Skip to main content

लेफ्ट राइट की डावे उजवे

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 06/03/2013 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी आपल्या राजधानीमध्ये दरवर्षीसारखा जंगी कार्यक्रम झाला. सैनिक आणि पोलिसदलांच्या अनेक तुकड्या मोठ्या ऐटीत "लेफ्ट राइट", "लेफ्ट राइट" करत परेड करतांना पहायला मिळाल्या. सर्वांचे उजवे आणि डावे पाय एका लयीत पडत असतांना आणि हात एकासारखे एक वर खाली होत असतांना त्यातून अद्भुत दृष्य निर्माण होत होते. त्यात 'उजवा' आणि 'डावा' या दोन्हींचा समान वाटा होता, किंवा त्यांच्या लयबध्द हालचालींमध्ये अणुमात्र फरक वाटत नव्हता. आपल्या जीवनात मात्र आपण नेहमी 'डावे, उजवे' असे करत असतो. 'डावे' म्हणजे कमी दर्जाचे आणि 'उजवे' तेवढे चांगल्या प्रतीचे समजले जाते.

एक भिंत येथे होती

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 06/03/2013 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या गावचा | रस्ता उदास वाटला | वेशीतल्या कमानीचा | खांब का हा वाकला ||१|| एक कामधेनू होती | इवल्याशा आठवांत | दावे भकास आज | भिजले गं आसवात ||२ || काळ्या आईस नाही | काळ्या ढगाची भेट | थरथरणा-या मनात | रणरणते ऊन थेट ||३|| एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली ||४|| ओठांत आज नाही | हक्काचे एक हासू | आई महागले गं | डोळ्यांतलेही आसू ||५|| - संध्या ०६ मार्च २०१३
काव्यरस

लाल पेरू

लेखक सुज्ञ माणुस यांनी बुधवार, 06/03/2013 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
लाल पेरू "अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो. पेरू, अहाहा.. या दोन शब्दातच किती सुख सामावले आहे.

अनपेक्षित भाग २

लेखक निमिष ध. यांनी बुधवार, 06/03/2013 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आणि कोणाच्या तरी ओळखीने राहण्यासाठी जागा पाहण्याची विनंती करून संभाषण संपले. आता जागा पाहणे आले असे म्हणतानाच बॉस चा ईमेल आला. काही तरी नवे काय अजून काय! (भाग १ ) आज संध्याकाळी कोणाचा मेसेज आहे का ते पाहत होतो. अनुष्काचा होताच. या कामाच्या रगाड्यात तिच्यासाठी कोणाला जागा आहे का ते विचारणे राहूनच गेले होते. तिला sorry म्हणून या आठवड्यात नक्की काम करतो असे सांगितले. थोडे इकडचे तिकडचे बोलून ती गेली. मी लगेच फोन फिरवला. नूरी ला विचारले तिच्या कोणी मैत्रिणी रूममेट शोधतात का. आणि काय विचारता पहिल्याच फटक्यात जागा मिळाली.

आमसुलाचे सार

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 06/03/2013 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमसुलाचे सार नारळ घालून किवा नारळा शिवायही करतात. साहित्य- ५/७ आमसुले किवा अर्धी वाटी कोकमाचं आगळ, एका नारळाचे दूध किवा साधारण २ वाट्या नारळाचे दूध, १/२ हिरव्या मिरच्या,अर्धा चमचा साजूक तूप, थोडे जिरे, मीठ व साखर चवीनुसार, थोडी कोथिंबिर, पाणी कृती- आमसुले गरम पाण्यात ३५-४० मिनिटे भिजत घाला, नंतर त्यातील पाणी काढून घ्या व उकळा. कोकमाचा आगळ असेल तर त्यात २-३ वाट्या पाणी घालून उकळत ठेवा.

आठवण...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 06/03/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींनी जीव माझा बेचैन किती जाहला? सखये तुझा कुठे तो... माझाही न राहिला. दूर किती दूर जाशी लागे मज हुरंहूरं शांत आहे ही तृप्तता की भावनांचे काहूरं? वेड असे भीत आहे हाक कशी देऊ मी? का तुझिया स्मरणाने फक्त तृप्त होऊ मी??? आसवांचे नजराणे का मागे प्रीत ही? सहजाच्या जगण्याची का अल्लड रीत ही? दु:ख्ख असे आज नाही जरी न तुझा राहिलो देवालयी पुष्पांसम निर्माल्य अता जाहलो. वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...
काव्यरस

उस सिक्सर की गूंज!

लेखक फारएन्ड यांनी बुधवार, 06/03/2013 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी... गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही!

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०३ : ट्रुम्सो - नीलप्रकाशातली मासेमारी सफारी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 05/03/2013 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

दारू - म्हणजे काय रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 05/03/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते.

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 05/03/2013 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना एकास आवडे जे दुसऱ्यास का पटेना स्पर्धेत जीवनाच्या का ताळमेळ नाही कुठलाच मनपतंग कटता कसा कटेना उपदेश कायद्याचा करण्यात गुंततो जो सुधरावयास तोरा अपुलाच का झटेना भिक्कार आहे म्हणुनी धिक्कारतो कुणी तो किति छान आहे म्हणुनी हा दूर का हटेना माझ्याचसारखा मी समजे कुणी स्वत:ला गर्वात आत्मस्तुतिचा फुगता फुगा फुटेना .