Skip to main content

भांडार हुंदक्यांचे....!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 20/06/2013 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
भांडार हुंदक्यांचे....!

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी

संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण;
केलाच पंचनामा दिलदार आसवांनी

वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा
बरसून पाजली मग जलधार आसवांनी

होतो पराभवांनी पुरता खचून गेलो
पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी

जेव्हा विजयपताका पहिलीच रोवली मी
जल्लोष धन्य केला साभार आसवांनी

लाचार शेत झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 20/06/2013 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
लाचार शेत झाले

आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे
हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे

पडताच वीज लखलख थरकापता भयाने
निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?

कृष्ण - एक विवेचन

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 19/06/2013 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कृष्ण या रचनेवर कधीतरी लिहावे असे मनात होते. बहुदा, ह्या रचनेचा मला अभिप्रेत असलेला अर्थ मी रचनेतून योग्य रित्या पोहचवू शकलो नाही. अर्थात हा माझाच एक कवी म्हणून पराभव म्हणायला लागेल. कुठलीही रचना करतांना ती सुबोध आणि सहज व्हावी हाच उद्देश असतो, पण कां कोण जाणे हि रचना तशी झाली नाही. मग विचार केला, थोड लिहाव यावर आणि सांगाव कि मला नक्की काय अभिप्रेत आहे ते. म्हणून हा लेखनप्रपंच.कृष्ण ह्या व्यक्तिरेखेला अगणित पदर आहेत. प्रत्येकाला तो वेगळा दिसतो आणि यातच व्यासांच्या अतुलनीय प्रतिभेचे यश आहे.

शकुनगंध

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 19/06/2013 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
त्या ओठातिल शब्द मदनउत्कट होऊनी झरतात स्मितहास्याची लकेर स्वरमय खग चिमणे किलबिलतात बंद पापणी मन चंचल पर फुलाफुलात विहरतात चुंबुनिया मधुपराग सालस शीळ ओळ आळवतात कोण कळे ना प्रतिमा केवळ स्पर्श उणे दरवळतात शकुनगंधमय वास सदाही तळहृदयी वावरतात ......................अज्ञात
काव्यरस

सावली !

लेखक चाफा यांनी सोमवार, 17/06/2013 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेचा शेवटच मुळात तुमच्या कल्पनेवर सोडलाय,त्यामुळे जर आपापल्यापरीनं शेवट जोडलात तर खरंच मजा येईल. ******** अखिलेश उर्फ अखी, मुळातच एक माथेफीरू माणूस. किमान त्याचे मित्र तरी हेच म्हणायचे. वडलांचा यशस्वी व्यवसाय, अभ्यासातली गती असं सगळं असूनही त्यानं जेंव्हा त्यानं डिफेन्स सर्व्हीसमधे जायचा हट्ट धरला तेंव्हा कुणालाच त्याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. सगळ्या प्रक्रीया पुर्ण करून तो नेव्हल एअर आर्म्सला जॉईन झाला आणि नंतर मित्रांच्यातलाही त्याचा संपर्क कमी होत गेला. दोन-एक वर्षापुर्वी त्याच्या बेपत्ता होण्याची बातमी धडकली तेंव्हा मात्र सगळेच हळहळले. घरी सांत्वन करण्यासाठी रिघ लागली.

वेरूळः भाग ४ (कैलास लेणी २)

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 16/06/2013 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
वेरूळः भाग ४ (कैलास लेणी २) वेरूळः भाग १ (जैन लेणी) वेरूळः भाग २ (ब्राह्मणी लेणी) वेरुळः भाग ३ (कैलास लेणी १) मागच्या भागात आपण कैलास लेणीमधल्या बाह्यभागातील भित्तीशिल्पे, लंकेश्वर गुहा तसेच यज्ञशाळा आदी भागाची सफर केली आता चला मुख्य कैलास मंदिरात. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मंदिर रचना कैलासाची मांडणी द्राविड पद्धतीची असून ब

मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता ? :)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 16/06/2013 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
१] कार्यालयात कामात गुंतवून घेतो. २] घरकामात व्यस्त असतो. ३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो. ४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो. ५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो. ६] मिपा कधी सुरु होईल याची चौकशी करतो. ७] मिपाचा राग येतो. ८] चित्रपट पाहिले, दूरदर्शनच्या मालिका पाहिल्या. ९] भटकंती केली. १०] काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. ११] अन्य. [प्रतिसादात मत लिहिले आहे]

येडचाप नीतीशकुमार उर्फ जे डी यू

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 16/06/2013 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपण 'लास्ट रिसोर्टऑफ स्काऊंड्रल्स ' च्या भानगडीत पडायचे नाही. उमेदवार पसंत नसला तर मतदानाचा हक्कच बजावायचा नाही हे म्या पक्के ठरवूनशान टा़कले आहे. पण मधेच घोटाळा झाला. मनोहर जोशी सर तिरकी मान करून म्हणाले आपल्या देशाची वाटचाल हळू हळू अराजकते कडे चालू आहे आणि आपले कलाम साहेब तर २०२० साली आपण जागतिक महासत्ता होणार असे म्हणत होते. त्यांच्या सुरात आपले परमपूज्य अर्थज्ञ नरेंद्र जाधव हेही आपला सूर मिसळत होते. असो .