Skip to main content

मॅजिक लेयर्स

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 20/05/2013 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स, बच्चेकंपनीला फळं खाउ घालायची म्हणजे कर्मकठिण काम. पण रेडिमेड ज्युसचा ग्लास समोर ठेवला कि तो एका मि. फत्ते! ह्याशीवाय रेडिमेड ज्युसेसनी कितीहि "ओरीजनल", "नो शुगर अ‍ॅडेड" असा दावा केला तरी फ्रेश ज्युसची सर काय त्याला नाहि. म्हणुन हा प्रपंच! सीजनल मिळणार्‍या फळांचा ताजा पल्प घरीच काढुन जssssरा खालच्या पद्धतीने सादर करा....बच्चेच काय मोठे सुद्धा धावत येतील कि नाहि पहा! Juice साहित्यः १. कोणतीहि ४ सीजनल फळं (संत्री/मोसंबी सोडुन) - मी चेरी, टरबुज, किवी आणि आंबा घेतलाय २. मध - प्रत्येकि १ चमचा ३. बर्फाचे खडे - ३ ते ४ ४. उंच ग्लास ५. सजावटिसाठि लगडलेल्या चेरीज/आंबा/मोसंब्याची काप, पुदिना पान यापैकि काहिहि कॄती: १. चेरी / टरबुजाच्या बीया काढुन घ्या. किवीचे साल काढुन त्याचे तु़कडे करुन घ्या. आंब्याचा रस/पल्प काढुन घ्या २. आता मिक्सर मधे प्रथम चेरी आणि १ चमचा मध घालुन त्याची प्युरे/पल्प तयार करावा. हिच पायरी टरबुज, किवी आणि आंब्यासाठि करावी. फक्त प्रत्येक वेळि मिक्सरच भांड स्वच्छ धुवुन घ्यावं म्हणजे फळांचे रस/रंग एकमेकांत मिसळणार नाहि. प्रत्येकाचा पल्प वेगवेगळ्या भांड्यात तयार ठेवावा ३. आता सर्विंग/उंच ग्लास घेउन त्यात ३/४ बर्फाचे खडे टाकावे ४. आता एका मोठया चमच्याने तळाशी चेरीचा पल्प हळुवार घालावा. ग्लास हलकासा हलवुन पल्प सेट होउ द्यावा ५. आता ग्लास हळुवारपणे गोलाकार फिरवत एका दुसर्‍या चमच्याने टरबुजाचा पल्प ग्लासच्या कडेकडेने गोलाकार घालावा. ६. हिच पायरी किवी आणि आंबा पल्प घालुन करावी ७. सजावटिसाठि जे उपलब्ध असेल त्याने सजवुन मॅजिक लेयर्सचा ग्लास पेश करावा टिपा: १. शक्यतो ज्या फळांचा घट्ट पल्प निघेल (उदा. केळं, चीकु, स्ट्रॉबेरी, अवकादो ई.) अशीच फळं घ्यावी जेणेकरुन लेयर्स सेट होतील. संत्री, मोसंबी, कलिंगडचा रस पातळ असतो म्हणुन त्यांची लेयर सेट होणार नाहि. २. फळांच्या पल्पचा क्रम आपापल्या आवडिनुसार ठरवावा ३. अशीच दोन किंवा तीन फळं घेउन डबल किंवा ट्रिपल लेयर्स करु शकतो

वाचने 9428
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

भा री ही!!! त्वरित करून बघणेत येईल...

मस्तं आणि रंगतदार. उन्हाळ्यासाठी खास 'ताजेतवान पेयं'(रिफ्रेशिंग ड्रिंक).
फळांच्या पल्पचा क्रम आपापल्या आवडिनुसार ठरवावा
क्रम ठरवताना प्रथम आंबट, तुरट, गोड (केळ्यांचा गोडवा)आणि राजस चवीचा (आंबा) असा ठरवावा. स्ट्रॉने प्यायचा असल्यास वरिल प्रमाणे. ग्लास तोंडाला लावून प्यायचा असेल तर उलटा क्रम लावावा. म्हणे तळाला आंबा, नंतर केळ्याचा रस, नंतर टरबुज किंवा तत्सम फळ आणि सर्वात वर आंबट रस असा क्रम असावा. उद्देश हा की शेवटी आंबट चव तोंडात न राहता राजस चव राहावी. सर्व रसांमध्ये मध न वापरता ऑरेंज किंवा अननसाच्या रसात मध, किवीत, टरबुजात साखर, आणि आंब्याच्या रसात वेलची किंवा केशर पुड मला आवडेल.

In reply to by प्रचेतस

++++++++११११११११ टू अगोबा... @सीजनल मिळणार्‍या फळांचा ताजा पल्प घरीच काढुन जssssरा खालच्या पद्धतीने सादर करा....बच्चेच काय मोठे सुद्धा धावत येतील कि नाहि पहा!>>> http://www.sherv.net/cm/emoticons/drink/drinking-beer.gif अता आंम्हाला फोटु पाहिल्यामुळे तिकडे धावत/पळत/अंतर्धान पावुन यावसं वाटतय,त्याचं काय करायचं???? :( गंपा/दिपक/मृणालिनी/सानिकातै/पेठकरकाका...तुंम्ही सगळ्यांनी भारतात म्हणजे पुण्यात ;) येऊन मिपा खाद्य मोहोत्सव करा....! http://www.sherv.net/cm/emoticons/eating/lemon-smiley-emoticon.gif

खल्लास पाकृ एकदम!

मस्तच. . . . . . . . (चला आता सोत्रिला फाईट देणारा कोणीतरी आला आहे. ........................................... का सोत्रिच डाव्या हाताने टंकतो आहे? सोत्रि please हलकेच घ्या.

मस्त.. करून पाहिला पाहिजे..

त्यात दोन लेयर्सच्या मध्ये सफरचंदाचे पातळ काप टाकायचे आणि फळांचे लहान लहान तुकडे पण मध्ये मध्ये असायचे . खाताना छान लागतं

खासच.. आपल्याला स्वयंपाककला काही जमत नाही पण हल्ली माझे रीअलचे ज्यूसेस, क्वालीटी आईसक्रीम्स, मॅप्रोची सरबते, भिजवलेल्या सब्जा, लिंबू मारके , नही तो दूध डालके, बर्रफ के साथ काहीना काही रोज रात्री बनवणे चालू असते.. आजही आताही त्याच विचारात असताना यावर नजर गेली अन आता जे काही बनवेल ते याच्या तुलनेत फिकेच वाटणार.. :(

छान आणि कलरफुल !!

पेठकर काका: डिटेल प्रतिसाद पटला. पुढल्या वेळेस लेयर्स सेट करताना हि खबरदारी घेईन. अभिषेकः गडबड नाव एकुन आहे पण माझ्या अंदाजानुसार त्यात २/३ फ्लेवरचे आईसक्रिम + फळांचे तुकडे मिक्स करतात. ज्युस बाबतीत हा प्रकार करत असल्यास माहित नाहि. एनी वे पण हे खाल्ल्यावर पोटात गडबड होत नाहि एवढं नक्कि :D

मी तुम्च्याशी आणि सानिकाशी कट्टी घेत्ली आहे.फक्त रेशिपी पाहून त्रास होतो हो आणि तुम्च्यासारखे काही जमत ही नाही.