Skip to main content

आयटीच्या गोष्टी - नमन

लेखक धन्या यांनी शनिवार, 16/02/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्‍या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट. आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. पण ते खरं नाही.

फिल्टर कॉफी

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 16/02/2013 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस म्हणजे काम. काम म्हणजे कंटाळा. कंटाळा म्हणजे विरंगुळ्याचा शोध. सर्वात सोपा विरंगुळा म्हणजे चहा/कॉफी. सर्वसाधारणपणे प्रत्येक ऑफिसमध्ये चहा कॉफीची सोय असते. आमच्याही आहे. साधं मशीन होतं आधी; आता आमचे लाड म्हणून ‘सीसीडी’ चं बसवलंय. त्याचं स्वागतही झालं बसवल्यावर. आहे; छान आहे. पण सध्या एक नवीन डिस्कव्हरी झालीय मला. एक चहा कॉफी वाला आहे आमच्या ऑफिसखाली. तसा शक्यतो मी चहा कॉफी च्या वाट्याला जात नाही. ‘कधीच’ हा शब्द मी वापरत नाही, कारण अनेक कारणांमुळे अधे मधे माझं कॉफी/चहा पान होतं आजकाल. हां, तर तो चहा कॉफीवाला. त्याची थोडक्यात स्टोरी अशी आहे की तो एम८० ने आमच्या बिल्डिंग खाली येतो.

प्राचीन हस्त लिखित भृगु संहिता

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 16/02/2013 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीन हस्त लिखित भृगु संहिता व्हिडिओ ची लिंक कार्यशाळा २०११ च्या अंतर्गत होशियारपुरच्या महाशिव यांच्याशी बोलताना केलेले शूटींग. एका हातात कॅमेरा धरून दुसऱ्या हाताने पत्रे हाताळण्यामुळे जरा गचाळ झाले आहे. तरीही उत्सुक व्यक्तींना यावरून कल्पना येईल. पंजाबी ढंगातून बोलणारे महाशिवजी लगेच नाराज होताना 'बस करो' म्हणतात.

आता सांगा..

लेखक इनिगोय यांनी शनिवार, 16/02/2013 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
खरंय! बेचैन नक्कीच आहे मी. अगदी फारच. आधीही तसंच होतं आणि आत्ताही आहे. पण मला वेड लागलं आहे असं काय म्हणून म्हणाल तुम्ही? या आजाराने माझ्या जाणिवा तुम्हाला वाटतंय तशा नष्ट केलेल्या नाहीत, तर अतिशय तीक्ष्ण केल्या आहेत. त्यात सगळ्यात तीव्र आहे ती म्हणजे माझी ऐकण्याची क्षमता. अस्पष्टशा आवाजालाही वेधणारी. अत्यंत अचूक. अगदी स्वर्गातला असो, की पृथ्वीवरचा किंवा मग पाताळातलाही, कोणत्याही आवाज ऐकू शकेन मी. आता सांगा.. हा काय भ्रमिष्टपणा आहे? मी जे सांगत आहे ते नीट लक्ष देऊन ऐका.

उत्क्रांती मोबाईलची- मोटोरोला.

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 15/02/2013 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी नुकत्याच टाकलेल्या उत्क्रांती-मोबाईलची या विषयाची माहिती घेत असताना एक लक्षात आलं की हा विषय फार खोलात जाऊन वाचण्यासारखा आणि रंजक आहे. म्हणून म्हटलं थोडं अजून लिहावं. आधीच्या धाग्यात generalised मोबाईलची उत्क्रांती लिहीली होती. या धाग्यापासून एकेका ब्रँडचा उदय कसा झाला, कुठून सुरूवात करून आज कुठल्या पदावर तो ब्रँड आहे यावर लिहावं म्हणतोय. वाचक सांभाळून घेतीलच. धाग्याव्यतिरिक्त जास्तीची माहिती कुणाकडे असल्यास वाचायला नक्की आवडेल. :) तर मोबाईलचा पहिला हँडसेट ज्यांनी काढला त्या मोटोरोला पासूनच सुरूवात करूया.

आरक्षण

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
अनुसूचित जाती जमातींना शिक्षणात आरक्षण झालं, महिलांना सगळीकडे आरक्षण झालं, आता ठराविक जातींना बढतीत आरक्षण म्हणतायत; असं ऐकलं मी की आणखी काही मंडळी आपापल्यासाठी आरक्षणाचे प्रस्ताव मांडणार आहेत. जसं, जाड्या माणसांना सौंदर्यस्पर्धांमधे आरक्षण नाचता न येणा-यांना नृत्यस्पर्धेत आरक्षण गाता न येणा-यांना गायनस्पर्धांत आरक्षण टक्कल असणा-या लोकांना शॅम्पूच्या अ‍ॅड्स मधे आरक्षण दुचाकीधारकांना कार रेस मधे आरक्षण सॉफ्ट ड्रिंक पिणा-यांना बार मधे आरक्षण.... ...यादी खूप मोठी आहे.

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 15/02/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी काही नामांकित रसायने ही आहेत. शेजारी. हे रसायन स्फोटक नसले तरी अत्यंत उपद्रवी व बरेचसे चिकट असते. याचा शब्द-नाद अत्यंत मधुर असतो. किल्ल्यांपासून कुत्र्याच्या पिल्ल्यांपर्यंत काहीही जबाबदारी यांच्याकडून आपल्याला चिकटवली जाऊ शकते. म्हणून हे रसायन हाताळताना त्याचे अति निकट सान्निध्य टाळण्याची खबरदारी बाळगावी अन्यथा चिकट अनुभव येतो. हे रसायन पाण्यापेक्षाही प्रवाही असल्याने फट दिसली की आत घुसलेच म्हणून समजावे. आपल्या घरी काही खमंग पदार्थ बनत असताना आपल्याआधी याला त्या पदार्थाचा वास पोचतो.

नाचणीचे पौष्टीक लाडू

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 15/02/2013 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अर्धा कि. नाचणीचे पीठ, एक मध्यम वाटी(अंदाजे १०० ग्रॅम) सुके खोबरे, दोन वाट्या पोहे, १०० ग्रॅम खारीक पावडर, पाव कि. तूप, अर्धा कि. पिठी साखर, वेलची पावडर स्वादानुसार. क्रुती: अर्धा कि. नाचणीचे पीठ घ्यावे. अर्धी वाटी तूप बाजुला ठेवून बाकीचे कढईत घ्यावे. त्यामध्ये नाचणीचे पीठ घेऊन बेसनाच्या लाड्वाप्रमाणे भाजून घ्यावे. नाचणीचा रंग मुळात काळपट असल्याने भाजताना खमंग वास सुटेपर्यंत भाजावे. (अंदाजे १० ते १५ मिनिटे) भाजलेले पीठ गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून खमंग भाजून घ्यावे. पोहे भाजून घ्यावे. खारीक पावडर जरा गरम करावी. भाजलेले सुके खोबरे मिक्सरला भरडसर फिरवावे.

माझी बायको..

लेखक स्मिता चौगुले यांनी शुक्रवार, 15/02/2013 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रुपमध्ये एकदा अशीच चर्चा सुरु होती मुलींच्या मुलांकडून किती अपेक्षा असतात वैगेरे वैगेरे .. मग काय कुरघोडी सुरु, झाली मुलीपण मागे हटेनात...लग्न झालेल्या, लग्नाच्या तयारीत असणाऱ्या सगळ्या एकमताने आप-आपले अनुभव, ऐकीव माहिती शेअर करत होत्या की प्रत्येक मुलीच्या जशा आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात तशा मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायको बद्दल भरपूर अपेक्षा असतात, ती अशी हवी तशी हवी .. त्यावेळेस हि कविता सूचली, म्हटलं चला नेहमीच्या विषयापेक्षा हटके विषय मिळाला (एक मुलगी म्हणून मुलींच्या अपेक्षा कवितेतून मांडेल असं ग्राह्य धरतात लोक..

च्याई.s.s.यला परत तिचा फोन आला..

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 15/02/2013 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी साडेसातच्या सुमारास घर सोडले. डॉकयार्डहून बेलापूर ट्रेन पकडली. फर्स्टक्लासचे कंपार्टमेंट अन नेहमीची विंडो सीट. कॉटन ग्रीन यायच्या आधी सवयीने डोळा लागला. अर्थात तेच बरे असते, कारण पुढे वडाळ्याला कॉलेजला जाणार्‍या अठरा ते चोवीस वयोगटातील ललना (गेली दहा वर्षे मी यांवरच डोळा ठेऊन असतो) चढल्या की पापणीला पापणी भिडवावीशी वाटत नाही तिथे झोपणार काय. मग बेलापूर आल्यावर परतीच्या एका प्रवाश्याने नेहमीसारखे माझी जागा पटकावण्यासाठी मला न चुकता उठवले तेव्हाच काय ती जाग आली. तसेच अर्धवट सर्धवट मिटलेल्या डोळ्यानी पाच-एक मिनिटांची पायपीट करत ऑफिसला पोहोचलो.