Skip to main content

एक हरवलेली मैत्री..

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 20/05/2013 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
वैताग वैताग आहे हा पाऊस, नेमके घरातून बाहेर पडायच्या वेळी दारात हजर. जा रे जा रे पावसा तुला देतो पैसा, पण ऐकतोय कसला. जरा कमी झाला तर निदान रिक्षास्टॅंड पर्यंत तरी जाता येईल. उगाच तेवढ्यासाठी म्हणून छत्री रेनकोट सांभाळायची झंजट नकोय. बाकी एकवेळ ते परवडेल, पण एकदा का हिची कधीपासून सांगतेय गाडी घ्या ची कॅसेट सुरू झाली की गाडी घसरलीच म्हणून समजा. उगाच मूडचा कचरा नकोय. किती दिवसांनी आज मस्त आऊटींग प्लॅन केलीय. मप्टीप्लेक्समध्ये सिनेमा, त्यानंतर मॉलमध्येच थोडीफार विंडो शॉपिंग, डोळे आणि मन भरून पावले की उदरभरणाची सोय जवळच्याच ओपन रेस्टॉरंटमध्ये.

मागतोय ना.. कर मदत!

लेखक दशानन यांनी सोमवार, 20/05/2013 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
मास्तर कायम म्हणायचा मला, राजा, राजा लेका दुसर्‍याला मदत केली की देव तुला मदत करेल. जो अडलेला दिसेल त्याला मदत कर, जो मदत मागेल त्याला मदत कर. आता मास्तर म्हणाले म्हणजे करायला नको का? तेव्हा पासून मनाला जे वळण लागले ते त्यामुळे अंगावर वळ उठले तरी सुटले नाही बघा. मास्तरांनी सांगितले मागेल त्याला मदत कर. परिक्षेत एका मुलाला काय बी येत नव्हतं.. त्याने माझाकडे मदत नजरेनेच मागीतली गुपचुप व मी ती त्याला दिली. आता पन्नास कॉप्या अंगाखांद्यावर! दिल्या चारपाच काढून. देवानं कसे गुपचुप पुण्य जमा करून टाकायचे की नाही.. पण नाही. कॉप्या देताना मास्तरानंच पकडला, पापाचा हिशोब वाढवला. धु धु धुतला.

शुभ मंगल सावधान …

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 20/05/2013 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
(पुढील काव्य हे मंगलाष्टक्च्या लयीत वाचावे) घातला दारी मंडप लग्नाचा, खर्च तो बहु केला… पार्टी हळदीची दिली सर्वा, नाचुन जीव बहु थकला…. एवढे धुंद रात्रनृत्य ते झाले, सकाळी आम्बे हळदी मदतीला ….
काव्यरस

माझ्या पूण्याच्या भूमीत

लेखक कोमल यांनी सोमवार, 20/05/2013 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य बा.भ.बोरकर यांची माफी मागून, माझ्या पूण्याच्या भूमीत, गड्या प्रदूषणाचे ढग | कड्या कपारी मधोनी, धूर निघे भकाभक || माझ्या पूण्याच्या भूमीत, उन्हाळ्यात घामाच्या धारा | पावसाळ्यात दारापूढे, बनती रस्त्यांच्या नद्या || माझ्या पूण्याच्या भूमीत, काळी माती काळे पाणी | एके काळी या मातीत, सुवर्ण नांगर फिरवला जाइ || माझ्या पूण्याच्या भूमीत, इतिहासाची पाळेमूळे | आणि अडकतात वादात, आमच्या इथले पुतळे || माझ्या पूण्याच्या भूमीत, परप्रांतीयांची रे रास | 'भाऊ', 'दादा' शब्द गेले, बनले भैया सगळेच || माझ्या पूण्याची भूमीही, असे विद्येचे माहेरघर | विद्वत्तांची परंपरा, आहे इथुनच थोर ||
काव्यरस

डोंबिवली कट्टा...भाग २....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 20/05/2013 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच. वेळ : संध्याकाळी ७:३० स्थळ : नंदी पॅलेस कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात. खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल. प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या.. १. कुठून येणार? (एकाच गावातून येणार असाल तर सोबत मिळू शकते) २.

मॅजिक लेयर्स

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 20/05/2013 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स, बच्चेकंपनीला फळं खाउ घालायची म्हणजे कर्मकठिण काम. पण रेडिमेड ज्युसचा ग्लास समोर ठेवला कि तो एका मि. फत्ते! ह्याशीवाय रेडिमेड ज्युसेसनी कितीहि "ओरीजनल", "नो शुगर अ‍ॅडेड" असा दावा केला तरी फ्रेश ज्युसची सर काय त्याला नाहि. म्हणुन हा प्रपंच! सीजनल मिळणार्‍या फळांचा ताजा पल्प घरीच काढुन जssssरा खालच्या पद्धतीने सादर करा....बच्चेच काय मोठे सुद्धा धावत येतील कि नाहि पहा! Juice साहित्यः १.

ती गेली तेव्हा...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी सोमवार, 20/05/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
आई जाऊन एक वर्ष झालं.जखमेवरची खपली निघावी तसं काहीसं वाटत होतं सतत. तसं पाहिलं तर अखेरचे काही महिने तिचं अस्तित्व फक्त "असणं" इतकाच होतं. डोळे ,कान केव्हाच काम करायचे थांबले होते. आणि स्मरणशक्ती- तिने ही काढता पाय घेतला होता. या सार्‍यात ती तिच्या मनातले काहीच सांगू शकली नाही. कधी कधी वाटतं, कसं वाटलं असेल हळु हळु असं अंधार गुहेत जाताना? आठवणीची एक एक पाकळी मिटताना? या जगापासून दूर खेचलं जात असताना तिच्या मनाने, शरिराने किती आकांत केला असेल! वाईट वाटतं की किती प्रयत्न केला तरी आम्ही तिच्यापर्यंत पोहचतच नव्हतो. मधे एक अदृश्य पोलादी पडदा असावा तसं होतं.

चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-२

लेखक लाल टोपी यांनी सोमवार, 20/05/2013 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग पहिला प्रत्यक्ष उड्डाणाचा दिवस २८ जानेवरी उगवला. अजूनही उड्डाण नक्की होईल किंवा नाही याबाबत काही अंशी साशंकताच होती. कारण आदल्या रात्री उणे आठ इतके कमी तापमान नोंदवले गेले होते. २८ ला सकाळी +१ पर्यंत तापमान सुधारले होते. मात्र यापूर्वी १२ अंश सेल्सियश पेक्षा कमी तापमानात स्पेस शटल कधीही झेपावले नव्हते. अशा परीस्थितीत कधीही उड्डाण पुढे ढकलता येते.

Madeira Loaf Cake

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 19/05/2013 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १७५ ग्राम बटर (रुम टेंपरेचरला असलेले) १७५ ग्राम साखर २०० ग्राम Self-Raising Flour (किंवा २०० ग्राम मैदा+ १ टेस्पून बेकिंग पावडर एकत्र करुन घेणे) ५० ग्राम बदामाची पावडर (मी सालींसकट बदामाची पावडर वापरली आहे) ३ अंडी (रूम टेंपरेचरला असलेली) दीड टेस्पून लिंबाचे साल किसलेले १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स १/४ वाटी दूध (गरज लागल्यास) .