प्रश्न !
मेणबत्या पेटवणार्यांनो तुम्ही
हातात मशाल कधी धरणार ?
चिमुरड्यांवर होणारे बलात्कार
अजुन किती काळ पाहणार ?
स्फोटात लोक हल्ली रोजच मरतात,ती ब्रेकिंग न्युज असते
आपण त्यात तसे मेलो नाही,यातच का आपण धन्यता मानणार ?
भ्रष्टाचाराने संपुर्ण देश आपला गांजला असा
राजकारण्यांच्या पंगतीत आता धुतला तांदुळ शोधणार कसा ?
देशाच्या सिमेवर जवानांची क्रुरपणे मुंडकी छाटली जातात
तरी सुद्धा आपण त्यांना फक्त इशारेच देत राहणार ?
मंगळावर यान पाठवायचे म्हणुन मिशन आखणार
पण गरिबाला घास देण्यासाठी प्रयत्न कधी करणार ?
कोट्यावधींच्या देशात आता माणसाला नाही किंमत
चार जण जसे जगातात तसे तुम्हीपण का जगणार ?
जग
मिसळपाव