कधी कधी संध्याकाळ झाली की भुक लागते. दुपारचं जेवण झालेलं असतं पण काहीतरी खावं असं मनापासुन वाटतं. काहीतई थोडा नाश्ता केला की बरं वाटतं. जास्त खाल्लं तर रात्रीच जेवण जात नाही अन मग भल्या पहाटे पोटात कावळे काव काव करतात. संध्याकाळी काय खावं हा मोठा प्रश्न असतो. आजकाल बाहेर जावून खाणं काही परवडत नाही. ज्यांना परवडतं त्यांनी खावं. तब्येतीला पण झेपत नाही. बाहेरचं खाऊ नका डागतर कानी कपाळी ओरडून सांगतो आणि माझ्यादेखत मदतनीसाला जरा वडापाव घेउन ये रे दोन चार नाना बर्याच दिवसांनी आलाय तर खाउ दोघे जण असं सांगतो. त्याच्या समोर काही बोलणं हा गुन्हा असतो. मुकाट्याने वडापाव किंवा जे असेल ते खाऊन घेत्तो आणि यापुढे बाहेरचं अजिबात खाणार नाही असं कबुल करुन त्याने दिलेल्या गोळ्या घेऊन येतो. तर नेहमीच काही असला हरीचा लाल उदार होऊन खाऊ घालत नाही मग आपलं आपण बनवायचं आणि खाऊन घ्यायचं.
संध्याकाळी नाश्त्यासाठी फोडणी हा प्रकार सगळ्यात मस्त आहे. काही करा आणि फोडणी द्या. म्हणजे असं की कधी कधी उरलेला भात असतो. थोडा मोकळा करा. पातेलं गॅसवर ठेवा थोडं तेल टाका. जरा धुर आला की मिरची, हिंग, मोहरी टाका. तडतडली की त्यात हळद टाकून मोकळा केलेला भात टाका. मस्तपैकी हलवा. गरम गरम फोडणीचा भात म्हणजे वा ! स्वर्ग सुख. कधी कधी मोहरी बरोबर जिरे पण टाकून पाहिले. वेगळी चव आवडून गेली.
भात नसला तर सरळ पोळी कुस्करुन घ्यावी. मउसुत पोळी छान पैकी कुस्करुन घ्यायची. पोळी असली की कांदा मात्र आवश्यकच. कांदा बारीक चिरायचा. आधी तेलावर लालसर होईस्तोवर परतायचा. मग मिरची, हिंग, मोहरी टाकून पोळीचा कुस्करा टाकायचा. छान वाफ यायला हवी. थोडी साखर चवीला टाकायची. तृप्ती कशी असते ते फोडणीची पोळी खाऊन कळते. पोळी खाउन खाऊन कधी कधी कंटाळा येतो. अशा वेळेस भाकरी केली जाते. भाकरी केली की मुद्दाम एखाद दुसरी भाकरी जास्त करतो. पोळी च्या जागी भाकरीचा कुस्करा अन त्यावर दही.. कितीवेळ जिभल्या चाटाव्या याची मोजदाद नको.
फोडणी हा भन्नाट प्रकार आहे तो असा की ब्रेडला सुद्धा फोडणी मस्त लागते. फोडणीचे पोहे हा थोडा मला वेळ जास्त लागणारा प्रकार वाटतो. पोहे घ्या, नीट स्वच्छ करा. त्याला थोडा पाण्याचा शिपका मारा. मात्र एकदा का पोहे बनले की कढईतुन ताटलीत घेण्याचा पण धीर नसतो. पोहे अनेक प्रकारे बनवतांना मजा येते. कधी तसेच तर कधी कांदा घालून. बटाट्याचे काप टाकून केलेले पोहे मस्त लागतात पण बटाटा नीट शिजला नसला तर मजा किरकीरी होते. एकदा तोंडले घालून पोहे केले होते. बरे लागले होते पण परत काही केले नाही. कांदा घालून किंवा तसेच.
फोडणीचे पदार्थ खाऊन सुद्धा कधी कधी कंटाळा येतो. मग सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे बेसनाचं पिठलं करायचं अन पोळीबरोबर हादडायचं. पिठल हा पदार्थ जितका अचानक ठरवून केला जातो तेव्हा त्याला जी चव येते ती ठरवून केलेल्या पिठल्याला येत नाही असं माझं तरी निरिक्षण आहे. पिठल हा घरीच करुन खाण्याचा प्रकार आहे. हल्ली पुण्यामुंबईत पिठलं खायला लोक हाटीलात जात असतात असं कुणीतरी म्हणत होतं. खरं खोटं तेच जाणे.
एवढं सगळं असलं तरी कधी कधी संध्याकाळच्या नाश्त्याला काय करावं हा मोठा प्रश्न येतो. थोडा जास्त वेळ असला आणि घरात साधन सामुग्री उपलब्ध असली तर भज्यासारखा बेत नाही. बेसनाचं पीठ आवश्यकते नुसार घेऊन त्यात खाण्याचा सोडा, हळद, तिखट मीठ टाकायच. कांद्याचे उभे काप करुन त्यात मिसळायचे, कढईवर तेल तापवून एक एक भजं त्यात सोडायचं. चर्रर्र करुन भजं लाल व्हायला लागलं की जो वास दरवळतो अहाहा ! कधी भजी पोटात जातील असं होतं. करता करता खाणं की खाता खाता करणं हा भेद रहात नाही. कांद्याच्या ऐवजी गिलक्याचे काप सुद्धा मस्त लागतात. कधी कधी बेसनाच्या ऐवजी मुगाच्या डाळीची भजी. एखादा मित्र अशा वेळी आला असेल तर त्याला अगत्याने खाउ घालतो तेव्हा अस्सल गृहीणीला कसे वाटत असेल त्याचा अनुभव पुरुष असून येतो. दुसर्याला करुन खाऊ घातलं की समाधान मिळतं. कधी कधी एखादा मित्र फोन करतो आणि अर्ध्या तासात तुझ्या घरी येत आहे काहीतरी खायला कर असं हक्काने सांगतो तेव्हा आयुष्यात आपण काही तरी नक्की कमावलं आहे हा दिलासा मिळतो. उरलेले दिवस जगायला बळ मिळतं.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6123
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा....
कधी येउ सांगा नाना. चव आली
कधी कधी एखादा मित्र फोन करतो
ओह्हो......
मीठ
आजकाल मॅगीचा जमाना आहे भाऊ..
मस्त!
आवडले..
तडका
पिठल हा पदार्थ जितका अचानक ठरवून केला जातो तेव्हा त्याला जी चव येते ती ठरवून केलेल्या पिठल्याला येत नाही..सहमत. मुळात पिठले हा आयत्यावेळीच करायचा पदार्थ आहे !फ्रोझन पिठल
In reply to तडका by सस्नेह
खमंग !
मुक्तक खरच आवडलं! तथापि;
… की बरं वाटतं.… मग आपलं आपण बनवायचं आणि खाऊन घ्यायचं.… बरे लागले होते पण परत काही केले नाही.आणि… उरलेले दिवस जगायला बळ मिळतं.यामधून किंचित "गडद" ललित वाटतंय. अनेकदा लावण्यांत शृंगारापेक्षा आर्तताच अधिक जाणवते तसं वाटतंय.लिखाण फक्त खाण्याबद्दल नाही, अन्योक्ती सारखं काहीतरी आहे; हे जाणवलं.बव्हंशी सहमत!आमचे नाना आहेत ते.
In reply to मुक्तक खरच आवडलं! तथापि; by वामन देशमुख
साधा पण
मसाला कमी पडला आहे.
+१००. असं झालंय हल्ली खरं,
In reply to मसाला कमी पडला आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर लेख!
+१
In reply to सुंदर लेख! by पैसा
विचार
फोडणीसारखच खमंग लिखाण
एकटेपणा त्रास देतोय का नाना?
खमंग, खुमासदार
मस्त हो नाना
......कधी कधी एखादा मित्र फोन
छान लिहिलंय. भावनांना
>>हल्ली पुण्यामुंबईत पिठलं
फोडणीचा लेख आवडला .
फोडणीच्या भाताची अनेक
कित्येक कातरवेळा सुसह्य झाल्याचा अनुभव
फोडणीदार लेखन...