एकेक गोड आहे. या कोरड्या निशांना, तुझीच ओढ आहे.