रुसवा
कबूल नाही नसलेपण तव
निगूत जपले आहे वैभव
सरले ऋतू कितीक युगाब्धे
हिरमुसले ना जीवन लाघव
अदृष्यातिल दृष्य आभासे
चंचल डोळ्यांमधील बारव
स्मितरेषा गालांवर अंकित
खोल खळ्या ओठांचे पल्लव
भल्या किनारी रुसवा फसवा
अबोल्यात वठले गुंजारव
आभास; विझल्या खुणा सणाच्या
भिजले काळिज हसले शैशव
............................अज्ञात
काव्यरस
मिसळपाव
"ट्रेकिंग" या अनुभवावर अनेक धागे येत आहेत. अनेक जण नवनवीन किल्ल्यांना भेटी देत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु हे धागे वाचत असताना; ट्रेकर्सचे त्या त्या ठिकाणचे अनुभव वाचत असताना "धाडस आणि अनावश्यक धोका" या दोन गोष्टींमधला फरक लक्षात न घेवून अपघाताच्या अगदी जवळ जाणार्या काही घटना वारंवार दिसल्याने हा माहितीपर धागा.
सर्वप्रथम - "मी निष्णात ट्रेकर नाही" त्यामुळे इथे दिलेले सल्ले / सूचना हे अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये लागू होण्यासारखे आहेत व माझ्या अनुभवातून आलेले आहेत.