Skip to main content

करंट मस्त...दत्त दत्त...!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 09/03/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षकातल्या ओळी ओळखिच्या वाटताहेत का हो??? पण नसली लागली ओळख तरी लागेल अजून काहि वेळानी... आंम्हाला या दोन ओळींची खात्री पटली त्याला कारण,आमचा काहि रोजांपूर्वीचा कोल्हापूर दौरा. काय आहे ना,कोल्हापूर म्हटलं की दोन गोष्टी स्वाभाविकपणे येतात.पहिलं अंबाबाईचं दर्शन...आणी दुसरी कोल्हापुरी मिसळ.शिवाय याची संगती पुढे तांबड्या/पांढर्‍या रश्यानी,शाहू पॅलेस पाहाण्यानी,पन्हाळ्यावर हिंडण्यानी...आणी दारात म्हस पिळून मिळते त्या धारोष्ण दुधानी पण लावता येइल. पण कोल्हापूरात..पहिल्या दोन नंबरात आमच्या लेखी येणारी हीच दोन स्थळ आहेत. पुढचिही आहेत पण ती अनुषंगिक. आणी ज्याच्या त्याच्या अवडीनुसार.

मनोरमा

लेखक प्रतिज्ञा यांनी शनिवार, 09/03/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रिनिनो, थोड पाककृतीच्या नावाबद्दल सांगावस वाटत. मनोरमा हा पदार्थ एकदम साधा पण चविष्ट पाककृती मध्ये मोडतो. मला माझ्या मामा मुळे महाराष्ट्रातील अधिवासी पट्ट्याचा (धडगाव, अक्कलकुवा, तोरणमाळ ई.) सहवास लाभला. त्या भागात मनोरमा न्याहारी/ नाश्त्यात बनतो. माझ्या आजीच्या एका मैत्रीणीने मोठ्या कौतुकाने (कौतुकाने ते या साठी कि मी पहिल्यांदाच त्यांच्या पाड्यावर जाणार होती व त्याच वर्षी मी दहावी बोर्डात वर्गात पहिला क्रमांक मिळवला होता:) ) मला मनोरमा व माझ्यासमोरच काढलेल्या बकरीच्या दुधाचा गुळ घालून बनवलेला पातळसा (खर सांगायचं म्हणजे बकरीच्या दुधाचा चहा पातळच बनतो. पण हे मला त्यावेळी माहित नव्हत.

अळी मिळी गुपचिळी

लेखक जयवी यांनी शनिवार, 09/03/2013 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
pain “सगळं होतंय ना मनासारखं मग झालंय काय चेहेरा पाडायला ?” प्रश्न तेच पुन्हा पुन्हा... “सुख बोचतंय..... दुसरं काय...” उत्तरंही तीच.... त्यांचीच पण बोलणार नाही मी...!! का सगळं बोलून दाखवायचं... का सगळं उघडून दाखवायचं... मीच माझं कुलूप उघडायचं, आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं. मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार मीच ती गोळा करायची माझ्यासाठी.......
काव्यरस

आन्जी: शतशब्दकथा: पैला नंबर

लेखक आतिवास यांनी शनिवार, 09/03/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो. गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची. आमी सर्वे मऊ हून जायचो. नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा. म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...” अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का. पण मला कटाळा यायला. सारखी बबली माझ्यासंगं. कुणी मला खेळायला बी घेईना. झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच. हात बी दुखायला लागला. बबली जड लई. एक दिस कुणाचं ध्यान नाही ते बगितलं. जोरात चिमटा काढला बबलीला. रडली लई.

महानंदा चित्रपटातील अस्वस्थ करणारा प्रसंग

लेखक शुचि यांनी शनिवार, 09/03/2013 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट इज नॉट आर्ट टिल इट डिस्टर्ब्स यु.
हे वाक्य म्हणून वाचायला बरे आहे. पण खरच अशी कला जेव्हा सामोरी येते, तेव्हा भयंकर वाटते. खूप वर्षांपूर्वी, खरं तर लहानपणी "महानंदा" हा चित्रपट पाहीला होता. दूरदर्शनवर लागला होता. अर्थातच सेन्सॉर केलेला होता. आज परत आपलीमराठी वर पाहीला. व्यक्तीचित्रण अतिशय प्रभावी आहे. जयवंत दळवींसारख्या सिद्धहस्त लेखकाची कथा असल्याने चित्रपट उत्तम असणार यात वादच नव्हता.

तंत्रज्ञान आणि स्वातंत्र्याचं शेकहँड - सिल्की मिल्की

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 08/03/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
खास महिला दिनानिमित्त नेस्ले कंपनी घेऊन येत आहे, त्यांचे ब्रँड न्यू अनुभव 'सिल्की मिल्की'. आजकालच्या स्पर्धेच्या युगात स्त्रियांना नोकरी मिळवण्यासाठी पुरुषांशी स्पर्धा करावी लागत आहे. कामाचा वेळ अधिकाधिक देता यावा म्हणून स्त्रियांना फक्त आपली कामासंदर्भात असणारी स्किल्स वाढवून चालत नाही. किती वेळ पोर्सलिनच्या सिंहासनावर घालवला हे जिथे मोजतात तिथे पुरुषाच्या दाढी करण्याच्या रेकॉर्ड कमी वेळेला टक्कर देत झटपट सॅनिटरी नॅपकिनही बदलावा लागतो. या जीवघेण्या स्पर्धेतून कोणीच सुटू शकत नाही. ज्यांना उन्नती करायची आहे, पैसा कमावायचा आहे, स्वतःचं नाव कमावायचं आहे त्यांना या स्पर्धेला तोंड द्यावंच लागतं.

फोन वापरताना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/03/2013 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
फोन वापरताना बरेच वेळा फोन ची कॉर्ड एकमेकात आडकते फोन येतो व आपण गडबडीत रिसिव्हर उचलतो अन कॉर्ड एकमेकात गुंतल्याने फोन पण रिसिव्हर सगट उचलला जातो अन गोंधळ उडतो. ते टाळण्या साठी एक साधी युक्ती. १..बाथरुम मध्ये वापरतो त्या रबरी नळी चा साधारण ३ " लांबीचा तुकडा घेणे (चित्र क्र .एक) . २.कॉर्ड काढुन त्यात हा रबरी नळिचा तुकडा साधारण मधोमध ओवणे (चित्र क्र .दोन )

वर्तुळ-कोन सिद्धांत

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 08/03/2013 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
" 'वर्तुळ-कोन सिद्धांत' हा एक नव्याने पुढे आलेला विषय आहे. गेल्या साधारण सहा-एक वर्षांतील (माझ्या) अनुभवांवरून तो मला समजला. मग मी एक प्रयोग केला. त्या प्रयोगातून हा सिद्धांत शाबीत होतो, असे ध्यानी आले. तेव्हा त्या प्रयोगाची वारंवारिता वाढवली. काही प्रमाणे बदलली, आणि प्रयोग केले. याचवेळी माझ्या असेही ध्यानी आले की, काही जण (बहुदा अजाणता) असा प्रयोग करत असतातच. माझे प्रयोग आणि त्यांचे प्रयोग यातून असे दिसले की हा सिद्धांत शाबीत होत आहे.

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०४ : ट्रुम्सो – नॉर्दर्न लाइट्स् (ऑरोरा) डिनर क्रूझ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 08/03/2013 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...