Skip to main content

यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

लेखक विक्रांत यांनी रविवार, 17/02/2013 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा अनेकदा आपली अडवणूक होते ती पुरेशी माहिती न ठेवल्यामुळे किंवा कर्णोपकर्णी ऐकलेल्या माहितीची खातरजमा न करता तिच्यावर सरसकट विश्वास ठेवल्यामुळे. सरकार अनेकदा आवाहन करते त्या जाहिराती आपण वाचतही नाही. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून हे लिहितोय. 'आधार' साठी कंत्राटी मुले असतात; ते फक्त नाव व पत्ता नोंदवून मोकळे होतात. इतर माहिती नोंदविण्याचा कंटाळा करतात. मात्र ई-मेल व मोबाईल क्रमांक जरूर नोंदवून घ्यावेत. एजन्सीच्या माणसाने केलेल्या नोंदी योग्य असल्याची खात्री करून मगच पोचपावती स्वीकारावी.

माझी ऑफीसची डायरी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 17/02/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
५ जुन २०१० शनिवार १६:३० माझ्या केबीनमधे बसुन सोमवारच्या प्रेझेन्टेशनची तयारी करत होतो . नकळत समोरच्या काचेतुन बाहेर पाहिल तर नेहमी बर्‍यापैकी वर्दळ असणारार्‍या त्या ऑफीसच्या मध्यभागी असलेली ती शांतता , सुनसानपणा उगाचच मनाला टोचत होता . बाहेरच्या क्युबीकल वर रीमा ह्याच प्रे़झेन्टेशनची इतर तयारी करत होती . (तिला बघुन मला उगाचच माझ्या करीयरचे पहिले काही दिवस आठवतात ...तेच डेडीकेशन ... तशीच मोठ्ठी स्वप्ने .. त्यासाठी सतत प्रयत्न ....वगैरे वगैरे ) माझ्या कीबोर्ड ची खट्खट अन एसीची इतर वेळी कधीही न जाणवणारी घरघर सोडली तर बाकी सारी शुन्य शांतता होती . अचानक काहीतरी लाईटनिंग झाल्यासारखे वाटले...

माहुली गड

लेखक अनिकेतदळवी यांनी रविवार, 17/02/2013 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले होते कुठेतरी ट्रेकींग ला जाण्याचा प्लान चालू होता .थोडावेळ विचार झाला आणि ठिकाण ठरलं माहुली गड हे नाव आमचा मित्र बाबू ने सुचवलं होत तो आधी तिथे गेला होता पण ट्रेकींग पूर्ण करता नाही आल त्यांना कारण ते रस्ता चुकले होते म्हणून तो म्हणाला आपण तिचेच जाऊ मग ठरलं आमचं ऑक्टोबर च्या १६ तारखेला शनिवारी जायचंच.

समुद्रावरील पहिला दिवस

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 17/02/2013 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
१९८९ च्या पावसाळ्यातील (जूनमधील) हि गोष्ट आहे. मी इंटर्नशिप संपवून कुलाब्याच्या नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात काम करीत होतो आणि जवळच कमांड मेस मध्ये राहत होतो. रुग्णालयाचे कामाची वेळ सकाळी ७.३० ते १३.३० अशी असे तेंव्हा मला सकाळी ६.३० ला उठण्याची गरज पडे. एकेदिवशी पहाटे ०५.३० वाजता माझ्या खोलीवर टकटक झाले. पहिले तर एक नौसैनिक माझ्यासाठी एक बिनतारी संदेश घेऊन उभा होता.

आजीच्या गोष्टीमधली खार

लेखक कौस्तुभ आपटे यांनी रविवार, 17/02/2013 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजीच्या गोष्टीमधली खार आठवते मला फ़ार फ़ार इवलेसे डोळे, मीच मीच खुळे शेपुट करडी झुपकेदार! ससेभाऊ टेलर, उंदीरमामा बेकर मास्तरीण चिंमणाबाई, न्यायाधीश माकड प्राण्यांची सभा, नी शेपट्यांचा त-हा असे सारेच किस्से मजेदार आजीच्या गोष्टीमधली खार गोष्टीतून आजी दूर दूर नेई जात जाता अंगणात, आम्हा येई गाई दादाचे डोके, कुरळे कुरळे त्यात मधेच फ़िरे तीचा हात आजीच्या गोष्टीमधली खार गीत -कौस्तुभ

राष्ट्रवादीची राजेशाही

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 17/02/2013 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा जाणता राजा असा ज्याचा लौकिक बनवला जातो आहे अशा शरद पवारांच्या पक्षात सध्या थाटामाटात विवाहसोहळे, वाढदिवस वगैरे साजरे करायची अहमहिका सुरु असावी असे वाटते आहे. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात यंदाही दुष्काळाचे रडगाणे चालू असल्यामुळे राजकीय दृष्ट्या असे श्रीमंती उधळपट्टीचे जाहीर प्रदर्शन आपल्या पक्षाला गोत्यात आणू शकते हे जाणत्या राजाने त्वरित जाणले त्यामुळे संबंधित इसमाची, ज्याचे नाव भास्कर जाधव (नगरविकास राज्यमंत्री) खरडपट्टी काढली. बहुधा ती खरडपट्टी मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर टाइपाची असावी असे वाटते.

दारवा....

लेखक पक पक पक यांनी शनिवार, 16/02/2013 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा जास्तच झाली आहे असे रोज बार मधे बिल आल्यावर वाटते,फक्त चार पेग लावुन देखील दोन तासांत ते शेट्टी हराम्खोर फारच लुट्तय , तरी बोटे चालतात नोटा मोजायला पण बिल वाचायला डोके मात्र चालत नाही , back ground मध्ये गोंगाट अन शिव्यागाळी शिवाय काहीच ऐकु येत नाही, तितक्यात बायकोचा फोन येतो, संध्याकाळी भाजी आणायला बाहेर पड्लास आता गिळायला तरी येणार आहेस का म्हणून आवाज कारदावतो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो.
काव्यरस

सावध रहा!!

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 16/02/2013 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्तामध्ये फेबु वर चॅट करून फसवलेल्या एका तरूणाची बातमी वाचली. मुंबई व्रुत्तांत मध्ये त्यावर सविस्तर बातमी आहे. एका मुलग्याने मुलगी असल्याचे भासवून मैत्रीचे जाळे टाकले आणि एक सुंदर मुलगी आपल्याला फ्रेन्ड रीक्वेस्ट टाकते हे पाहताच तो बरोब्बर जाळ्यात अडकला. अशी एक टोळीही कार्यरत असल्याचे वाचले ज्यामध्ये एक मुलगी सुध्दा सामिल होती. श्रीमंत तरूण पाहून त्याच्याशी मैत्री वाढ्वायची, आणि एक दिवस घरी एकटीच आहे असे सांगून भेटायला बोलवायचे. तो तरूण मुलगी एकटी आहे, अशी स्वप्ने रंगवत तिच्या घरी पोहोचतो तर तिचे साथिदार त्याला बदडून, लुटून पलायन करतात.

लाल मीर्ची लसुण चटणी

लेखक रश्मि दाते यांनी शनिवार, 16/02/2013 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
ओल्या लाल मीर्ची चे तुकडे १ वाटी लसुण १/२ वाटी जीरे १ चमचा लींबाचा रस आवडीप्रमाणे मिट चवीप्रमाणे फोडणी करीता तेल १/४ वाटी मोहोरी १ चमचा जीरे १ चमचा हींग मीक्सर मधे लसुण्,जीरे,मीर्च्याचे तुकडे मिट घालुन वाटुन घ्या. त्यात लिंबु पीळुन घ्या.वरुन फोड्णी घाला भाकरी,पोळी किंवा ब्रेड बरोबर म्स्त लागते