Skip to main content

कोकणवारी..

लेखक मी_देव यांनी रविवार, 21/04/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
दर वर्षी भारतात येणं होतं, पण ह्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये घरी जाण्याचा योग आला. कोकणांत ह्या दिवसांत म्हणजे नुसती धम्माल. ह्या वेळी बाहेर खूप फिरणं नाही झालं, बहुतेक वेळ घरीच गेला. त्यातूनही घरी आणि आजूबाजूला काढलेली काही छायाचित्रं टाकत आहे.
1. ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच.

त्यांचाच जीव घे तू ..

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 21/04/2013 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचाच जीव घे तू ..... हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा!

॥ आरती दुष्कळाची ॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 21/04/2013 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
जय देव जय देव जय दुष्काळदादा,हो श्रीदुष्काळदादा । आमच्या गावाला येऊनको यंदा जय देव जय देव ॥धृ॥ मागील वर्षी अतिवृष्टी झाली । उभी पिके सर्व वाहूनिया गेली । चालु वर्षाला पाऊस गेला । सर्व पिकांचा सत्यानास झाला । मिळेना गारिबांना कुठे कामधंदा...॥१॥ ऊन्हाळ्यात मिळेना प्यायला पाणी । मुले बाळे कशी फिरती रानोरानी । पोटाला मिळेना पोटभर अन्न । अशा वेळी वाटते नको हे जीणं । डगमगतो तेंव्हा पुरुष ही खंदा...॥२॥ मंत्री महोदय येऊनिया जाती । मोठमोठाल्या सभा भरविती । हे करू ते करू अश्वासने देती । घरी गेल्यावर विसरुन जाती । भोळ्या जनतेचा घेतात फायदा...॥३॥ रोजगार हामीची कामे ही येती । ऊन्हा तान्हात कामे

' झोपडपट्टी भाषा '

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 21/04/2013 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
माXXXद . . . कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . . " अबे माXXXद दिखता नही क्या ?? " एक अलिशान गाडी पुढे जात असताना शिवी हासडून गेली .. वेळ असेल रात्री ९ च्या आसपासची . कयानीच्या स्वर्गीय मावा केक ची चव जिभेवर आहे तोपर्यंतच घर गाठायचे या इराद्याने तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून सणकत निघालो होतो . एस .

फणसाची भाजी

लेखक सूड यांनी रविवार, 21/04/2013 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मिपावर पारंपारिक रेशिप्या येतायेत. त्यातही कोकणातल्या फणसाच्या रेशिप्या जास्त!! उकडगरे, फणसाचा पुलाव ...म्हटलं आपणही फणसाच्या भाजीची रेशिपी टाकावी (जी अजून मिपावर आलेली नाही असं मला वाटतं). फणसाची भाजी म्हणजे जीव की प्राण. जवळजवळ दोनेक वर्ष ही भाजी केलीच नव्हती. फणस चिरायची उकडायची माहिती होती, पण मसाले? ते नक्की कोणकोणते ते आठवेना. मागे एकदा पिकनिक निघाली तेव्हा वेळासला जाणं झालं होतं. तिथं फणसाची भाजी खाल्ली होती, अतिशय सुंदर चव!! न राहावून भाजी कशी केली ते विचारलं.

स्वप्नांची शाळा

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 21/04/2013 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांच्या शाळेत झालो मी भरती ,झालो ससाणा पोचलो ढगा वरती, दिसला ससा धरती वरी ,झेप घेतली त्यावरी, ससा झाला कावरा बावरा,माझा झाला बैजूबावरा , घेऊ लागलो तान-लकेर ,क्षणात झालो मी फकिर , दुसऱ्या क्षणी होतो मी राजा,वाजू लागला सनई-बाजा, झालो मी राजाचा रंक ,कधी झालो येसाजी कंक , आला हाती दाणपट्टा माझ्या ,चिरू लागलो ताज्या भाज्या, मौजेची ती स्वप्ने पडती ,स्वप्नात माझ्या झाडे उडती, गजर झाला जाग मला आली ,स्वप्नांच्या शाळेची सुट्टी झाली .
काव्यरस

मेळ घाट

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 20/04/2013 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
अजुनी आठविते भय रात्र मज ती,कोणी न्हवते अवती भवती, त्यातून बिबट्याची डरकाळी ,मेळ घाटातली ती रात्र काळी, रान गव्यांचे हुंकार भिवविती ;वानरांचे चित्कार घुमती, हरीणांचे बिथरून पळणे ,रस्त्यांची ती अद्भुत वळणे, पहाट होता किलबिल होते,मनावरचे दडपण जाते, पहाट किती रम्य वाटते,झाड -फुलांना शोभा येते, भयाची जागा हुशारी घेते,निसर्ग त्याला साथ देते.
काव्यरस

धोबी घाट सबकी धुलाई|

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शनिवार, 20/04/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
धोबी घाट न्युज लाँड्री-न्युज चॅनेलच्या जंगलात सफर करताना त्यावर चाललेल्या चर्चा हा मनोरंजनाचा भाग समजावा.

निरूत्तर

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 20/04/2013 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्झा बर्जिसचा आणि माझा कित्येक तपांचा पक्का दोस्ताना होता. आमच्या वृत्तीत, स्वभावात आणि कौटुंबीक पार्श्वभूमीत जमीन अस्मानाचा फरक असूनही तो टिकून होता. मिर्झा एका ख्यातनाम नबाबी खानदानातला होता. तो परिस्थितीने पुरता गांजून गेलेला होता. तरीही रक्तात मुरलेली घमेंड, मिजास अजूनही तशीच होती. 'उपरसे शेरवानी और अंदरसे परेशानी' अशा आपल्या केविलवाण्या अवस्थेची जाणीव त्याला वारंवार व्हायची, पण तो पुरता असहाय होता. परिस्थितीवर मात करण्यासाठी काही प्रयत्न करेल तर तो मिर्झा बर्जिस कसला? 'ठेविले अनंते' तैसेची राहून आर्थिक परेशानी लपवून ठेवत आपल्या शेरवानीला मात्र तो प्राणपणाने जपत होता.

एबीएस वाली रिक्षा

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 20/04/2013 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुन्हा एकदा रिक्षाने लॉंग ड्राइव्ह अनुभवायचा योग आला. रिक्षात बसताना रिक्षा चालकाकडे एक आपली जस्ट नजर टाकली. चेहरा, स्टान्स वगैरे बघून अंदाज येतो साधारण की ही 'राइड' कशी असणार आहे ते. तेंव्हा संतुलित वाटला माणूस. अमूक ठिकाणी जाणार का? मी विचारलं. भविष्यवेत्त्याने भविष्य सांगण्याआधी जसा विचार करावा तसा एक ५-६ सेकंद विचार करून मानेला एक होकारार्थी आणि त्याचबरोबर आज्ञार्थी झटका देऊन तो रिक्षात बसला. त्या ५-६ सेकंदात काय गणित मांडलं त्याने कोण जाणे. मीही बसलो. आपलं डावं बूड सीट च्या उजव्या भागावर स्थापून त्याने रिक्षाला किक मारलीन, खट्ट कन फर्स्ट गियर टाकला आणि झर्र्र्कन पिकप घेतला.