Skip to main content

दहा बोटं आणि आपले आशीर्वाद - उस्ताद झाकिर हुसेन (२/२)

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 14/02/2013 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्नः तुमच्या अफाट लोकप्रियतेमुळे मुख्य कलाकारांना तुमचा (साथीदाराचा) हेवा तर वाटत नाही? उ. झाकिर हुसेनः (स्मितहास्य करत) तसं असतं, तर मला इतकं वाजवताच आलं नसतं! प्रश्नः आपल्या वादनावर बंधन पडू नये यासाठी तुम्ही गायकांची साथ करणं थांबवलं आहे का? उ. झाकिर हुसेनः गेली १० वर्षे सोडली तर मी गायकांबरोबर भरपूर वाजवलं आहे. पं. ओंकारनाथ ठाकूर ते पं. जसराज या तीन पिढ्यांमधील जवळजवळ प्रत्येक विख्यात गायकाची मी साथ केलेली आहे. कंठसंगीत हाच आपल्या परंपरेचा गाभा आहे. तोच तर आपला खरा खजिना आहे.

प्रेम दुसरं काय...!!!

लेखक उर्जिता यांनी गुरुवार, 14/02/2013 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
yes..! माझं प्रेम आहे..! म्हणजे माझं, प्रेम या कल्पनेवर आणि सतत प्रेमाच्याच प्रेमात पडुन आयुष्यभर प्रेमात डुंबुन राहण्यावर प्रेम आहे.प्रेम हे खरंतर नकळत ,आणि अगदी क्षणार्धापेक्षा कमी वेळामधे घडून जाणारं, आणि नंतर खोल खोल रुजत जाऊन प्रत्येक क्षण भारवून टाकणारं कोडं. त्याला कोडं म्हणा किंवा गणित(गणिताईतकी नीरस उपमा का देतात देव जाणे..! )ते सोडवण्यापेक्षा त्याच्या हातात हात घालून आयुष्यभर त्याच्या धुंदीत जगण्याईतकं सूख कशातच नाही. मी सतत प्रेमात पडते.! हो ना .. कारण पडणं हीच एक अशी गोष्ट आहे जी झाल्यावरच कळते. बर आणि प्रेमात पडण्याचे माझे ठोकताळे , नियम (so called criteria)असं काही नाही.

उत्सव

लेखक जयवी यांनी गुरुवार, 14/02/2013 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळता दिसते जेव्हा संसाराची चौकट हसरी नकळत होते कशी अचानक पापण्यांची या झालर भिजरी आठवणी नव नवलाईच्या लख्ख काही अन्‌ काही पुसटशा काही गाफिल, सावध काही चुकार अन्‌ लडीवाळ जराशा कधी उतावीळ, कधी अनावर शांत डोह कधी उगाच डचमळ आवरतांना सावरतांना सैरावैरा उठते मोहळ आठवात त्या भिजतांना मग काळ जरासा थांबून जातो तुझ्यासवे या जगण्याचा मग उत्सव होतो... उत्सव होतो. जयश्री अंबासकर
काव्यरस

उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 14/02/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला. श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी.

Raging Bull - Disturb करणारा चित्रपट

लेखक प्रसाद१९७१ यांनी गुरुवार, 14/02/2013 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
Raging Bull - हा अजुन एक Martin Scorsese चा चित्रपट. १९८० साली आलेला आणि आता so-called one of the greatest म्हणुन मानला गेलेला. हा चित्रपट कथा सांगतो Jake LaMotta नावाच्या १९४०-५० मधल्या बॉक्सर ची. एका अतिशय आक्रमक, असुरक्षीत माणसाची who is run by animal insticts, jealousy , sexual desire. ही सत्यकथा आहे, जेक च्या आत्मचरित्रा वरुन घेतलेली. त्यामुळे थोडी सॉम्य झालीय ( स्वताबद्दल लिहिले आहे ना ). चित्रपटाची सुरुवात १९६४ मधे जेक च्या बोलण्याच्या practice नी होते. ( तो एका पब मधे stand up comedy ) करत असतो.

शब्दचित्र (व्हॅलेंटाईन डे स्पेश्शल!)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 14/02/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजही माझा तिचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न चालू होता अगदी नेहमीसारखेच आजही मी तसाच भांबावून नि:शब्द होतो अगदी नेहमीसारखेच कोणी किती गहरे असावे? किती अलंकार शोधावे उपमांसाठी किती वृत्ते धुंडाळावी लयीसाठी कुठून आणावे रंग तुझे भाव रंगवण्यासाठी कसे जमवावे शब्द तुला मांडण्यासाठी न कळे हे नेमके माझेचं असे कां व्हावे? दरवेळेस मी इरेला येतो तुला कागदावर उतरवायला सरसावतो लेखणीतून झरझरून हळवे शब्द पाझरतात क्षणाक्षणाला मी तुझे शब्दचित्र पूर्णत्वाकडे घेऊन जातो मनाचे समाधान होईतो रेखाटून घेतो अन् परत एकदा खात्री करण्यास तुझ्या डोळ्यात पाहतो नेहमीसारखेच . . आता पुन्हा मी भांबावलेला पुन्हा नि:शब्द ना
काव्यरस

जॉर्ज फेरीसचा १५० वा स्मृतीदिन.

लेखक नानबा यांनी गुरुवार, 14/02/2013 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
अख्ख्या जगात १४ फेब्रुवारी हा वॅलेंटाईन दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस फेरीस व्हीलचा प्रणेता जॉर्ज वॉशिंग्टन गेल फेरीस जुनियर याचा जन्म दिवस आहे. jorge जॉर्जचा जन्म १४ फेब्रुवारी, १८५९ रोजी गेल्स्बर्ग, इलिनॉईस येथे जॉर्ज वॉशिंग्टन गेल फेरीस सिनियर आणि मार्था एडगर्टन हाईड यांच्या पोटी झाला. जॉर्ज ६ वर्षांचा असताना त्यांनी गेल्स्बर्ग सोडलं आणि ते नेव्हाडात स्थायिक झाले.

समजत नाही...

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 14/02/2013 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://www.misalpav.com/node/23918 क्रांतीतैची परवानगी घेउन हा प्रयत्न सादर करत आहे,मला गझलच काय कविता सुद्धा करता येत नाही,तरीसुद्धा पण हा एक प्रयत्न , मुड बदलाचा.
काव्यरस

हे रघुनाथ जाधव कोण? कोणी जास्तीची माहिती देऊ शकेल का?

लेखक प्रसाद१९७१ यांनी गुरुवार, 14/02/2013 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
आझाद नावाच्या १९५५ सालच्या सिनेमा मधे अण्णा चितळकरांनी चाल लावलेली "मरना भी मुहोब्बत मे कुछ काम ना आया" ही फार सुंदर कव्वाली आहे. खाली दिलेल्या लिंक वर ती बघता येईल. अण्णांनी नेहमीचीच कव्वाली कम मुजरा गीतांच्या चालीला एक सुंदर वळण दिलेले आहे. सिनेमा मधे दोन कलाकारांनी ती अतिशय प्रसन्न पणे सादर केली आहे. आंतर जाला वर बघितले तर ती एका "रघुनाथ जाधव" यांनी गायली आहे. कदाचित चित्रण पण त्यांच्यावरच झालेले असावे. http://www.youtube.com/watch?v=x58KzqeE54U मुद्द्याची गोष्ट म्हणजे रघुनाथ जाधव हे नाव मराठी असुन सुद्धा कधी ऐकले नव्हते.

पनीर - पिस्ता बहार...

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 14/02/2013 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळि, कालची गणेश जयंती आणि आजचा प्रेमदिवस हा दुहेरी संयोग साधुन खालील पाकॄ केली....बाप्पा आणि बायको दोघेहि खुश......अरे हाय काय नाय काय! सर्व मिपाकरांना प्रेमदिनाच्या हर्दिक शुभेच्छा! Paneer-Pista साहित्यः १. किसलेलं पनीर - २ वाटया २. पीठिसाखर - आवडिप्रमाणे कमी / जास्त ३. वेलची पुड - पाव चमचा ४. पिस्ता पुड - १ वाटि मध्यम ५. खायचा रंग - आवडिप्रमाणे कुठलाहि ६. बदाम काप - सजावटिसाठि कॄती: १. पनीर ताजं मिळालं तर उत्तम.