Skip to main content

" रविवार आज रविवार -" (बालकविता)

लेखक विदेश यांनी रविवार, 17/03/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार आज रविवार किती छान छान वार अभ्यास नाही शाळा नाही खूप मजेचा आज वार ! मारामारी आणि कुस्ती येत नाही मुळीच सुस्ती खेळ खेळण्यांची कमाल दिवसभर नुसती धमाल ! दिवसभर खाणेपिणे नाचणे अन् हुंदडणे गट्टी फू अभ्यासाशी कट्टी फक्त खेळण्यांशी ! नाही धपाटा आईचा नाही रट्टा बाबांचा ताईचे ऐकायचे नाही दादाशी बोलायचे नाही ! दोस्तमंडळ झिंदाबाद मौजमस्ती झिंदाबाद धिंगाणा गाणे गाणी रंगीत फुग्याची पिपाणी ! रविवार हो रविवार आमचा आवडता वार घरात आणि मैदानात दंगामस्ती चालणार ! .

पौष्टिक नाश्ता

लेखक सोनलि यांनी रविवार, 17/03/2013 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ मीडियम कच्चा पपीता , जिरे , हिरव्या मिर्च ५-६ , मीठ चवी अनुसार , शेंगदाणे चा कुट ४ (टेबल )चमचे, लिंबू,कोथिम्बिर सजावटी साठी कृती : प्रथम पपीता ला बारीक चिरून घावा, ननतर कडाही मध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप केवा तेल सुधा चालेल घालून गरम करावे मग त्यात जिरे आणिक बारीक चिरले लि मिरची घालावी , आता यात चिरले ला पपीता घालून थोडे पाणी घालून पूर्ण शिजून घ्यावे अगदी बटाटे ची भाजी सारखी, नंतर मीठ घालून जर पाणी असेल तर ते जिरू द्या वे . भाजी मोक्डी झाल्यास त्यात शेंगदाणे चे कुट घालावे .आणिक मिडीम गस वर लाल सर होऊ द्यावे .

आई शप्पथ सांगतो...

लेखक यसवायजी यांनी रविवार, 17/03/2013 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात धड-पडायचंय म्हणता म्हणता पडलो एकदाचा.. नव्हे, चांगला आपटलोच. हाडं खिळखिळी झाली.. पार चेंदा-मेंदा झाला.. बरं झालं म्हणा.. यातुनच शिकायला मिळतं.. पण अशी का वागली ती??? A ---------------------------------------------- तीचं लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले.. रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले.. :( तीनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०७ : हुर्टीग्रूटन क्रूझ - युरोपचे अती उत्तर टोक (Nordkapp) आणि राजखेकडे (King Crabs)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 17/03/2013 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

"माझे विमान - "

लेखक विदेश यांनी रविवार, 17/03/2013 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
ताई, कर ना लौकर घाई विमान चालू करून देई - चावी दे तू विमानाला फिरवून आणिन मी तुजला ! खेळणी पसरली सगळीकडे विमान सरकत नाही पुढे , भूभू, हत्ती, उंट नि घोडा - विमान आले रस्ता सोडा ! विमान निघाले, हळूच ये ना तायडे, खेळणी मोडतील ना... विमान माझे छान किती वाटत नाही आता भिती ! घेतला वेग विमानाने जरी मधेच थांबले विमान तरी - खुर्र्र... खुर्र... खट..गम्मत झाली बघ ना ताई, चावी संपली ! .

कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 16/03/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बे ऑफ पॅशन" पार्श्वभूमी: गोव्यावरून आणलेल्या पॅशन फ्रूट लिक्युअर (भ्रष्ट भारतीय नक्कल) वापरून बरेच दिवस झाले होते. आज त्या लिक्युअरच्या गुलाबी रंगाची पुन्हा एकदा भुरळ पडली. अ‍ॅबसोल्युट वोडकाचे संस्थळ चाळता चाळता पॅशन फ्रूट लिक्युअर वापरून केलेल्या कॉकटेल्स्ची खाणच मिळाली. मग एक मस्त आकर्षक रंगाचे बे ऑफ पॅशन आवडले. महत्वाचे म्हणजे सर्व  साहित्य मिनीबार मध्ये दाखल होते.

राख आणि रक्षण ....

लेखक मन यांनी शनिवार, 16/03/2013 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
तो श्रीमंत होता. तसा त्या नगरातील तो एकटाच, एकमेव श्रीमंत वगैरे नव्हता. पण इतरांच्या, विशेषतः चोर,गुंड ह्यांच्या डोळ्यांवर यावी इतकी संपत्ती तरी नक्केच बाळगून होता. तसंही संपत्ती बाळगून असायला काय जातय? ती त्यानं कमावलेली नव्हतीच. पडली होती आपली पिढीजात त्याच्याकडं. कधी योगायोगानं, कधी मेहनतीनं तर कधी चक्क पालथे,निंद्य उद्योग करुन त्याच्या पूर्वजांनी ती कमावली होती म्हणे. श्रीमंतच तो. त्यातही जन्मजात पैशेवाला. त्याचे शौक काय कमी असणार ? एकदा त्याला आपल्याला झोपेत असताना सतत कुणीतरी संरक्षण पुरवावं असं वाटू लागलं. खर तर त्याला असं वाटावं हेच अलगद कुणीतरी योजलं होतं.

डाळिंब - गुलकंद आईसक्रिम

लेखक दिपक.कुवेत यांनी शनिवार, 16/03/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
ice cream ५० राव हे आईसक्रिम नी त्यांनी भरलेले मोठे बाउल खास तुमच्याकरिता :) साहित्यः १. क्रिम - २५० मिली. २. डाळिंबाचे दाणे - २ कप ३. साखर किंवा मध - डाळिंब/गुलकंदाच्या गोडानुसार कमी / जास्त ४. गुलकंद - २ मोठे चमचे ५. सजावटिकरिता आपापल्या आवडिचे ड्राय फ्रुट्स/डाळिंबाचे दाणे/थोडा गुल़कंद ई. कॄती: १. डाळिंबाचे दाणे काढुन मिक्सर मधे थोडं पाणी घालुन बारिक वाटुन घ्या. आता गाळण्यातुन हा रस गाळुन घ्या. २.

साक्षात्कार

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 16/03/2013 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : साक्षात्कार या शब्दातून कोणताही दैवी अगर परमेश्वरी साक्षात्कार या लेखात अभिप्रेत नाही. a समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... मी जात आहे..की येत आहे ?

फोडणी, पिठलं आणि भजी

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 16/03/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी संध्याकाळ झाली की भुक लागते. दुपारचं जेवण झालेलं असतं पण काहीतरी खावं असं मनापासुन वाटतं. काहीतई थोडा नाश्ता केला की बरं वाटतं. जास्त खाल्लं तर रात्रीच जेवण जात नाही अन मग भल्या पहाटे पोटात कावळे काव काव करतात. संध्याकाळी काय खावं हा मोठा प्रश्न असतो. आजकाल बाहेर जावून खाणं काही परवडत नाही. ज्यांना परवडतं त्यांनी खावं. तब्येतीला पण झेपत नाही. बाहेरचं खाऊ नका डागतर कानी कपाळी ओरडून सांगतो आणि माझ्यादेखत मदतनीसाला जरा वडापाव घेउन ये रे दोन चार नाना बर्‍याच दिवसांनी आलाय तर खाउ दोघे जण असं सांगतो. त्याच्या समोर काही बोलणं हा गुन्हा असतो.