Skip to main content

" डराव डराव -"

लेखक विदेश यांनी गुरुवार, 14/03/2013 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
टकमक टकमक बघत बघत डोळे मोठे आणखी करत येता जाता डराव डराव का ओरडता बेडूकराव तुमच्या उड्या टुणूक टुणूक चपळाईची मस्त चुणूक अंगणातल्या डबक्यात किती करता बाहेर आत पाण्यात जास्त भिजू नका डराव डराव गर्जू नका सर्दी पडसे झाल्यावर खोकत बसता काठावर औषध कधी घेत नाही डराव डराव थांबत नाही झोपू द्या ना शांत आम्हाला नाहीतर सांगीन नांव आईला !

रताळ्याच्या तिखट पुर्‍या

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 13/03/2013 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ मोठे रताळे उकडून, साल काढून, कुस्करून घ्रेणे दीड वाट्या गव्हाचे पीठ १/२ वाटी मैदा (ऐच्छिक) २ टेस्पून साजुक तूप १/२ टीस्पून हळद १-१/२ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून बडीशेप पावडर १-१/२ टीस्पून धणेपूड मीठ चवीनुसार तळण्यासाठी तेल . पाकृ: मिक्सींग बाऊलमध्ये कणीक, मैदा, लाल तिखट, बडीशेप पावडर, हळद, मीठ, साजुक तुप व कुस्करलेले रताळे घालून एकत्र करा. चमच्याने थोड

मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 12/03/2013 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' बर्‍याच दिवसांनी एक असे नाटक पहायला मिळाले जे नाटक काही ऐतिहासिक सत्याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करते.

माहेरचा अव्हेर!

लेखक आजानुकर्ण यांनी मंगळवार, 12/03/2013 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते.

अनपेक्षित भाग ३

लेखक निमिष ध. यांनी मंगळवार, 12/03/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी पण एकदम चमकून ती भारतीय मुलगी आताच भारतातून आली आहे हे भान येउन तिला दूर केले. (भाग २) तिचे समान घेऊन गाडीकडे निघलो. प्रवास कसा झाला, विमानात काय आवडले असे प्रश्न विचारून झाले. गाडीपाशी आल्यावर समान मागे टाकले आणि तिच्यासाठी दार उघडले. ती सांगत होती कि तिला गाडी आवडली. रस्त्यावर दुतर्फा असलेली गर्दी एकदम शिस्तीत होती. पहिल्यांदाच इतके बर्फ पाहून ती हरखून गेली. पण थंडी असल्यामुळे काकाडली होती. तो पर्यंत गाडीचे हिटर गरम झाले आणि तिचे काकादाने जर कमी झाले.

शाळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 12/03/2013 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥ कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥ नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी नुस्त्या फळ्याला चौकट लाकडी... मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥ शाळेत शिक्षक इकडे तिकडे, यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे! बि.ए.
काव्यरस

आठवणीतले ग्रीस - भाग ७ (समाप्त)

लेखक nishant यांनी मंगळवार, 12/03/2013 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ दिवस ६ सँटोरिनी आणि गाढव यांचे एक अजब नाते आहे! या बेटावर सर्वत्र गाढव नजरेस पडतात. स्थानिक लोक त्यांचा वापर घोड्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांसाठी करताना दिसतात.

लघु वाल्गुदभारत-भाग ३.

लेखक बॅटमॅन यांनी सोमवार, 11/03/2013 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
जो वेळ या वाल्गुदवर्णनाते| लागे, क्षमावे परि या कवीते| कामे जशी येति तैं मूड जाई| तैं दीस-दीशीं लिहवीत नाही || गुहायामपतत्ब्रूसः सपद्येवाचिरात् खलु | तत्रैव हि गृहं तेषां वाल्गुदानां पुरातनम् ||१|| ब्रूसाघातध्वनिना ते सर्वे भयभीता: भृशं खलु | उड्डयन्ति आक्रोशन्ति वारंवारं इतस्तत:||२|| तद् दृष्ट्वा चकितो ब्रूसः भयेन स्तिमितस्त्वहो | पश्चात्पितृप्रयत्नेन गुहाया: उद्धृतः खलु ||३|| स्वप्नेष्वपि खलु त्रस्तः महद्भिर्वाल्गुदै: सदा | भयभीतः सदा ब्रूसः प्राणिभिस्तु निषेवित: ||४|| निजचित्तभयं यावत् अकथत् भीतिमान् बटु: | "भयं सर्वेषु सामान्यं" तातस्तमकथत्तदा ||५|| तया ऐकितां शांत जैं ब्रूस होई | अकस्म

एकांकीका : धडा

लेखक गणपा यांनी सोमवार, 11/03/2013 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
अंक पहिला / प्रवेश पहिला. वेळ : सकाळी ७:३० प्रसंग रोजचाच. मावशी (किचन मधून) : अनोखी, लवकर लवकर आटप बस येईल इतक्यात. मोजे काढुन ठेवलेत, बूट घालून तयार रहा. नायिका (ओसरीत बुटाला पॉलिश लाण्यात मग्न.) : ह्म्म्म. मावशी बाहेर येते. नायीका दिवाणखान्यातून दिसत नाहीये. मावशी : हे काय? मोजे अजुन ईथेच पडलेत? अनोखी बस चुकेल. नायिका (वस्स्क्न खेकसुन): बुटांना पॉलिश करतेय ना?" मावशी : बरं बरं आटाप लवकर. प्रवेश दुसरा. वेळ : सायंकाळ ७:३० आई : अनोखी, आपण एक नाटक बसवायचय. नायिका (अभिनयाचं नाव काढताच कळी खुललेली): कसलं? कसलं? आई : असच घरगुती नाटक आहे. हीरोईन तुझ्या येवढीच शाळेत जाणारी मुलगी.